(शिर्डी प्रतिनिधि राजेंद्र गडकरी)
सर्वत्र लॉकडाऊन सुरू असल्याने सर्वत्र मद्य विक्रीचे दुकाने बंद आहेत ,तरीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैधरित्या मद्य साठा, वाहतूक सुरू असल्याने राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकून एकूण 154 गुन्हे दाखल नोंद करून 52 लाख चार हजार 514 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे 59 आरोपींना अटक केली असून अकरा वाहने जप्त करण्यात आली आहेत, तसेच जिल्ह्यातील नऊ मद्यविक्री दुकाने निलंबीत केली असून शिर्डीच्या आनंदबियर शॉपीवरही परवाना निलंबनाची कारवाई झाली आहे ,
त्यामुळे शिर्डीत खळबळ उडाली आहे,
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू असताना व सर्व बंद असताना तसेच जिल्ह्यात मध्य निर्मिती, वाहतूक व विक्री या कालावधीत बंद असताना, जिल्ह्यातील काही ठिकाणी, काही मद्यविक्री दुकानातून अवैधरित्या साठा करून मद्य विक्री केली जात होती ,अशा तक्रारी जिल्हा दारू उत्पादन शुल्क अधिकार्यांकडे आल्याने राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पराग नवलकर यांच्या नेतृत्वाखाली 24 मार्च ते 28 एप्रिल 20 20 या काळात या विभागाच्या अ विभाग व ब विभाग तसेच श्रीरामपूर विभाग ,कोपरगाव विभाग, संगमनेर विभाग, अशा पाच विभागांमार्फत व दोन भरारी पथकामार्फत जिल्ह्यातील विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले, तसेच तक्रारी आलेल्या काही मद्यविक्री
दुकाने उघडून मद्यसाठा तपासण्यात आला, यावेळी अधिकाऱ्यांना मद्यसाठ्यात मोठी तफावत आढळली, त्यामुळे अशा हॉटेलंटवर कारवाई करण्यात आली, याविक्री दुकानांवर कारवाई करण्यात आली, त्यामध्ये श्रीरामपूर बेलापूर येथील हॉटेल गोल्डन चरीटर, हॉटेल गोविंदा गार्डन निमगाव जाळी, हॉटेल नेचर वडगाव पान, होटेल धनलक्ष्मी, देवळाली प्रवरा, हॉटेल उत्कर्ष सोनगाव सात्रळ, हॉटेल ईश्वर वडझिरे ,तालुका पारनेर, हॉटेल मंथन निघोज, पारनेर, याच बरोबर संगमनेरचे किरकोळ देशी दारू दुकान आणि शिर्डी जवळील निमगाव कोर्हाळे ययेथिल आनंद बिअर शॉपी याठिकाणी या विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून या सर्व नऊ मद्यविक्रीचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, शिर्डी येथील आनंद बिअर शॉपी च्यापाठीमागे बिअरचा सुमारे चोवीस लाख रुपये किमतीचा अवैध साठा सापडला होता, त्यामुळे या बिअरशॉपीवरहीपरवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे, तसेच या सर्व मद्यविक्री दुकानाकडून 154 गुन्हे नोंद करत 52 लाख 4 हजार 514 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, एकूण 59 आरोपींना अटक केली असून 11 वाहने जप्त करण्यात आली आहेत, यापुढेही शासनाच्या अटी व नियमांचे पालन न करणाऱ्या मद्यविक्री केंद्रांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अहमदनगर अधीक्षक पराग नवलकर यांनी दिला आहे.
Post a Comment