February 2020

श्रीरामपूर  (प्रतिनिधी  )--श्रीरामपूर तहसील कार्यालयाची जुनी परंतु आजही भक्कम अवस्थेत उभ्या असलेल्या ईमारतीचा वापर कैद्या करीता करण्यात यावी अशी मागणी पुढे येवु लागली असुन कमी खर्चात प्रशासनास भक्कम असा तुरुंग उभा करता येईल त्या करीता प्रशासनाने योग्य पावले उचलावीत                           श्रीरामपूर  तहसील कार्यालयास नविन ईमारत झाल्यामुळे श्रीरामपूर तहसील कार्यालयाचा तसेच उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय नविन ईमारतीत स्थलांतरीत करण्यात आल्यामुळे जुन्या दगडी बांधकाम असलेल्या ईमारत आज खंडर बनली आहे भविष्यात श्रीरामपूर जिल्हा होण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने कच्च्या कैद्यासाठी तुरुंग बनविण्यात यावा     कमी खर्चात भक्कम असा तुरुंग या ठिकाणी  उभा राहु शकतो  असे अनेकांचे मत आहे             
 श्रीरामपूर     तहसील कार्यालय व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जुन्या ईमारतीतुन नविन ईमारतीत स्थलांतरीत झाल्यामुळे जुनी ईमारत मोकळी पडलेली आहे या ईमारतीत आता श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन व कैद्यासाठी तुरुंग आहे या ठिकाणी कैद्यासाठी चार खोल्या व महीला कैद्यासाठी एक खोली असुन श्रीरामपूर शहर व तालुक्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता या ठिकाणी भक्कम असा तुरुंग उभारणे गरजेचे आहे काही वर्षापुर्वी याच तुरुंगातुन कैदी पळाल्याच्या घटना घडलेल्या होत्या त्यामुळे संबधीत अधीकार्यांनी तात्पुरती उपाय योजना केली होती परंतु आज या ठिकाणी भरपूर जागा उपलब्ध असल्यामुळे अन वाढती गुन्हेगारी लक्षात घेवुन कैद्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस अशी उपाय योजना करणे गरजेचे आहे आजही प्रत्येक बराकीत क्षमतेपेक्षा जादा कैदी भरलेले आहेत एखादी घटना घडल्यास कैद्याची संख्या वाढल्यास कैदी ईतर ठिकाणी  स्थलांतरीत करावे लागतात त्यात प्रशासनाचा वेळ व पैसा खर्च  होतो त्यामुळे श्रीरामपूर तहसील कार्यालयाची दगडी बांधकांम असलेली ईमारत मजबुत स्थितीत आसुन या ईमारतीचा वापर कैद्यासाठी झाला तर प्रशासनाच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरेल

भैरवनाथ नगर-प्रतिनिधी श्रीरामपूर तालुक्यातील गोन्धवनी भैरवनाथ नगर परिसरात काल रात्री स्व.बापूसाहेब गाडे यांच्या वस्तीवर  येउन गावरान गाय व दोन दिवसाच्या कालवडीवर हल्ला केला.वासराला बिबट्याचे दात लागल्याच्या खुणा पड़लेल्या आहेत. यावेळी धनंजय मधू कर गाडे यांन्नी प्रत्यक्ष दर्शनी बिबट्यास  बघीतले आहे.यावेळी धनंजय गाडे यांनी फटाके फोडताच  बिबट्याने तेथून धुम ठोकली.           दरम्यान श्री.प्रणय गाडे यांनी लागलीच भ्रमनध्वनी वरुन वनविभाग आधिकारी श्री.देवखिळे अ.नगर  यांना ही माहिती दिली आहे. सन 2005 साली याच वस्तीवर एक बिबट्या जेरबंद झाला आहे . बिबट्याच्या धुमाकुळीमुळे ग्रामस्थांमध्ये सध्या भितिचे वातावरन निर्मान झाले आहे.वनविभागाने संबंधीत ठिकानी पिंजरे लावावेत आशी मागणी होत आहे.

Toश्रीरामपूर  (प्रतिनिधी  )- रास्त भाव दुकानामधील ई - पाँज मशिनच्या सेवेत काही तांत्रीक अडथळे आल्यास दुकानदारांना विनाकारण कार्डधारकांच्या रोषाचा सामना करावा लागतो ही बाब लक्षात घेवुन अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांनी आँफ लाईन धान्य वाटपास परवानगी दिली असुन या निर्णयाचे अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष देविदास देसाई  यांनी स्वागत केले आहे              शासनाने धान्य वाटपात पारदर्शकता आणण्यासाठी ई - पाँज प्रणालीचा वापर सुरु केला परंतु  पाँज मशिन हाताळताना दुकानदारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता अचानक रेंज गायब होते अंगठा न जुळणे आशा अनेक समस्या दुकानदारापुढे उभ्या होत्या गोर गरीब जनता काम धंदा बुडवुन धान्य खरेदी करण्यासाठी धान्य दुकानात जाते अन मशिन बंद असेल तर दुकानदारांनाच शिव्याशाप घालत जाते वेळ प्रसंगी वादावादीच्याही घटणा घडलेल्या आहेत काही ठिकाणी  रागातुन कार्डधारकाने पाँज मशिनच फोडल्या होत्या या सर्व बाबी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांच्या निदर्शनास आणुन दिल्या असता त्यांनी तातडीने पाँज मशिनच्या सेवेत तांत्रीक अडथळे आल्यास अडथळे बाजुला ठेवुन धान्य वाटप करण्यास अनुमती दिल्याची माहीती विधान सभेच्या प्रश्नत्तराच्या तासात विधान सभेच्या सभागृहात दिली असुन या निर्णयामुळे मशिनचे अडथळे असल्येल्या दुकानदारानां दिलासा मिळणार आहे या निर्णयाचे धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले असल्याची माहीती जिल्हाध्यक्ष देविदास देसाई सचिव रज्जाक पठाण कार्याध्यक्षा मिनाताई कळकुंबे विजय दिघे मोहीते पा विश्वासराव जाधव सुरेश उभेदळ बाबा कराड वहाडणे कैलास बोरावके गणपत भांगरे रावसाहेब भगत गजानन खाडे बजरंग दरंदले माणिक जाधव भाऊसाहेब वाघमारे बनिचंद खरात खताळ आदिनी दिली आहे.

