श्रीरामपूर (प्रतिनिधी )--श्रीरामपूर तहसील कार्यालयाची जुनी परंतु आजही भक्कम अवस्थेत उभ्या असलेल्या ईमारतीचा वापर कैद्या करीता करण्यात यावी अशी मागणी पुढे येवु लागली असुन कमी खर्चात प्रशासनास भक्कम असा तुरुंग उभा करता येईल त्या करीता प्रशासनाने योग्य पावले उचलावीत श्रीरामपूर तहसील कार्यालयास नविन ईमारत झाल्यामुळे श्रीरामपूर तहसील कार्यालयाचा तसेच उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय नविन ईमारतीत स्थलांतरीत करण्यात आल्यामुळे जुन्या दगडी बांधकाम असलेल्या ईमारत आज खंडर बनली आहे भविष्यात श्रीरामपूर जिल्हा होण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने कच्च्या कैद्यासाठी तुरुंग बनविण्यात यावा कमी खर्चात भक्कम असा तुरुंग या ठिकाणी उभा राहु शकतो असे अनेकांचे मत आहे
श्रीरामपूर तहसील कार्यालय व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जुन्या ईमारतीतुन नविन ईमारतीत स्थलांतरीत झाल्यामुळे जुनी ईमारत मोकळी पडलेली आहे या ईमारतीत आता श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन व कैद्यासाठी तुरुंग आहे या ठिकाणी कैद्यासाठी चार खोल्या व महीला कैद्यासाठी एक खोली असुन श्रीरामपूर शहर व तालुक्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता या ठिकाणी भक्कम असा तुरुंग उभारणे गरजेचे आहे काही वर्षापुर्वी याच तुरुंगातुन कैदी पळाल्याच्या घटना घडलेल्या होत्या त्यामुळे संबधीत अधीकार्यांनी तात्पुरती उपाय योजना केली होती परंतु आज या ठिकाणी भरपूर जागा उपलब्ध असल्यामुळे अन वाढती गुन्हेगारी लक्षात घेवुन कैद्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस अशी उपाय योजना करणे गरजेचे आहे आजही प्रत्येक बराकीत क्षमतेपेक्षा जादा कैदी भरलेले आहेत एखादी घटना घडल्यास कैद्याची संख्या वाढल्यास कैदी ईतर ठिकाणी स्थलांतरीत करावे लागतात त्यात प्रशासनाचा वेळ व पैसा खर्च होतो त्यामुळे श्रीरामपूर तहसील कार्यालयाची दगडी बांधकांम असलेली ईमारत मजबुत स्थितीत आसुन या ईमारतीचा वापर कैद्यासाठी झाला तर प्रशासनाच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरेल
Post a Comment