शिर्डी (जय शर्मा)
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन सुरू असून शिर्डीतही सर्व बंद आहे ,अत्यावश्यक सेवा जरी सुरू असल्या तरी लॉकडाऊनचे नियम पाळणे बंधनकारक असताना शिर्डीत मात्र भाजीपाला दुकानांमध्ये सोशल डिस्टंन्सचा फज्जा उडतआहे, सर्व नियम पायदळी तुडवली जात आहेत, मात्र नगरपंचायत याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे,
शिर्डीत इतर सर्व दुकाने बंद आहेत, अत्यावश्यक सेवा म्हणून भाजीपाल्याचे दुकाने, मेडिकल, किराणा दुकाने मसाल्याची दुकाने सुरू आहेत,
मात्र येथे मसाला दळण्यासाठी सध्या महिलांची गर्दी होत असून येथे सोशल डिस्टंन्स पाळला जात नाही ,पिठाच्या गिरणी वर दळण्यासाठी जाणाऱ्या महिला सोशल डिस्टंन्स पाळत नाहीत मात्र याकडे कोणाचे लक्ष नाही, भाजीपाला घेण्यासाठी गर्दी होते ,सामाजिक दुरीचे भान ठेवलं जात नाही, शिर्डीतील श्रीरामनगर येथील महाराणा प्रताप चौकात अनेक भाजीपाला विक्रेते व ग्राहक यांच्या तोंडाला मास्क नसते , सर्व नियम पायदळी तुडवून लोक भाजीपाला घेण्यासाठी गर्दी करतात, शिर्डीत श्रीसाई कृपेने व परिसरात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण नाही, मात्र अशी परिस्थिती राहिली तर दुर्दैवाने कोरोनाचा संसर्ग होण्यास वेळ लागणार नाही, असे होऊ नये म्हणून नगरपंचायतीने अशा लॉकडाऊन चे नियम मोडणाऱ्या भाजीपाला विक्रेते व ग्राहकांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे, मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यावर कारवाई होते ,शहरात फिरणाऱ्यांवर कारवाई होते, मग भाजीपाला तसेच किराणा दुकानदार व मसाला व पिठाच्या दळणाच्या गिरणीवर नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावंर कारवाई होण्याची गरज आहे, मात्र तसे होताना दिसत नाही, त्यामुळे शिर्डी नगरपंचायत ,पोलीस यांनी याकडे विशेष लक्ष देऊन अशा ठिकाणी विशेष पथकाच्या साहाय्याने कारवाई करणे गरजेचे आहे असे शिर्डीकर बोलत आहेत.
Post a Comment