श्रीरामपुर (प्रतिनिधी )-शहरातील श्री सिद्धार्थ प्रमोद संघवी यांचे नमो एजन्सीचे मागील दरवाजा उघडून स्प्लेंडर फॅशन प्रो सीडी डीलक्स अशा मोटरसायकलचे ब्लॉक पिस्टन शॉकप्सर असे एकूण 55 हजार 660 रुपये किमतीचा मुद्देमाल कोणीतरी चोरट्यांनी चोरून नेले वगैरे फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 154 / 2020 भादवि कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचे तपासकामी रात्रगस्त पोलीस निरीक्षक संभाजी पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुधीर हापसे, पोलीस हेडकॉन्स्टेबल जोसेफ साळवी , पोलीस नाईक दत्ता दिघे पोलीस कॉन्स्टेबल रघुवीर कारखेले यांनी कसोशीने तपास करून संशयित आरोपीचा पाठलाग करून शोध घेतला असता आरोपी नामे शाम मधुकर कांबळे वय ३३ वर्ष राहणार  दिऊरा हॉटेल जवळ रमा नगर दत्तनगर व संतोष गंगाधर मोरे राहणार सदर यांनी केला असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी नंबर १ ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे 114460 रुपये किमतीचे ब्लॉक पिस्टन व गुन्ह्यातील वापरलेली 25000 रुपये किमतीची मोटरसायकल नंबर एम एच 17-AQ- 7173 असे हस्तगत करण्यात आले असून आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे अधिक तपास सुरू आहे.  
सदरची कारवाई माननीय श्री सागर पाटील प्रभारी पोलिस अधीक्षक अहमदनगर, माननीय डॉ.  दिपाली काळे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व माननीय श्री राहुल मदने उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर विभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट साहेब ,सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील, पोलीस  हेडकॉन्स्टेबल सुधीर हापसे , पोलीस कॉन्स्टेबल जोसेफ साळवी ,पोलीस हेडकॉन्स्टेबल जालिंदर लोंढे, पोलीस नाईक दत्ता दिघे, पोलीस कॉन्स्टेबल रघुवीर कारखेले, पोलीस नाईक शरद वाढेकर पोलीस नाईक  सचिन बैसाने पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन पोकळे ,पोलीस कॉन्स्टेबल राजू महेर, पोलीस कॉन्स्टेबल पंकज गोसावी ,यांच्या पथकाने ही कारवाई केली.

श्रीरामपुर शहरातील मोरगे वस्ती वार्ड नं ७ येथून एकाच रात्री शाईन मोटरसायकल नंबर MH-17-CJ-3944 व शाईन मोटरसायकल नंबर MH-17-BQ-4804 तसेच एक फॅशन प्रो मोटरसायकल नं. MH-17-AQ-1884 अशा एकूण१ लाख 45 हजार रुपयांच्या मोटरसायकली चोरून नेल्याने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 153/2020 भादवि कलम 369, 34 प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील शाईन मोटरसायकल नंबर MH-17-CJ-3944  GPS यंत्रणा सक्रिय असल्‍याने व सदर चे लोकेशन धुळे जिल्हा असे मिळाले ने पोलीस ठाणे अंमलदार पोलीस पोलीस हेडकॉन्स्टेबल पगारे यांनी तात्काळ सदर वाहन व आरोपीचा शोध घेणे कामी पोलीस हेडकॉन्स्टेबल जालिंदर लोंढे पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन पोकळे पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार यांचे पथकाला रवाना केले व नियंत्रण कक्ष तसेच मोहाडी  पोलीस स्टेशन यांच्या संपर्क केला असता मोहाडी  पोलीस स्टेशन जिल्हा धुळे येथील पोलीस निरीक्षक ठाकरे पोलीस कॉन्स्टेबल अजित वाघ पोलीस कॉन्स्टेबल देवा व श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे मदतीने मोहाडी टोल नाका येथे सापळा लावला असता आरोपी व गुन्ह्यातील गाडी येत असल्याचे दिसले त्यांना पोलिस पथकाची चाहूल लागल्याने २ मोटरसायकल स्वरांनी काही अंतरावरून गाड्या पाठी मागे फिरून पसार झाले शाईन मोटरसायकल नंबर MH-17-CJ-3944 यानी  टोल नाक्याचे पुढे जोरात गाडी घेतली असता त्याचा सुमारे ४ किलोमीटर पाठलाग केला असता आरोपींनी गाडी सोडून जंगलात पळ काढला त्यापैकी एक आरोपी नामे कलम ठबु भोरीया राहणार काकडवा तालुका कुक्षी जिल्हा धार मध्यप्रदेश यास ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी करून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे अधिक तपास सुरू आहे सदरची कारवाई  माननीय श्री सागर पाटील प्रभारी पोलिस अधीक्षक अहमदनगर, माननीय डॉ. दिपाली काळे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व माननीय राहुल मदने उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट साहेब पोलीस कॉन्स्टेबल जालिंदर लोंढे,पोलीस नाईक शरद वांढेकर ,पोलीस नाईक सचिन बैसाने, पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन पोकळे, पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार ,पोलीस कॉन्स्टेबल पंकज गोसावी, यांच्या पथकाने कामगिरी केली. 

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)- तालुक्यातील संवत्सर चौफुलीपासून रेल्वे पुलाच्या ठिकाणी काही अज्ञात व्यक्ती रस्त्यावरील वाहने अडवून लूट करीत असल्याची माहिती कोपरगाव पोलीस ठाण्याला मिळाली होती. त्यानंतर मंगळवारी पहाटे 1 च्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून दोन आरोपींना अटक केली आहे. मात्र, सहाजण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. आरोपींकडून पोलिसांनी चाकू, सुरे, लोखंडी पाईप, स्टंप, कटावणीसह मोटार सायकल जप्त केली आहे. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.मंगळवारी पहाटेच्या सुमारास रेल्वे पुलावर पाच ते सहा व्यक्ती धारदार हत्याराची भीती दाखवत वाहनचालकांची लूट करीत असल्याची माहिती कोपरगाव पोलीस ठाण्याला मिळाली. पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ राऊत,पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. पी. पुंड पोलीस वाहनाने संवत्सर चौफुलीकडून रेल्वे पुलाकडे निघाले असता येणार्‍या जाणार्‍या लाईटच्या उजेडात दोन मोटार सायकलवर पाच ते सहाजण मध्यरात्रीनंतर रस्त्यावर उभे राहुन वाहन चालकांना शस्त्राचा धाक दाखवून लुट करीत असल्याचे आढळून आले.पोलिसांनी त्यांचे वाहन बाजुला लावून छुपा पाठलाग केला. त्यातील दोन आरोपी तुषार उर्फ गोकुळ राजेंद्र दुशिंग (वय 24,रा.टिळकनगर), निलेश प्रदिप चव्हाण (वय 26, रा.भगवाचौक गांधीनगर, कोपरगाव) यांना अटक केली. त्यांच्याकडून चाकू, सुरे, लोखंडी पाईप, स्टंप, कटावणीसह,विना नंबरची हिरोहोंडा मोटार सायकल जप्त करण्यात आली केली.अन्य आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. या आरोपींना पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी अविनाश भगुरे व त्याचे दोन मित्र रा.कोपरगाव हेदेखील टोळीत असल्याची माहिती दिली. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले असून यापूर्वीही या आरोपींना रस्ते लुट प्रकरणात अटक करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. कोपरगाव पोलीस ठाण्यात रस्ते लुटीचा गुन्हा आरोपींवर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर पुढील तपास करत आहेत.

