भैरवनाथ नगर-प्रतिनिधी श्रीरामपूर तालुक्यातील गोन्धवनी भैरवनाथ नगर परिसरात काल रात्री स्व.बापूसाहेब गाडे यांच्या वस्तीवर येउन गावरान गाय व दोन दिवसाच्या कालवडीवर हल्ला केला.वासराला बिबट्याचे दात लागल्याच्या खुणा पड़लेल्या आहेत. यावेळी धनंजय मधू कर गाडे यांन्नी प्रत्यक्ष दर्शनी बिबट्यास बघीतले आहे.यावेळी धनंजय गाडे यांनी फटाके फोडताच बिबट्याने तेथून धुम ठोकली. दरम्यान श्री.प्रणय गाडे यांनी लागलीच भ्रमनध्वनी वरुन वनविभाग आधिकारी श्री.देवखिळे अ.नगर यांना ही माहिती दिली आहे. सन 2005 साली याच वस्तीवर एक बिबट्या जेरबंद झाला आहे . बिबट्याच्या धुमाकुळीमुळे ग्रामस्थांमध्ये सध्या भितिचे वातावरन निर्मान झाले आहे.वनविभागाने संबंधीत ठिकानी पिंजरे लावावेत आशी मागणी होत आहे.
Post a Comment