शिर्डी राजेंद्र गडकरी -देशात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे, अशा परिस्थितीत सर्वत्र बंद असून संचारबंदी जारी आहे ,अशा काळात महाराष्ट्र दिऩ आला असून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राहाता तालुक्यात कुठेही शासकीय-निमशासकीय शाळा ,महाविद्यालये याठिकाणी 1मे महाराष्ट्रदिनानिमित्त होणारा ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात येणार नाही,,साध्या पद्धतीने यावर्षी महाराष्ट्र दिन साजरा होणार असल्याची माहिती राहता तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली,
सध्या कोरोनामुळे सर्वत्र बंद आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे ,अशा परिस्थितीत एक मे हा महाराष्ट्र दिन आला असून शासकीय आदेशानुसार सर्वत्र हा दिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे, राहता तालुक्यातही 1मे महाराष्ट्र दिनी सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालये, या ठिकाणी ध्वजारोहण होणार नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी व कुठेही लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करू नये, विनाकारण फिरू नये, गर्दी करू नये, मास्क व सोशल डिस्टंन्स पाळावे, आपल्या घरातच राहावे, असे आवाहन तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे ,त्याच प्रमाणे राहता तालुक्यातील प्रत्येक गावात सरपंचांच्या अध्यक्षतेखाली गाव पातळीवर कोरोना ग्रामसुरक्षा कमिटी बनवण्यात येणार असून त्यामध्ये कामगार तलाठी, ग्रामसेवक, सदस्य राहणार असून पोलीस पाटील सदस्य सचिव राहणार आहेत, आपल्या गावात बाहेरील गावातून येणारे विद्यार्थी, कामगार पर्यटक,भाविक ,पाहुणे नातेवाईक, कोणीही असो त्यांची नोंद या समितीने ठेवणे महत्त्वाचे आहे, बाहेरून आलेल्या पण परवानगी नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला गावात प्रवेश देऊ नये, जर एखादी बाहेरील जिल्ह्यातील किंवा राज्यातील किंवा गावातील व्यक्ती आपल्या गावात येऊन राहत असेल तर त्या व्यक्तीची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करावी तसेच बाहेरील गावातून आलेल्या व्यक्तीचे चौदा दिवस विलगीकरण करणे महत्त्वाचे आहे, या सर्वांची नोंद कोरोना ग्राम सुरक्षा समितीने ठेवणे महत्त्वाचे आहे,प्रत्येक गावात अशा समित्या शासकीय परिपत्रकान्वे करणे आवश्यक आहे ,तरी सर्वांनी आपल्या गावात त्वरित कोरोना ग्रामसुरक्षा समिती स्थापन कराव्यात, असेही राहताचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी म्हटले आहे,
Post a Comment