प्रतिनिधी। । अहमदनगर जिल्हा हा सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे, तसा तो आता गुन्हेगारी क्षेत्रात आघाडीवर चालला आहे, जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे, जिल्ह्यात अनेक ठिकाणी सध्या पोलिसांचे प्रभारी राज चालू असून सर्वकाही साई भरोसे सुरू असल्याने जिल्ह्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे, जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डी पावन भूमीत हीच परिस्थिती असून शिर्डीत वाढलेली गुन्हेगारी वाढतच चालली आहे ,त्यामुळे  शिर्डीतील सर्वसामान्य ग्रामस्थ व साईभक्त त्रस्त झाले आहे त्यामुळे  या गुन्हेगारीच्या विरोधात  तीव्र  आंदोलन करणार  असल्याचा इशारा पत्रकार जितेश मनोहरलाल लोकचंदाणी यांनी एका   पत्रकान्वये दिला आहे,
    अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात क्षेत्रफळाने मोठा असलेला जिल्हा असून जिल्हा सामाजिक, आर्थिक ,शैक्षणिक ,राजकीय क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहे ,अशा या जिल्ह्यात आता गुन्हेगारांनी मोठा कळस केला आहे, गुन्हेगारी क्षेत्रात हा जिल्हा आता आघाडीवर चालला असल्याचे दिसत आहे, मात्र अहमदनगर जिल्ह्यात पोलिसांची संख्या कमी असल्याचे थातूरमातूर कारण सांगत पोलीस दलाचे गुन्हेगारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, त्यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच  आहे ,सर्वत्र अवैध वाहतूक, अवैध धंदे ,अवैध दारू, मटका, जुगार, वाळूतस्करी गुटखा विक्री ,गुंडगिरी, मोठ्या प्रमाणात सुरू असताना त्याकडे कमी पोलिस बळाचे कारण दाखवून जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात आहे, मात्र त्याचे खरे कारण वेगळेच असून या दोन नंबर धंदा व गुन्हेगारी क्षेत्राकडून मोठ्या प्रमाणात चिरीमिरी मिळत असल्याने अनेक पोलिस कर्मचारी, पोलिस अधिकारी एवढेच नव्हे तर आपली चालू कमाई बंद होईल म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारीही याकडे दुर्लक्ष करत आहेत, जनता साईभक्त, शिर्डीकर यांनी अनेकदा निवेदने व सांगून तसेच वृत्तपत्र ,टीव्ही वर अनेकदा बातम्या येऊनही पोलीस मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, उलट गुन्हेगारी विरोधात आवाज उठविणाऱ्यांना पोलीसांनी गूण्हेगारांना हाताशी धरूण  खोटे गुन्हे दाखल केले.  अवैध धंद्यांवर, व गुन्हेगारीवर कारवाई करण्याऐवजी त्यांना अप्रत्यक्ष पाठबळ देण्यात येत आहे, जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक सध्या प्रभारी आहे, हीच परिस्थिती शिर्डी सह इतर ही पोलिस स्टेशनला आहे ,अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असताना देशात विदेशात प्रसिद्ध असणाऱ्या आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र श्री साईबाबांच्या शिर्डी या पावन भूमीत सध्या राजरोसपणे पाकीटमारी, गुंडगिरी, लुटमार ,अवैध धंदे, दारू मटका ,जुगार ,गांजा ,चरस विक्री अवैध वाहतूक ,मारामाऱ्या, गुटका विक्री पोलिसांच्या पाठबळावर सुरू आहे ,त्यामुळे शिर्डी तील सर्वसामान्य ग्रामस्थ, साईभक्त यांना त्याचा मोठा त्रास होत आहे शिर्डीतिल ग्रामस्थांनी या बाबत ग्रामसभा घेउन शिर्डीत चालत असलेल्या अवैद्य व्यवसायाला विरोध करुणही काहीच कारवाई केली गेली नाहि अनेकदा निवेदने देऊन वृत्तपत्रात बातम्या येऊनही त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे कारवाई करण्याऐवजी चिरीमिरी वर अधिक डोळा असणाऱ्या काही पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी यांना आपण श्री साईंच्या पावन नगरीत काम करत आहोत, आपली कर्तव्य जबाबदारी आपण विसरत आहोत,, याचेही भान राहिले नाही, त्यामुळे अशा गुन्हेगारीला पाठबळ देणाऱ्या व आपले कर्तव्य ,जबाबदारी असणाऱ्या या मग तो कोणीही असो त्यावर  साईंचा दंडा पडल्याशिवाय राहत नाही, साईंच्या पावन भूमीत सेवा करण्याची संधी योगायोगाने व श्री साईकृपेने  मिळाली असून या संधीचा चांगला उपयोग पोलीस व अधिकाऱ्यांनी करून येथील गुन्हेगारी व गुन्हेगारांवर वचक ,आळा बसावा यासाठी प्रत्येक पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांनी प्रामाणिक, निस्वार्थीपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे ,अन्यथा या गुन्हेगारी विरोधात व गुन्हेगारीला पाठबळ देणाऱ्या पोलीस कर्मचारी, अधिकारी यांच्याविरोधात आमरण  उपोषण करण्याचा  इशारा या पत्रकात पत्रकार जितेश मनोहरलाल लोक चांदनी शिर्डी यांनी  दिला आहे,

अकोले ( प्रतिनिधी  )- केवळ सवंग प्रसिध्दीसाठी ह भ प निवृत्ती महाराज ईंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार्या तृप्ती देसाई यांच्यावरच कठोर कारवाई करण्यात यावी तसेच त्याच्यावर असलेले गुन्हे विचारात घेवुन त्यांना तडीपार करण्यात यावे अशी मागणी डाँ. विजय मकासरे यांनी केली आहे                  ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख यांच्या समर्थनार्थ  अकोले तालुका बंद ठेवुन निषेध सभा घेण्यात आली होती   .या निषेध सभेला डाॅ.विजय मकासरे यांनीही हजेरी लावून महाराजांना आपला पाठिंबा दर्शवला आहे.
ह.भ.प .निवृत्ती महाराज देशमुख यांच्या पुञ प्राप्तीसाठी केलेल्या वक्तव्याविषयी तृप्ती देसाई यांनी गुन्हा दाखल करण्याची  जी मागणी केली आहे ती केवळ प्रसिध्दि साठी आहे असे मत डाॅ.विजय मकासरे यांनी मांडले आहे .
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या व्यक्ती विषयी काहीही विधाने करुन आपली प्रसिद्धी करवुन घेणे हाच तृप्ती देसाई यांचा हेतु असतो असेही यावेळी मकासरे म्हणाले
.त्याच प्रमाणे त्यांच्यावर अन्य ९ गुन्हे दाखल आहेत .तरीही प्रशासन त्यांना अटक किंवा तडिपार का करत नाही असा सवाल मकासरे यांनी केला आहे 
ह भ प निवृत्ती महाराजांची  ईंदोरीकर यांची सुरु असलेली  बदनामी आता थांबवावी अन्यथा मोठे जनांदोलन उभे करु  असे मत अकोले येथे निवृत्ती महाराज देशमुख यांच्या समर्थनार्थ आयोजीत करण्याता आलेल्या निषेध सभेत अनेकांनी  व्यत्क केले.डाँ विजय मकासरे यांच्यावर तृप्ती देसाई यांनी २०१७ मध्ये प्राणघातक हल्ला केला होता तो खटला न्यायप्रविष्ट आहे

