मालेगाव | प्रतिनिधी -मालेगावमध्ये करोनाचा कहर सुरूच आहे. सायंकाळी आलेल्या अहवालात एकूण ११ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर चिंता व्यक्त केली जात असतानाच मध्यरात्री प्राप्त झालेल्या दोन अहवालात जवळपास ४४ रुग्ण वाढल्यामुळे मालेगावची करोनाबाधित रुग्णांची संख्या २२७ वर पोहोचली होती. त्यानंतर पुन्हा २७ रुग्ण मालेगावात वाढले असून मालेगावी करोना बाधित रुग्णांचा आकडा आता २५३ वर पोहोचला आहे.मध्यरात्री मिळालेल्या अहवालात सहा पोलीस आढळून आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा २७६ वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत अकरा रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
Post a Comment