बेलापूर ( प्रतिनिधी )- कोरोनाच्या भितीपोटी घरातच बसा सुरक्षित रहा हा शासनाचा आदेश मानुन घरात बसलेल्या गोरगरीब परिवारासाठी लुक्कड परिवारा बरोबरच माहेश्वरी समाज तसेचअकबर टिन मेकरवाले देखील पुढे सरसावले असुन अडचणीत सापडलेल्या गोरगरीब जनतेसाठी हे देवदुतच ठरत आहे कोरोनामुळे लाँक डाऊन घोषित करण्यात आले या लाँक डाऊनमुळे दररोज कमाई करुन आपला चरितार्थ चालविणार्यांची दररोजच्या खाण्या पिण्याची पंचायत झाली हे लक्षात घेवुन सामाजिक कार्यात सतत अघाडीवर असणारे सुवालाल लुक्कड व लुक्कड परिवाराने अन्नछत्र चालु करण्याचा मनोदय व्यक्त केला बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांनी तातडीने तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याशी संपर्क साधला त्यांनी देखील परिस्थीती लक्षात घेता नियमांचे काटेकोर पालन करुन
अन्नछत्र सुरु करण्यास अनुमती दिली अन बेलापूर गावात गोरगरीबासाठी सुरु झाले मोफत अन्नछत्र . लुक्कड परिवाराने स्वः खर्चातुन सुरु केलेल्या मोफत अन्न छत्रास मदत करण्यास अनेक हात पुढे सरसावले . काहींनी वस्तू स्वरुपात तर काहींनी रोख स्वरुपात मदत केली . काही कार्यकर्त्यांनी सामाजिक वारसा जपत या कार्यात स्वतःला वाहुन घेतले . अन अनेक गोरगरीबांना मोठा आधार झाला . एक वेळच्या अन्नाची चिंता मिटली लाँक डाऊन मुळे पुशु पक्षाचेही हाल होत असल्याचे काही कार्यकर्त्यांनी सुवालाल लुंक्कड यांच्या निदर्शनास आणुन दिले मग काय पक्षासाठीही अन्नाची व्यवस्था करण्यात आली.लुक्कड परिवाराने सुरु केलेले अन्नछत्र केवळ सकाळीच सुरु असते . त्यामुळे अनेक जण सायंकाळचे देखील पार्सल घरी नेत होते . या नागरीकांची सायंकाळची सोय होणे गरजेचे आहे हे लक्षात घेवुन माहेश्वरी समाज देखील पुढे सरसावला . त्यांनी संध्याकाळच्या भोजनाची व्यवस्था केली . गरम पोळ्या भाजी पिशवीत पँक करुन त्याचे वाटप सुरु करण्यात आले . या अन्नछत्रास देखील मदत करण्यास अनेक हात पुढे सरसावत आहे . मदत देणारे आपापल्या परीने गहु , भाजीपाला व रोख रकमेच्या स्वरुपात मदत करत आहे . यात मुस्लीम समाजही मागे राहीलेला नाही , मुस्लीम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते अकबर टिन मेकरवाले यांनी आपल्या घरीच जेवण तयार करुन घर पोहोच करण्याचा निर्णय घेतला . अकबर व त्यांचे कुटुंबीय ,
मित्र परिवार दिवसा गरीब कुटुंबाच्या घरी जावुन घरी किती माणसे आहेत याची आस्थेने विचारापुस करुन सांयकाळचे आपले सर्वांचे जेवण आम्ही पोहोच करतो असे सांगुन सायंकाळी त्या कुटुंबांना न चुकता जेवण पोहोच करतात कोरोनाच्या धास्तीने सर्व प्रार्थनास्थळाचे दरवाजे बंद आहेत . परंतु अन्नछत्र ते ही मोफत चालविणार्या या देवदुतामुळे अनेकांना आपल्या मदतीला देवच धावुन आल्याची अनुभती होत आहे.
Post a Comment