बुलडाणा - 24 फेब्रूवारी
देशभरात CAA, NRC व NPR या विधेयकाच्या विरोधात विविध आंदोलन सुरु असून आज शेकडो नागरिक या विधेयकाच्या विरोधात मोताळा ते बुलडाणा असा 25 किलोमीटरचा पायी मोर्चा काढून आपली भूमिका मांडली व आपल्या मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.या विधेयकाच्या विरोधात 25 किलोमीटर पायी मोर्चा देशात फक्त येथेच काढण्यात आला.
     मोताळा ते बुलडाणा एनआरसी विरोधात 25
किलोमिटरचा प्रवास करीत शेकडो लोकांनी तिरंगा पदयात्रा काढली. या तिरंगा पदयात्रेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची शेख मुक्तार शेख अबरार यांनी साकारलेली वेशभूषा लक्षवेधी ठरली.सुधारित नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदनी विरोधात दिल्लीतील शाहीन बाग येथे मागील दीड महिन्या पेक्षा जास्त काळापासून निदर्शने सुरू आहेत. याच धर्तीवर बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा व  बुलडाण्यातही शाहीन बाग आंदोलन कुल जमाती तंझीमच्या नेतृत्वात सुरू आहे. दरम्यान आज 24 फेब्रवारीला उपोषणाच्या 45 व्या दिवशी मोताळा ते  बुलडाणा असा 25 कि.मि ची सर्वधर्मीय तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा शहरात पोहचल्यावर जयस्तंभ चौकातील शाहीनबाग आंदोलनात सहभागी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
२४ फेब्रूवारी जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता कुल जमाती तंझीमच्या वतीने तिरंगा पदयात्रेचे आयोजन मोताळा येथील शाहीनबाग उपोषण मंडप ते बुलडाणा शाहीनबाग उपोषण मंडपादरम्यान करण्यात आले. राजूर घाटाच्या चढणीनंतर  शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथील तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करून जयस्तंभ चौक येथे मोर्चा पोहचल्यावर शाहीनबागच्या समोर याचे रूपांतर एका जनसभेत झाले. यावेळी कुल जमाती तंझीमच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आपली लढाई कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून केंद्र सरकारद्वारे पारित करण्यात आलेल्या एनआरसी, सीएए व एनपीआरच्या विरोधात आहे.
आपल्या आंदोलनामुळे कोणत्याही धर्माच्या नागरिकांना त्रास होऊ नये, याकडे सर्वांनी लक्ष द्यावे, असे आवाहन कुल जमाती तंझीमच्या वतीने करण्यात आले. या तिरंगा पदयात्रेत शेकडोच्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

महेश लोढा
 साईबाबांच्या पावन भूमि शिर्डी येथे  स्वच्छतेत हिंदुस्तानात तीसरा  व महाराष्ट्र राज्यात दूसरा क्रमांक पटकवनार्या शिर्डी नगरपंचायतच्या स्वीक्रुत नगरसेवक पदी शिर्डीतिल दान्शुर  रतीलाल (काका) लोढा यांचे  चिरंजीव महेश लोढा यांची व शिर्डी येथील समाज सेवक दीपक वारुळे यांच्या अर्धांगिनी एडवोकेट शीतल दीपक वारुळे यांची शिर्डी नगरपंचायतच्या स्वीक्रुत नगरसेवक पदी बिनविरोध  निवड करण्यात आली असल्याने शिर्डीत जल्लोष साजरा करण्यात आला
एडवोकेट शीतल दीपक वारुळे

अहमदनगर, दि.24 - 'सायेब, मागच्या काळात कर्जमाफीसाठी लईवेळा हेलपाटे मारावे लागले. यावेळी फक्त थम्ब (अंगठा) दिला, अन काम झालं. अगदी सुटसुटीत आहे!,' राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावच्या पोपटराव भानुदास मोकाटे यांची ही भावना. त्यांनी आज ती थेटपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचवली आणि या दोघांनीही, ही भावना म्हणजे या सरकारसाठी आशीर्वादच आहेत. आनंदात राहा आणि हे आशीर्वाद कायम असू द्या, असे त्यांना सांगितले.

            महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणासह प्रत्यक्ष कार्यवाहीची सुरुवात आज झाली. प्रातिनिधीक स्वरुपात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांतील याद्यांचे प्रसिद्धीकरण करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रालयातील इतर मंत्री तसेच अधिकारी यांनी त्यातील काही गावांतील पात्र लाभार्थीं यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला. अहमदनगर जिल्ह्यातील ब्राह्मणी (ता. राहुरी) आणि जखणगाव (ता. नगर) येथील शेतकर्‍यांना या संवादाची संधी मिळाली. नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राजाराम माने आणि जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे यावेळी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दुपारी एक वाजता या संवादास सुरुवात केली. राज्यात कर्जमुक्ती योजनेच्या कार्यवाहीत प्रथम क्रमांकावर असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी त्यांनी सर्वप्रथम संवाद साधला. सुरुवातीला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जिल्ह्यातील कोणत्या गावातून आलात, हे विचारले. त्यानंतर पोपटराव मोकाटे यांच्याशी सुरुवातीला उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी संवाद साधला. किती कर्ज होते? कशासाठी घेतले...अशी विचारणा केली. त्यावर पोपटरावांनी ऊसासाठी २८ हजार रुपये कर्ज घेतले. त्यावरील व्याजासह ३२ हजार रुपये झाल्याचे सांगितले. हे कर्ज माफ होणार असल्याने अतिशय आनंद आहे. प्रशासन आणि सरकारचं खरोखरंच आभार, असे त्यांनी सांगितले.

            पोपटरावांनी आभार मानताच मु्ख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आभार कसले... हे तर कर्तव्यच असल्याचे सांगितले आणि तुमचे आभाराचे शब्द म्हणजे आमच्यासाठी आशीर्वाद असल्याची भावना व्यक्त केली.

