बेलापूर ( प्रतिनिधी )- सोशल मिडियाचा काही कडून वापर, गैरवापर होत असतो यामध्ये प्रामुख्याने व्हाँटसअप गृप हा सर्वच क्षेत्रातील माहिती अदान - प्रदान करण्याकरीता जास्त वापरला जात असतो मात्र कोरोनाच्या गंभीर संकटामुळे " गणगोत " या व्हाटस अप ग्रुपच्या माध्यमातुन ग्रूप अॅडमीन राहुल क्षिरसागर यांनी जेष्ठ पत्रकार देवीदास देसाई यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे आवाहन करण्यात आले आणि काही अवधीतच तब्बल अठरा हजार रुपयांचा मदत निधी जमा झाला. कोरोनाचे संकट आपल्या राज्यावर आले राज्याच्या मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले नाशिक स्थित राहुल क्षिरसागर यांनी "गणगोत " या गृपवर असणार्या प्रत्येक सदस्याला रुपये दोनशे मदत करण्याचे आवाहन केले होते, या आवाहनास वरळी पासुन ते परळी पर्यत मुंबई पुणे ते मराठवाडा बिड गेवराई अहमदनगर येथील सदस्यांनी उत्तम प्रकारे प्रतिसाद दिला.बेलापूर येथील पत्रकार देविदास देसाई यांच्या खात्यावर सर्व सदस्यांनी दोनशे रुपये जमा केली काहींनी पाचशे काही सदस्यांनी एक हजार असे एकुण १७९७२ रुपये जमा झाले ही रक्कम महावितरणचे बेलापूर विभागाचे अधिकारी चेतन जाधव यांनी आँन लाईनने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाठविली आज प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये अनेक व्हाँटसअप गृप आहेत प्रत्येक गृप अँडमिनने अशा प्रकारे आवाहन करुन निधी जमविला तर थोडा थोडा मिळून फार मोठा निधी जमा होवु शकतो कोरोनाचा लढा जिंकण्यासाठी या उपक्रमाचा इतरांनीही आदर्श घेवुन आपले नाव मदत मागणाऱ्यांच्या यादीत नव्हे तर मदत करणाऱ्यांचा यादीत यावे या करीता प्रयत्न केले तर निश्चितच देशसेवा केल्याचा आनंद होईल.
सोशल मिडियातुन सोशल वर्क संपूर्ण भारतभरामध्ये व्हॉटस अॅपचे मोठे जाळे असुन तरुणांपासुन अबालवृद्धापर्यंत प्रत्येक घरात व्हॉटस अॅपचा वापर होतो, कोरोना या गंभीर आजारामुळे देशासह राज्याची अवस्था बिकट होणार असुन प्रत्येक ग्रुप अॅडमीनने अशी संकल्पना हाती घेतली तर देशभर आपला आदर्श उभा राहु शकतो.
Post a Comment