Toश्रीरामपूर (प्रतिनिधी )- रास्त भाव दुकानामधील ई - पाँज मशिनच्या सेवेत काही तांत्रीक अडथळे आल्यास दुकानदारांना विनाकारण कार्डधारकांच्या रोषाचा सामना करावा लागतो ही बाब लक्षात घेवुन अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांनी आँफ लाईन धान्य वाटपास परवानगी दिली असुन या निर्णयाचे अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष देविदास देसाई यांनी स्वागत केले आहे शासनाने धान्य वाटपात पारदर्शकता आणण्यासाठी ई - पाँज प्रणालीचा वापर सुरु केला परंतु पाँज मशिन हाताळताना दुकानदारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता अचानक रेंज गायब होते अंगठा न जुळणे आशा अनेक समस्या दुकानदारापुढे उभ्या होत्या गोर गरीब जनता काम धंदा बुडवुन धान्य खरेदी करण्यासाठी धान्य दुकानात जाते अन मशिन बंद असेल तर दुकानदारांनाच शिव्याशाप घालत जाते वेळ प्रसंगी वादावादीच्याही घटणा घडलेल्या आहेत काही ठिकाणी रागातुन कार्डधारकाने पाँज मशिनच फोडल्या होत्या या सर्व बाबी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांच्या निदर्शनास आणुन दिल्या असता त्यांनी तातडीने पाँज मशिनच्या सेवेत तांत्रीक अडथळे आल्यास अडथळे बाजुला ठेवुन धान्य वाटप करण्यास अनुमती दिल्याची माहीती विधान सभेच्या प्रश्नत्तराच्या तासात विधान सभेच्या सभागृहात दिली असुन या निर्णयामुळे मशिनचे अडथळे असल्येल्या दुकानदारानां दिलासा मिळणार आहे या निर्णयाचे धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले असल्याची माहीती जिल्हाध्यक्ष देविदास देसाई सचिव रज्जाक पठाण कार्याध्यक्षा मिनाताई कळकुंबे विजय दिघे मोहीते पा विश्वासराव जाधव सुरेश उभेदळ बाबा कराड वहाडणे कैलास बोरावके गणपत भांगरे रावसाहेब भगत गजानन खाडे बजरंग दरंदले माणिक जाधव भाऊसाहेब वाघमारे बनिचंद खरात खताळ आदिनी दिली आहे.
Post a Comment