शिर्डी राजेंद्र गडकरी -कोपरगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दिवसरात्र परिश्रम घेणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचाही कोरोनापासून बचाव व्हावा व कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी आमदार आशुतोषदादा काळे यांनी सदर संरक्षक साहित्य या शासकीय कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे. व या साहित्याचे आमदार काळे यांनी स्वतः लॉकडाऊनचे नियम पाळत सामाजिक दुरी ठेवत वाटप केले आहे , सध्या कोरोना मुळे सर्व शासकीय यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे अशा कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना ही दुर्दैवाने कोरोणाचा संसर्ग होऊ नये म्हणून त्यांची विशेष काळजी घेऊन त्यांनाही साहित्य वाटण्यात आले आहे, कोपरगाव येथे पंचायत समिती कार्यालयात आ, आशुतोषदादा काळे यांनी आज पंचायत समिती कर्मचारी,
तालुका आरोग्य कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे यांचे कर्मचारी, डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम आरोग्य केंद्र कर्मचारी, तालुक्यातील सर्व आशा सेविका, आंगणवाडी सेविका, मदतनीस, पोलीस कर्मचारी, महसूल कर्मचारी, कोपरगाव नगरपरिषद स्वछता कर्मचारी, सर्वेक्षण कर्मचारी व पत्रकार यांना ५०० पीपीई किट, ४२ इन्फ्रारेड थर्मामीटर, ३००० सॅनिटायझर, ३००० एन ९५ मास्क, १०० फेस शिल्ड मास्क व ३००० ट्रिपल लेयर मास्कचे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून वाटप केले, यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुन काळे, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, कोपरगाव ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, कोपरगाव शहराचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, कोपरगाव ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे, सर्व आपत्कालीन व्यवस्थेतील कर्मचारी, पत्रकार आदी उपस्थित होते.
Post a Comment