             बळीराजाला दुखावू नका, त्यांची कामे वेळेत पूर्ण करा

शिर्डी प्रतिनिधि श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्‍या नवनियुक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री.ए.के.डोंगरे, (भा.प्र.से.) यांनी सहपत्‍नीक श्री साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेवुन संस्‍थानचा पदभार स्विकारला.

प्रतिनिधी ।
            सावळीविहीर कारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिर्डी विमानतळा वर जाऊन  विविध विमानांच्या टेकअप व लँडिंग चा मनसोक्त  आनंद घेत तसेच तेथील स्वच्छतेचा आदर्श घेऊन स्वच्छतेचे धडे गिरवत संत गाडगे महाराज यांची आठवण काढत मनोमन स्वच्छतेची शपथ घेतली,
     सावळीविहीर कारवाडी येथील श्री हनुमान क्लास या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी पर्यंतच्या सुमारे पन्नास चिमुकल्या विद्यार्थ्यांची सहल नुकतीच शिर्डी जवळील काकडी येथील श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेली होती, नेहमी आकाशात दिसणारी विमाने, आता प्रत्यक्ष या विमानतळावर समक्ष बघण्याचा आनंद या विद्यार्थ्यांनी घेतला, तसेच दिल्ली, बेंगलोर आदी ठिकाणाहून आलेल्या 180 सिटर विमानांचे लँडिंग तसेच टेकअप बघण्याचा चा आनंदही या विद्यार्थ्यांनी यावेळी अनुभवला ,त्याचबरोबर या विमानतळावरील स्वच्छता, शिस्त, सुरक्षा याविषयी येथील अधिकारी वर्गाकडून जाणून घेत या विमानतळा प्रमाणेच नेहमीच स्वच्छता राखण्याची मनोमन शपथही या विद्यार्थ्यांनी यावेळी घेतली, या छोट्याशा चिमुकल्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेशात पाहून दूरदूरहून विमानाने आलेल्या  प्रवाशांनी व  जाणाऱ्या येणाऱ्या साईभक्तांनी या मुलांबरोबर फोटो काढले, हितगुज साधले ,मुलांना चॉकलेट, खाऊ देण्यात आला, यावेळी विमानतळावर जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती बाबासाहेब दिघे ,जिल्हा परिषद सदस्य आशाताई दिघे ,,पत्रकार राजेंद्र गडकरी , भाजयुमोचे   तालुका अध्यक्ष रावसाहेब एखंडे यांनी व विमानतळ अधिकाऱ्यांनी या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे यावेळी स्वागत व कौतुकही केले, ही सहल यशस्वी करण्यासाठी या शाळेचे शिक्षक संदीप घोलप सर सोमनाथ वाबळे सर, सोनम रा मॅडम आदींनी विशेष परिश्रम घेतले ,

एकरूखे (वार्ताहर)- पत्नीच्या चारित्र्यावर संयश घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी दांड्याने प्रहार करुन तिला जिवे ठार मारले. तसेच मृतदेह पोत्यात भरुन तो निर्जनस्थळी नेऊन त्यावर पेट्रोल टाकून तो पेटवून दिला. ही घटना शनिवारी रात्री राहाता तालुक्यातील एकरुखे येथे घडली. हे कृत्य केल्यानंतर पती सुनील जनार्धन लेंडे हा राहाता पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने स्वतःहून केलेल्या कृत्याची माहिती पोलिसांना दिली आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी)शहरातून जाणार्‍या-येणार्‍या प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटमार करणार्‍या टोळीला कोतवाली पोलिसांनी गजाआड केले आहे. कय्युम काझी कुरेशी (वय- 23 रा. बाबा बंगाली, नगर), सद्दाम मोहम्मद अली (वय- 23 रा. झेंडीगेट, नगर), मोईन बादशहा शेख (वय- 20 रा. भोसले आखाडा, नगर), मुसेफ नासीर शेख (वय- 20 रा. मुकुंदनगर) असे अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक व्हिस्टा कार, एक मांझा कार, सहा मोबाईल, चाकू असा 11 लाख, 46 हजार 500 रूपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे.

बुलढाणा - 23 फरवरी
AIMIM के पूर्व विधायक वारिस पठान ने हाल में 100 करोड हिंदुओं पर 15 करोड मुसलमान भारी है,ऐसा विवादित बयान दिया जिस पर काफी बवाल होने के बाद पठान ने माफी भी मांग ली किंतु पठान के विवादित बयान पर अब भी तीखी प्रतिक्रियाएं सामने आ रही है. बुलढाणा जिले के ग्राम जांबुलधाबा में 22 फरवरी को आयोजित शिव छत्रपती जयंती के कार्यक्रम को संबोधित करते हुए बुलढाणा से शिवसेना के विधायक संजय गायकवाड की जुबान फिसल गई और उन्होंने के लिए अपशब्दों का इस्तेमाल करते हुए सोमवार को मुंबई में "खडा फाड" देने की चेतावनी दे दी है.विधायक गायकवाड के इस विवादित भाषण का वीडियो सोशल मीडिया पर बड़ी तेजी से वायरल हो रहा है.इस भाषण का अनुवाद पाठकों के लिए जस का तस पेश है जो इस तरह से है,,,
भाषण का अनुवाद :- मराठी से हिंदी
हमारे घर की शेरनियां बाहर आ गई तो तुम इतना घबरा गए,हम साथ मे आ गए तो क्या करेंगे,मेरा तो वारिस पठान को इतना ही कहना है "देशद्रोही लांडया" अब तक तुमने जितनी महिलाएं घर मे रखे, उन महिलाओं को गुलाम बना कर रखे,उन्हें बाहर नही आने दिया,उन्हें बताया कि मिलिट्री आएगी तुम्हे घर से निकालेगी,तुम्हे इस देश से बाहर करेगी,सब को झूठ बोलकर बाहर लाया और फिर कहा कि 15 करोड मुसलमान 100 करोड हिन्दू पर भारी पडेगा,, ऐसा ही कहा ना,,तू भूल गया वारिस पठान,,,शिवराया का मावला तेरी लाखों की फौज पर 500 मावले भारी है,ये तू भूल गया,,आज भी शिवराया की जमात इस राज्य में जिंदा है,,तू 15 करोड की क्या बात करता है मैं तुझे सोमवार को विधानसभा में मिलता हुँ तू अपनी माँ का लाल होगा तो मुझे वहां बता 15 करोड तुझे खड़ा नही फाड दिया तो मैं मेरे बाप की औलाद नही.

गळनिंब (प्रतिनिधी)-- समाजात चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करण्याची परंपरा सिध्देश्वर चहा चौक बहुउद्देशीय  संस्थेच्या वतीने सुरू करून समाजापुढे चांगला आदर्श घालून दिला त्यातूनच चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींना निश्चितच प्रेरणा मिळेल असा विश्वास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी व्यक्त केला              
गळनिंब तालुका श्रीरामपूर येथील सिद्धेश्वर चहा चौक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने  14 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉक्टर किरण तुपे व शिक्षण क्षेत्रात विशेष कार्य करणारे रावसाहेब चासकर यांना विशेष सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बहीरट बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार देविदास देसाई होते तर प्रमुख अतिथी म्हणून मा . बांधकाम सभापती बाबासाहेब दिघे प्रवरा कारखान्याचे संचालक संपतराव चितळकर बिनसाद न्यूजचे संपादक असलम बिनसाद प्रा.डाॅ.एकनाथ ढोणे सर पंचायत समिती सदस्या कल्याणी काळे एडवोकेट रवींद्र हाळनोर प्रवरा बँकेचे संचालक बापूसाहेब वडीतके अनिल थोरात संजय कुदनर,उपसभापती आण्णासाहेब शिंदे, तुकाराम चिंधे,देवस्थानचे अध्यक्ष सुनिल शिंदे,हेड काॅन्सटेबल पोकळे, लोंढे,आदी उपस्थित होते  यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉक्टर किरण तुपे म्हणाले की वैद्यकीय सेवा करताना अनेक ठिकाणी सन्मान झाले परंतु माझ्या मायभूमीतील जन्मभूमी तील झालेला सन्मान  हा काही वेगळाच आहे या सन्मानाने मी भारावून गेलो असून माझे कार्य करण्यास मला आणखी ऊर्जा मिळाली आहे यावेळी पत्रकार देविदास देसाई, बांधकाम समितीचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, लोणी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नितेश सूर्यवंशी,चासकर सर, यांचीही भाषणे झाली यावेळी गळनिंब व परिसरात उल्लेखनीय कार्य करणारे प्रा .डॉक्टर  विजय कडनोर, डॉक्टर अनुराधा चिंधे, प्राध्यापक डॉक्टर किरण थोरात, प्राध्यापक सुयोग चिंधे, ऋषिकेश बाचकर, प्राध्यापक रवींद्र मारकड, प्राध्यापक अनिल चिंधे, प्राध्यापक ज्योती चिंधे, अक्षय पिलगर, प्रतिभा कडनर आदिचांही  संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला कार्यक्रमास आदिनाथ वडितके,  बोरुडे सर. सौ चित्ते मॅडम, गळनिंब चे सरपंच संदीप जाटे, उपसरपंच दशरथ चिंधे, सेवा संस्थेचे चेअरमन विष्णु चिंधे, आप्पासाहेब मारकड, शामराव काळे, साहेबराव भोसले आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी मच्छिंद्र खेमनर गणेश डोमाळे, कैलास ऐनोर संजय वडीतके, अजित देठे, संजय शिंदे, संदीप शेरमाळे, अशोक कडनोर, सचिन चिंधे, भाऊसाहेब विश्वासे, संदीप कचरे, इंद्रभान चिंधे, केशव कडनोर, मनोज विश्वासे मंजाबापू खेमनर, महेश चिंधे, गणेश कडनोर सौरभ वडितके, हनुमान गायकवाड सचिन चिंधे, सयाजी भोसले, राहुल शेरमाळे, श्रीधर शिंदे, रोहित विश्वासे आदींनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलासराव चिंधे सर यांनी केले तर कैलास ऐनोर यांनी आभार मानले प्रास्ताविक संदीप शेरमाळे यांनी केले


बेलापूर  ( प्रतिनिधी  )-- बेलापूर  व परिसरात चोरट्यांनी धुमाकुळ घालण्यास सुरुवात केली आहे बंद घरे पाहुन त्याच घरात चोर्या झाल्या असुन दिवसा बंद घराची टेहाळणी करुन रात्री चोरी करणारी टोळी सक्रीय झालेली आसावी असा अंदाज आहे      बेलापूर  ऐनतपुर येथील गट नंबर ८१ मधील विहीरीवर असलेले २० हजार रुपये किमतीचे जनरेटर चोरट्यांनी चोरुन नेले या बाबत बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांनी बेलापूर पोलीस स्टेशनला लेखी तक्रार केली श्रीरामपूर  बेलापूर रोडवरील काही सी सी टि व्ही कँमेरँतही गाडीवर जनरेटर नेताना चोरटे कैद झालेले आहे ही बाब नवले यांनी बेलापूर पोलीसांच्या निदर्शनास आणुन दिली परंतु काहीच कारवाई  झाली नसल्याचे नवले यांचे म्हणणे आहे त्यांनतर चारच दिवसांनी श्रीमती माया कैलास ढवळे यांच्या बंद घराचे कुलुप तोडुन चोरट्यांनी साडे सात तोळे सोन्याचे दागीने लंपास केले या घरातुन जवळपास पावणे दोन लाख रुपयाचा ऐवज चोरीस गेला या बाबत पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हा अन्वेषन विभागाच्या पथकानेही घटनास्थळी भेट दिली बेलापूर पोलीसांनी तातडीने श्वान पथक तसेच ठसे तज्ञाना निमंत्रीत केले होते  त्यांनतर दोनच दिवसानी पोलीस स्टेशन पासुन अगदी हाकेच्या अंतरावर असणार्या एस टी स्टँडची कँटिंन चोरट्यांनी फोडली कँटींनचा मागील दरवाजा तोडुन चोरट्यांनी आत प्रवेश करुन कँटींनच्या गल्ल्यातील आठशे रुपये रोख एक कुरमुर्याची गोणी चहा पावडर साखर लपांस केली काल पुन्हा चोरट्यानी अनेक बंद घरांना टारगेट केले लक्ष्मी नारायण नगर मधील दिपक जधव यांचे बंद घर चोरट्यांनी फोडले परंतु तेथे काहीच हाती लागले नाही त्यांनतंर रमेश मिसाळ व राजेंद्र भराटे यांचेही बंद असलेले घर चोरट्यांनी फोडले परंतु तेथेही चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही बेलापूर येथील पटारे यांची मोटार सायकल चोरट्यांनी चोरुन नेली असुन सलग घडणार्या या घटनामुळे नागरीकामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे  बेलापूर  पोलीस या घटनाचा तपास करत असुन आत्ता पर्यत फक्त एकच गुन्हा दाखल झालेला आहे.

शिरसगाव[वार्ताहर]श्रीरामपूर शहरात मराठा समाज बहुउद्देशीय विकास सेवा प्रतिष्ठान श्रीरामपूर यांचे वतीने हिंदवी सम्राज्याचे संस्थापक एक आदर्श शासनकर्ता तसेच शौर्य,पराक्रम,ध्येयवाद,कुशल संघटन,कडक,नियोजनबद्ध प्रशासन असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अभूतपूर्व अशी भव्य पायी शोभायात्रेने,ढोल ताशाचे गजरात,आनंदाने साजरी करण्यात आली.प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मंगल आरती करण्यात आली.त्यावेळी प्रांताधिकारी अनिल पवार,तहसीलदार प्रशांत पाटील,नगराध्यक्षा अनुराधा आदिक,किशोरअण्णा निर्मळ,आ.लहू कानडे,माजी आ.भाऊसाहेब कांबळे,माजी आ.भानुदास मुरकुटे,मंजुश्री मुरकुटे,नारायण डावखर,वंदना मुरकुटे,अशोक थोरे,आदी मान्यवर उपस्थित होते.प्रतिमा पूजन झाल्यावर शिवाजी महाराज व जिजाऊमासाहेब यांची वेशभूषा असलेले कलाकार दोन रथातून विराजमान होते.
मिरवणूक सुरु होताना प्रथम महिला,पुरुष सवार असलेले घोडेस्वार होते.त्यावेळी पारंपारिक वेशात,पारंपारिक वाद्द्यासह वाघ्या मुरळी,पोतराज,आदींनी आपली कला सदर केली.त्यामागे शिवरायाचे झेंडे हातात घेऊन भव्य पायी शोभायात्रा फटाक्याची  आतिषबाजी करीत थत्ते ग्राउंड बेलापूर रोड ते शिवाजी रोडमार्गे मेनरोड मार्गे परत थत्ते ग्राउंडला आल्यावर विसर्जन करण्यात आले.फार मोठ्या संख्येने महिला पुरुष,पंचक्रोशीतील ग्रामस्थ,विद्यार्थी,बालके सह्भागी झाले होते.सर्व महिला पुरुषांनी भगवे फेटे बांधल्याने आकर्षक मिरवणूक दिसत होती.राममंदिर चौकात भजनी मंडळाने शिवाजी महाराज व तुकाराम महाराज यांच्या भेटीचा देखावा अप्रतिम सादर करण्यात आला.इतका मोठा उत्साह यावर्षी जास्त दिसत होता.शहरात.चौकाचौकात,गावागावात प्रचंड उत्साह जाणवला.शिवजयंती महोत्सवाचे नियोजन मराठा समाज बहुउद्देशीय विकास सेवा प्रतिष्ठान श्रीरामपूर,जिजाऊ महिला मंडळ,वधूवर सूचक मंडळ,युवा ग्रुप,यांच्या वतीने करण्यात आले होते.यावेळी संस्थापक अध्यक्ष विलासराव जाधव,शिवजयंती उत्सव अध्यक्ष किशोरअण्णा निर्मळ,यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र मोरगे,भागवत लासुरे,रावसाहेब तोडमल,व सर्व सहकारी,महिला मंडळ सीमा जाधव व सहकारी, तसेच युवा ग्रुपचे सर्व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.त्याठिकाणी शिवाजी महाराज यांची अप्रतिम रांगोळी व सर्व रस्त्यांनी रांगोळीच्या पायघड्या प्रज्ञा सातपुते,कलावती देशमुख,ज्योती कवडे,घातल्या होत्या.आभार प्रदर्शन विलासराव जाधव यांनी केले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पक्षाची भूमिका सी.ए.ए. व एन.आर.सी. कायद्याच्या विरोधात स्पष्ट केली आहे. पक्षाच्या भुमिकेशी मी सहमत आहे. परंतु मी ज्या खुर्चीवर आहे. त्याठिकाणाहून या कायद्याच्या विरोधात ठराव करण्यासाठी सर्व नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक आहे. माझी खुर्ची राजकारण करण्याची नाही, अशी भुमिका नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी स्पष्ट केली.नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये पालिकेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. विषय पत्रिकेवरील विषय संपल्यानंतर ऐनवेळेच्या विषयात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला आमचा विरोध असल्याचे अंजुम शेख, मुजफ्फर शेख यांनी सांगितले. अन् पालिकेच्या सभागृहाने तसा ठराव घेण्याची मागणी त्यांनी केली. यादरम्यान या कायद्याचे समर्थन व विरोध करणार्‍या नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. त्यावेळी नगराध्यक्षा यांनी आपली भुमिका स्पष्ट केली यावेळी मुजफ्फर शेख म्हणाले की, एका जातीला टार्गेट करुन हा कायदा करण्यात आला आहे. मात्र, हा देश सर्वांचा आहे. कोणाच्या एकट्याच्या बापाची जहागिरी नाही. हा कायदा देशातील 130 कोटी लोकांना रांगेत उभा करणार आहे. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पुरावे द्यावे लागणार आहेत. आमचे पुरावे काढायला गेले, तर देशच आमच्या नावावर करावा लागेल, असे मुजफ्फर शेख म्हणाले.या कायद्याचा त्रास हिंदू समाजातील लोकांनाही होणार आहे. मात्र, मुस्लिमांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यात आली आहे. सरकारला या कायद्याच्या आडून आरक्षण संपवायचे आहे. आम्ही 600 वर्ष राज्य केले आहे, मेलो तरी आम्ही येथेच राहणार आहोत. त्यामुळे आम्हाला काढण्याचा प्रश्न नसल्याचे ते म्हणाले.यावेळी अंजुम शेख यांनी पालिकेत काँग्रेसचे 22 नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीचे 6 असून त्यांची भुमिका या कायद्यास विरोध करण्याची आहे. त्यामुळे कोण हजर आहे, किंवा नाही याचे आम्हाला घेणेदेणे नाही. ज्यांना ठरावाचा विरोध करायचा त्यांना करू द्या, ज्यांना समर्थन द्यायचे ते देणार आहेत, असे ते म्हणाले.अंजुम शेख यांनी नागरिकत्व कायद्याविरोधात जो ठराव मांडला त्या ठरावाला आमचा पाठिंबा असल्याचे नगरसेवक संजय फंड यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे नगसेवक रवी पाटील, किरण लुणिया, जितेंद्र छाजेड, दीपक चव्हाण, वैशाली चव्हाण यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यास आमचा पाठिंबा असल्याचे लेखीपत्र नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांना दिले. त्यानंतर प्रत्येकाने यावर आपली भूमिका मांडावी असे ठरले.यावेळी रवी पाटील म्हणाले की, प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान आहे. येथील मुस्लिमांना आमचा विरोध नाही, परंतु बाहेरून येणार्‍यांना विरोध आहे. फाळणी झाली तेव्हा 25 टक्के हिंदू पाकिस्तानामध्ये होते, आज ते एक ते दोन टक्केही राहिले नाहीत, मात्र त्यावेळी जेवढे मुस्लिम बांधव भारतात होते, ते कित्येक पटीने वाढले आहेत.याचा अर्थ येथे सर्वांना चांगल्या वातावरणात राहता येते, हे स्पष्ट होते. प्रत्येक देशात आपल्या देशातील नागरिकांची नोंद असते. आपल्याकडेही शिस्त लागली पाहिजे. त्यामुळे या कायद्याला आमचा पाठिंबा असल्याचे रवी पाटील यांनी स्पष्ट केले. भाजपाचे किरण लुणिया यांनी हा कायदा देशहिताचा आहे, त्यामुळे या कायद्यास आमचे पूर्ण समर्थन असल्याचे स्पष्ट केले.यावेळी प्रत्येक नगरसेवकांनी आपले म्हणणे मांडले. उपस्थित नगरसेवकांपैकी 19 नगरसेवकांनी सी.ए.ए. व एन.आर.सी. कायद्याला विरोध दर्शविला तर सात नगरसेवकांनी समर्थन केले. शेवटी प्रत्येक नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय हा ठराव संमत होणार नाही, असे नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी स्पष्ट केले.
अफवांवर विश्वास ठेवू नका : नगराध्यक्षा सी.ए.ए. व एन.आर.सी. विरोधात ठराव करण्याबाबत पत्र दिल्याने सभागृहात संभ्रामावस्था निर्माण झाली. हा विषय ऐनवेळच्या विषयात न घेता अजेंड्यावर घेऊन बहुमताच्या बाजूने ठराव होईल, माझी भुमिका स्पष्ट आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांनी सी.ए.ए. व एन.आर.सी. कायद्याला विरोध करून आपली भुमिका स्पष्ट केली आहे. पक्षाच्या भुमिकेशी मी सहमत आहे.

