गळनिंब (प्रतिनिधी)-- समाजात चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करण्याची परंपरा सिध्देश्वर चहा चौक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सुरू करून समाजापुढे चांगला आदर्श घालून दिला त्यातूनच चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींना निश्चितच प्रेरणा मिळेल असा विश्वास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी व्यक्त केला
गळनिंब तालुका श्रीरामपूर येथील सिद्धेश्वर चहा चौक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने 14 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉक्टर किरण तुपे व शिक्षण क्षेत्रात विशेष कार्य करणारे रावसाहेब चासकर यांना विशेष सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बहीरट बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार देविदास देसाई होते तर प्रमुख अतिथी म्हणून मा . बांधकाम सभापती बाबासाहेब दिघे प्रवरा कारखान्याचे संचालक संपतराव चितळकर बिनसाद न्यूजचे संपादक असलम बिनसाद प्रा.डाॅ.एकनाथ ढोणे सर पंचायत समिती सदस्या कल्याणी काळे एडवोकेट रवींद्र हाळनोर प्रवरा बँकेचे संचालक बापूसाहेब वडीतके अनिल थोरात संजय कुदनर,उपसभापती आण्णासाहेब शिंदे, तुकाराम चिंधे,देवस्थानचे अध्यक्ष सुनिल शिंदे,हेड काॅन्सटेबल पोकळे, लोंढे,आदी उपस्थित होते यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉक्टर किरण तुपे म्हणाले की वैद्यकीय सेवा करताना अनेक ठिकाणी सन्मान झाले परंतु माझ्या मायभूमीतील जन्मभूमी तील झालेला सन्मान हा काही वेगळाच आहे या सन्मानाने मी भारावून गेलो असून माझे कार्य करण्यास मला आणखी ऊर्जा मिळाली आहे यावेळी पत्रकार देविदास देसाई, बांधकाम समितीचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, लोणी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नितेश सूर्यवंशी,चासकर सर, यांचीही भाषणे झाली यावेळी गळनिंब व परिसरात उल्लेखनीय कार्य करणारे प्रा .डॉक्टर विजय कडनोर, डॉक्टर अनुराधा चिंधे, प्राध्यापक डॉक्टर किरण थोरात, प्राध्यापक सुयोग चिंधे, ऋषिकेश बाचकर, प्राध्यापक रवींद्र मारकड, प्राध्यापक अनिल चिंधे, प्राध्यापक ज्योती चिंधे, अक्षय पिलगर, प्रतिभा कडनर आदिचांही संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला कार्यक्रमास आदिनाथ वडितके, बोरुडे सर. सौ चित्ते मॅडम, गळनिंब चे सरपंच संदीप जाटे, उपसरपंच दशरथ चिंधे, सेवा संस्थेचे चेअरमन विष्णु चिंधे, आप्पासाहेब मारकड, शामराव काळे, साहेबराव भोसले आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी मच्छिंद्र खेमनर गणेश डोमाळे, कैलास ऐनोर संजय वडीतके, अजित देठे, संजय शिंदे, संदीप शेरमाळे, अशोक कडनोर, सचिन चिंधे, भाऊसाहेब विश्वासे, संदीप कचरे, इंद्रभान चिंधे, केशव कडनोर, मनोज विश्वासे मंजाबापू खेमनर, महेश चिंधे, गणेश कडनोर सौरभ वडितके, हनुमान गायकवाड सचिन चिंधे, सयाजी भोसले, राहुल शेरमाळे, श्रीधर शिंदे, रोहित विश्वासे आदींनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलासराव चिंधे सर यांनी केले तर कैलास ऐनोर यांनी आभार मानले प्रास्ताविक संदीप शेरमाळे यांनी केले
Post a Comment