कोरोनाच्या महाभयंकर संकटात राज्य शासनाचे योगदान काय ?माजी मंत्री राधाकृष्ण विखे पा.

बेलापूर(वार्ताहर)राज्यातील आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सरकारची पत ढासळली.त्यामुळे कोणी गुंतवणूकदार राज्यात यायला तयार नाहीत.राज्याला कोणीही लस द्यायला तयार नव्हते. महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे  टेंडर काढले जातात .तसेच दरपत्रकच तयार केले आहेत. राज्याची एव्हढी बिकट अवस्था कधीच झाली नव्हती. कोरोनाच्या महाभयंकर संकटात राज्य सरकारचे योगदान काय? असा सवाल  भाजपचे नेते माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

जि. प.आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद नवले यांच्या निधीतून बेलापूर येथे पावणेतीन कोटी खर्चाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण आ. विखे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शरद नवले होते.


आ. विखे पुढे म्हणाले की,महाविकास आघाडीचे एक एक मंत्री घोटाळ्यांमध्ये अडकले. वाळु माफियांनी उत्च्छाद मांडलाय. आदिवासींच्या जमिनी बळकावण्याचा  दुर्दैवी प्रयत्न होतोय. आत्महत्याग्रस्त एस. टी. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सरकार न्याय देऊ शकले नाही. अपयश झाकण्यासाठी राज्यातील वसुली सरकारचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत. त्यात सामान्य माणूस भरडला जात आहे. दारूमुक्तीचा निर्णय घेतला.मंत्र्यांनाच पैसे पुरेनात ते जनतेला काय देणार? असा सवाल करुन त्यांनी  राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टिका केली.

याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नैतृत्वाखाली १२० कोटी जनतेचे निशुल्क लसीकरण करण्यात आले. कोरोनाच्या काळात १ लाख ६० हजार कोटी खर्च करुन गोरगरिबांना मोफत धान्य देऊन त्यांची भुक भागविली.काश्मीरसह  देशभर पंचायत राजच्या माध्यमातून गावागावांत विकास करण्यासाठी तसेच वंचित भागांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धाडसी पाऊले टाकली जात आहेत.

शरद नवले यांनी  मिळालेल्या संधीचे सोने करीत चांगले काम करुन एक नवा अध्याय रचला असे सांगत  आ. विखे यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.बेलापूरला एक मोठा सांस्कृतिक ठेवा लाभला असुन  या गावाचा नेहमी अभिमान वाटतो. त्यामुळे गावाच्या प्रस्तावित विकास कामांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाहीही आ. विखे यांनी दिली. केंद्रीय ग्रामविकास मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत येत्या ५ मे रोजी बेलापूरला कार्यक्रम घेण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.


अध्यक्षीय भाषणात शरद नवले म्हणाले की,पक्षभेद विसरून समविचारी लोकांना बरोबर घेऊन जनतेच्या विश्वासाला पात्र राहुन निवडणूक जाहीरनाम्यानुसार विविध विकासकामे पुर्ण करीत आहोत.गावात जॉगिंग ट्रॅक, अंतर्गत रस्ते, झेंडा चौक सुशोभीकरण,उर्दु शाळा खोल्यांचे बांधकाम  आदींद्वारे कोट्यवधी रुपयांची कामे केली. त्यासाठी  आजी-माजी जि. प.अध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले व सौ. शालिनीताई विखे यांनी मोठी मदत केली.पुढील काळात १२ कोटींची पाणी योजना,५० लाखांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र,२५ लाखांची अद्यावत जिम आणि कम्युनिटी हॉल, प्रवराकाठी पर्यटन विकास आदी प्रस्तावित कामांसाठी सहकार्य करण्याची विनंती आ. विखेंना केली.


गावातील विविध क्षेत्रातील शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सहकार क्षेत्रातील सुयश आणि कार्याबद्दल मान्यवरांचा विखेंच्या हस्ते गौरव करण्यात आला.


 यावेळी माजी सभापती दिपक पटारे यांनी विखेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. तसेच आमदारांना जमणार नाही असे काम नवलेंनी केल्याचा उल्लेख केला.सुनील मुथा यांनी दिवंगत खा. पद्मभूषण बाळासाहेब विखे यांच्याप्रमाणेच आपण बेलापूरकडे लक्ष देण्याची विखेंना विनंती केली. सरपंच महेंद्र साळवी यांनी स्वागत केले तर उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी प्रास्ताविक केले.गावकरी मंडळाचे नेते सुनील मुथ्था यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी प्रफुल्ल डावरे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन देविदास देसाई यांनी केले.


या प्रसंगी सर्वश्री नानासाहेब शिंदे, बाळासाहेब तोरणे,जि. प. सदस्या सौ. संगीताताई गांगुर्डे, गिरीधर आसने, गणेश मुदगुले, भीमभाऊ बांद्रे,अनिल थोरात,जालिंदर कु-हे,सुधाकर खंडागळे,भाऊसाहेब कुताळ, प्रकाश नवले,प्रभाकर कु-हे,रणजित श्रीगोड,सुवालाल लुंकड, कनजीशेठ टाक,पुरुषोत्तम भराटे, साहेबराव वाबळे,पोलीस पाटील अशोक प्रधान लहानुभाऊ नागले,गटविकास अधिकारी मच्छीन्द्र धस, उपअभियंता आर. एस. पिसे, शाखा अभियंता गोराडे, बेलापूर खुर्दच्या सरपंच सौ. वर्षा महाडीक, उपसरपंच अँड. दीपक बारहाते,ग्रामविकास अधिकारी राजेंद्र तगरे, ग्रा. पं. सदस्य रमेश अमोलिक, चंद्रकांत नवले, मुश्ताक शेख, वैभव कु-हे,सौ. प्रियंका कु-हे,स्वाती अमोलिक, तबसुम बागवान, उज्वला कुताळ, मिना साळवी आदींसह मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget