शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र गडकरी ) श्री साईबाबामुळे अांतरराष्ट्रीय क्षेत्र असणाऱ्या व देशात स्वच्छ सुंदर शहराचा दुसरे बक्षीस मिळवून मान मिळवणाऱ्या शिर्डीतील उपनगरात नगरपंचायतीने लावलेल्या रस्त्याच्या दुभाजकातील झाडे पाण्याअभावी जळून जात असून नगरपालिकेचे पाणी नेमकी कुठे मुरते। असा प्रश्न शिर्डीकर करत आहेत, शिर्डी नगरपंचायतला करापोटी दर वर्षाला मोठी रक्कम जमा होत असते, या रकमेतून शिर्डीला स्वच्छ व सुंदर करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जात आहेत, त्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत, याच खर्चातून शिर्डी शहरातील उपनगरात रस्त्याच्या दुभाजकाला विविध वृक्षे लावण्यात आले आहेत नगर-मनमाड महामार्गच्या दुभाजकात वृक्षांना नगरपंचायत टँकरने पाणी देते तसेच सध्या लॉक डाऊन मुळे प्रदूषण नसल्याने ही वृक्षे हिरवीगार दिसत आहेत, मात्र उपनगरातील वृक्षांना पाणी नसल्यामुळे ते वाळून गेलेले आहेत, नगरपालिका फक्त नगर-मनमाड रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या वृक्षांना पाणी देते व नागरिकांना नगरपंचायत खूप मोठे काम करत आहे असे भासवते, मात्र उपनगरातील झाडे पाण्याअभावी जळून जात आहेत तिकडे कोणाचे लक्ष नाही, लाखो रुपयांचा खर्च वाया जात आहे,पाण्याच्या टँकरची फक्त बिले काढले जात असल्याचा आरोप करताना शिर्डीचे ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटणी आरोप केले आहे
Post a Comment