बुलडाणा जिल्ह्यात अस्वलाच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू, वनविभागणे केला पंचनामा


बुलडाणा - 28 एप्रिल बुलडाणा वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या वरवंड गावापासून 3 कि.मी. अंतरावर असल्यालेल्या एका शेतात अस्वलाच्या हल्ल्यात 45 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज 29 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता उघडकीस आली.
          जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य हा अस्वलासाठी प्रसिध्द आहे. या आरक्षीत जंगलात मोठ्या प्रमाणात अस्वलांचा अधिवास आहे. आपल्या अधिवास क्षेत्रासाठी अनेकवेळा अस्वलामध्ये झुंज होत असतात. या झुंजी व अनेकवेळा पाण्याच्या शोधात सुध्दा हे अस्वल अभयारण्य सोडून बाहेर येतात. मागील तिन वर्षा अगोदर ज्ञानगंगा अभयारण्याच्या लगतचे गाव वरवंड, डोंगरखंडाळा, डोंगरशेवली, श्रीकृष्ण नगर या भागात अस्वल व मानवी संघार्षामुळे अनेक शेतकरी व शेतमजुर जखमी झाले तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. अस्वलांचे हे वाढत्या हल्ले पाहून तज्ञांची पथक बोलावून त्यांच्या या आक्रम भुमिकेचा अभ्यास करण्यात आला होता. तज्ञ समितीने काही उपाय सुचविले होते. त्यानुसार ज्ञानगंगा अभयाण्यात अस्वलांची आवड असलेल्या खाद्यांचे रोपण करण्यात आले होते. तसेच मोठ्या प्रमाणात पाणवठे तयार करण्यात आले. जेणेकरुन अस्वल अभयारण्य सोडून बाहेर जावू नये यासाठी काळजीही घेण्यात आली.
मागील काही महिन्यांपासून अस्वल व मानवी संघर्षांमध्ये घट झालेली आहे. त्या मानाने अस्वलाचे मानवावर हल्ले करणेही कमी झाले आहे. अशातच आज 29 एप्रिल रोजी अस्वलाच्या हल्ल्यात एक इसम ठार झाल्याची घटना समोर आली याबाबत प्राप्त माहितीनुसार बुलडाणा तालुक्यातील वरवंड या गावातील मोलमजुरी करणारे किसन त्रंबक सुरु शे वय 45 यांची गाय हरपल्याने काल  28 एप्रिल रोजी सायंकाळी शोधण्यासाठी ते गावापासून 3 कि.मी. अंतरावर असलेल्या जंगलात असलेल्या परिसरात गेले असता विजय जाधव यांच्या शेतात दबा धरुन असेल्या अस्वलाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्याने घरच्यांनी त्यांचा शोध घेतला. परंतु ते कोठेही दिसून आले नाही. आज 29 एप्रिल रोजी त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या अवस्थेत दिसून आल्याने गावात एकच खळबळ उडाली.  या घटनेची माहिती वनविभाग व पोलिसांना देण्यात आली. पंचनामा करण्यासाठी बुलडाणा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश टेकाळे, वर्तुळ अधिकारी राहुल चव्हाण, वनरक्षक मोरे, कलीम बिबन शेख, वन्यजीव विभागाचे गिते व इतर घटनास्थळी हजर होते. त्यांचा मृतदेहवर बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात येणार आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget