आमदाराच्या ड्रायव्हर कडून आकारला दंड मास्क न लावता फिरत होता गाडीत .
श्रीरामपूर (प्रतिनिधी ) कोरोना च्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये शहर पोलिस व नगरपालिका प्रशासनाने नागरिकांच्या हितासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांची कठोर अंमलबजावणी सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून मास्क न लावता गाडी चालवणारे आमदार लहू कानडे यांच्या ड्रायव्हरला सुद्धा दंड आकारून त्याच्याकडून पाचशे रुपयाची वसुली नगरपालिका कर्मचाऱ्यांनी केली .
पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन संयुक्तपणे शहरांमध्ये जनतेच्या आरोग्याची काळजी घेत आहेत . दररोज सकाळी शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या मास्क न लावणाऱ्या व रस्त्यावर थुंकणाऱ्या गावकऱ्यांकडून दंड वसूल केला जात आहे . यासाठी नगरपालिकेने चार टीम तयार केल्या आहेत . सकाळच्या सत्रात सध्या हे काम सुरू असून दिवसभर हे काम करण्यात यावे अशी मागणी जनतेतून केली जात आहे .
शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यअधिकारी प्रकाश जाधव, आरोग्य अधिकारी आरणे,पालिकेचे कर्मचारी व पोलिस अशा दोन्ही यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करीत आहेत . राज्यांमध्ये सर्वत्र कोरोनाचे थैमान सुरू असताना स्थानिक अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन करून शहरांमध्ये कुठेही पेशंट आढळणार नाही यासाठी पुरेपूर काळजी घेतली जात आहे . सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन मध्ये शितिलथा देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू असून त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही यासाठी पोलीस व पालिका प्रशासनाने शहरांमध्ये येणाऱ्या लोकांची नाकेबंदी करावी . नवीन लोकांना शहरात येऊ देऊ नये . सबळ कारण असल्याशिवाय कोणालाही जाण्या-येण्याची परवानगी देऊ नये . अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.
शहरांमध्ये सध्या रमजान महिना सुरू असून वार्ड नंबर 2 मध्ये संध्याकाळी मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर दिसून येतात . काल सायंकाळी पोलिसांनी वॉर्ड नंबर दोन, मिल्लत नगर या भागामध्ये गस्त घालून बाहेर फिरणाऱ्या लोकांना घरात जाण्याचे आवाहन केले . मात्र पोलिस पुढे गेल्यानंतर मागे लोक बाहेर येतात . त्यासाठी शहर पोलिसांनी वार्ड नंबर दोनमध्ये चौका चौकांमध्ये पॉइंट तयार करून रमजान ईद होईपर्यंत तेथे लक्ष द्यावे तसेच लोकांनी बाहेर न येण्याची काळजी घ्यावी व आपले रक्षण आपणच करावे असे आवाहनही ज्येष्ठ लोकांनी केले आहे . शहर पोलीस रात्रंदिवस एक करून शहरांमध्ये गस्त घालत असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवीत आहेत. त्याबद्दल शहर पोलिसांच्या कामगिरीचे सुद्धा समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.