श्रीरामपुर शहरातील मोरगे वस्ती वार्ड नं ७ येथून एकाच रात्री शाईन मोटरसायकल नंबर MH-17-CJ-3944 व शाईन मोटरसायकल नंबर MH-17-BQ-4804 तसेच एक फॅशन प्रो मोटरसायकल नं. MH-17-AQ-1884 अशा एकूण१ लाख 45 हजार रुपयांच्या मोटरसायकली चोरून नेल्याने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 153/2020 भादवि कलम 369, 34 प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील शाईन मोटरसायकल नंबर MH-17-CJ-3944 GPS यंत्रणा सक्रिय असल्याने व सदर चे लोकेशन धुळे जिल्हा असे मिळाले ने पोलीस ठाणे अंमलदार पोलीस पोलीस हेडकॉन्स्टेबल पगारे यांनी तात्काळ सदर वाहन व आरोपीचा शोध घेणे कामी पोलीस हेडकॉन्स्टेबल जालिंदर लोंढे पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन पोकळे पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार यांचे पथकाला रवाना केले व नियंत्रण कक्ष तसेच मोहाडी पोलीस स्टेशन यांच्या संपर्क केला असता मोहाडी पोलीस स्टेशन जिल्हा धुळे येथील पोलीस निरीक्षक ठाकरे पोलीस कॉन्स्टेबल अजित वाघ पोलीस कॉन्स्टेबल देवा व श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे मदतीने मोहाडी टोल नाका येथे सापळा लावला असता आरोपी व गुन्ह्यातील गाडी येत असल्याचे दिसले त्यांना पोलिस पथकाची चाहूल लागल्याने २ मोटरसायकल स्वरांनी काही अंतरावरून गाड्या पाठी मागे फिरून पसार झाले शाईन मोटरसायकल नंबर MH-17-CJ-3944 यानी टोल नाक्याचे पुढे जोरात गाडी घेतली असता त्याचा सुमारे ४ किलोमीटर पाठलाग केला असता आरोपींनी गाडी सोडून जंगलात पळ काढला त्यापैकी एक आरोपी नामे कलम ठबु भोरीया राहणार काकडवा तालुका कुक्षी जिल्हा धार मध्यप्रदेश यास ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी करून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे अधिक तपास सुरू आहे सदरची कारवाई माननीय श्री सागर पाटील प्रभारी पोलिस अधीक्षक अहमदनगर, माननीय डॉ. दिपाली काळे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व माननीय राहुल मदने उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट साहेब पोलीस कॉन्स्टेबल जालिंदर लोंढे,पोलीस नाईक शरद वांढेकर ,पोलीस नाईक सचिन बैसाने, पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन पोकळे, पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार ,पोलीस कॉन्स्टेबल पंकज गोसावी, यांच्या पथकाने कामगिरी केली.
Post a Comment