श्रीरामपुर (प्रतिनिधी )-शहरातील श्री सिद्धार्थ प्रमोद संघवी यांचे नमो एजन्सीचे मागील दरवाजा उघडून स्प्लेंडर फॅशन प्रो सीडी डीलक्स अशा मोटरसायकलचे ब्लॉक पिस्टन शॉकप्सर असे एकूण 55 हजार 660 रुपये किमतीचा मुद्देमाल कोणीतरी चोरट्यांनी चोरून नेले वगैरे फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 154 / 2020 भादवि कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचे तपासकामी रात्रगस्त पोलीस निरीक्षक संभाजी पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुधीर हापसे, पोलीस हेडकॉन्स्टेबल जोसेफ साळवी , पोलीस नाईक दत्ता दिघे पोलीस कॉन्स्टेबल रघुवीर कारखेले यांनी कसोशीने तपास करून संशयित आरोपीचा पाठलाग करून शोध घेतला असता आरोपी नामे शाम मधुकर कांबळे वय ३३ वर्ष राहणार दिऊरा हॉटेल जवळ रमा नगर दत्तनगर व संतोष गंगाधर मोरे राहणार सदर यांनी केला असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी नंबर १ ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे 114460 रुपये किमतीचे ब्लॉक पिस्टन व गुन्ह्यातील वापरलेली 25000 रुपये किमतीची मोटरसायकल नंबर एम एच 17-AQ- 7173 असे हस्तगत करण्यात आले असून आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे अधिक तपास सुरू आहे.
सदरची कारवाई माननीय श्री सागर पाटील प्रभारी पोलिस अधीक्षक अहमदनगर, माननीय डॉ. दिपाली काळे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व माननीय श्री राहुल मदने उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर विभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट साहेब ,सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुधीर हापसे , पोलीस कॉन्स्टेबल जोसेफ साळवी ,पोलीस हेडकॉन्स्टेबल जालिंदर लोंढे, पोलीस नाईक दत्ता दिघे, पोलीस कॉन्स्टेबल रघुवीर कारखेले, पोलीस नाईक शरद वाढेकर पोलीस नाईक सचिन बैसाने पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन पोकळे ,पोलीस कॉन्स्टेबल राजू महेर, पोलीस कॉन्स्टेबल पंकज गोसावी ,यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Post a Comment