बुलडाणा - 18 फेब्रूवारी
राज्यात गुटखाबंदी आहे, मात्र बाहेरील राज्यातून अवैधरित्या गुटखा आपल्या राज्यात आढळल्यास त्या विषयी तातडीने तक्रार करावी,असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक 1800 222 365 या क्रमांकावर, 022-26592361 ते 65 किंवा comm.fda-mah@nic.in  या ई मेल पत्त्यावर तक्रार केल्यास त्यावर तातडीने कारवाई केली जाणार आहे.
       डॉ. शिंगणे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गुटखा बंदीच्या कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी,असे निर्देश संबधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. या संदर्भात मोक्का सारखा कायदा लावता येईल का याबाबतची शक्यता पडताळून पाहण्याचे गृह विभागाला सांगण्यात आले आहे. राज्यात गुटखा बंदी असली तरी इतर राज्यातून गुटख्याचा साठा, वाहतूक आणि विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास सामान्य नागरिकांनीही सावध राहून यासंदर्भात आपली तक्रार नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
226 कोटी किंमतीचा गुटखा जप्त
राज्यात गुटखाबंदी लागू झाल्यापासून आतापर्यंत एकूण सुमारे 226 कोटी 53 लाख किंमतीचा गुटखा व तत्सम प्रतिबंधीत अन्न पदार्थांचा साठा जप्त केला आहे. 4782 प्रकरणी राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोषीं विरुद्ध राज्यातील विविध न्यायालयात एकूण 6206 खटले दाखल करण्यात आले आहे.

गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनाचा परवाना रद्द

महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधात्मक आदेश काढल्यानंतर इतर राज्यांनी देखील गुटखा या अन्न पदार्थांवर प्रतिबंध केलेला आहे. इतर राज्यांमध्ये पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी या अन्न पदार्थांच्या उत्पादन व विक्रीत बंदी नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या सिमा भागातून चोरी/छुप्या मार्गाने हे अन्न पदार्थांची वाहतूक करुन विक्री केली जाते असे लक्षात आल्याने. गुटखा, पानमसाला व तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थाची वाहतूक कायमची थांबावी म्हणून प्रशासनाने प्रतिबंधित अन्नपदार्थाची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा वाहतुकीचा परवाना तसेच वाहन चालकाचा परवाना रद्द / निलंबित करण्याबाबत प्रशासनाने शासनाच्या मान्यतेने परिपत्रक काढलेले आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-श्रीरामपूर नगरपालिका भुयारी गटार अपहार प्रकरणी अहमदनगर जिल्ह्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपाधिक्षक प्रांजली सोनवणे यांनी 29 माजी नगरसेवकांना समजपत्र बजावले आहे. त्यात काही विद्यमान व सत्ताधारी नगरसेवकांचाही समावेश आहे.श्रीरामपूर नगरपालिकेत केंद्र व राज्य सरकार यांच्या निधीतून भुयारी गटार योजना राबविण्यात आली. परंतु त्यामध्ये अपहार झाल्याची तक्रार मोरया फाउंडेशनचे केतन खोरे यांनी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यावेळचे जिल्हा पोलीस प्रमुख इशु सिंधू यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेतली होती. आता या प्रकरणाचा तपास जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपाधीक्षक प्रांजली सोनवणे या करत आहेत.या प्रकरणाच्या तपासाबाबत चौकशी करण्यासाठी दि. 13 फेब्रुवारी 2020 रोजी तपासी अधिकारी डीवायएसपी प्रांजली सोनवणे यांनी पालिकेतील सुमारे 29 आजी-माजी नगरसेवक व नगरसेविकांना समजपत्र पाठविले आहे. त्यांना दि. 20, 22 व 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता नगर येथील पोलिस अधिक्षक कार्यालयातील गुन्हे शाखेत चौकशीसाठी बोलवले आहे.हे समजपत्र बाजावलेल्या आजी-माजी नगरसेवकांमध्ये विद्यमान नगरसेवक भारती अनिल कांबळे, शेख अंजुम परवेज मुसा अहंमद, मुजफ्फर पापाभाई शेख, श्रीनिवास लक्ष्मीनारायण बिहाणी, राजेश अलघ, सुभाष विठ्ठल गांगड तर माजी नगसेवकांमध्ये सौ. सुधा संतोष कांबळे, आशिष विजय धनवटे, सौ. शेख निलोफर महंमद, रवींद्र गिरधारीलाल गुलाटी, राजश्री राजेंद्र सोनवणे, सुमैया मुनीर उर्फ मुन्ना पठाण, श्याम अर्जुन अढांगळे, जायदाबी कलीम कुरेशी, अण्णासाहेब रेवजी डावखर, राजन चुग, मंगल सुभाष तोरणे, कांचन दिलीप सानप, संगीता अरुण मंडलिक, व्यंकटरमन कैलास नारायण, शेख सायरा सलीम, राघेश्वरी सुनील मोरे, राजेंद्र नानासाहेब म्हांकाळे, मंजुश्री सिद्धार्थ मुरकुटे, निर्मला भाऊसाहेब मुळे, दत्तात्रय साबळे, कल्याण बुधमल कुंकूलोळ यांचा समावेश आहे. या 29 जणांच्या यादीत समाविष्ट असलेल्या नगरसेविका रजियाबी शब्बीर जहागीरदार यांचे डिसेंबर 2018 मध्ये निधन झाले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget