बेलापूर ( प्रतिनिधी )-- बेलापूर व परिसरात चोरट्यांनी धुमाकुळ घालण्यास सुरुवात केली आहे बंद घरे पाहुन त्याच घरात चोर्या झाल्या असुन दिवसा बंद घराची टेहाळणी करुन रात्री चोरी करणारी टोळी सक्रीय झालेली आसावी असा अंदाज आहे बेलापूर ऐनतपुर येथील गट नंबर ८१ मधील विहीरीवर असलेले २० हजार रुपये किमतीचे जनरेटर चोरट्यांनी चोरुन नेले या बाबत बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांनी बेलापूर पोलीस स्टेशनला लेखी तक्रार केली श्रीरामपूर बेलापूर रोडवरील काही सी सी टि व्ही कँमेरँतही गाडीवर जनरेटर नेताना चोरटे कैद झालेले आहे ही बाब नवले यांनी बेलापूर पोलीसांच्या निदर्शनास आणुन दिली परंतु काहीच कारवाई झाली नसल्याचे नवले यांचे म्हणणे आहे त्यांनतर चारच दिवसांनी श्रीमती माया कैलास ढवळे यांच्या बंद घराचे कुलुप तोडुन चोरट्यांनी साडे सात तोळे सोन्याचे दागीने लंपास केले या घरातुन जवळपास पावणे दोन लाख रुपयाचा ऐवज चोरीस गेला या बाबत पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हा अन्वेषन विभागाच्या पथकानेही घटनास्थळी भेट दिली बेलापूर पोलीसांनी तातडीने श्वान पथक तसेच ठसे तज्ञाना निमंत्रीत केले होते त्यांनतर दोनच दिवसानी पोलीस स्टेशन पासुन अगदी हाकेच्या अंतरावर असणार्या एस टी स्टँडची कँटिंन चोरट्यांनी फोडली कँटींनचा मागील दरवाजा तोडुन चोरट्यांनी आत प्रवेश करुन कँटींनच्या गल्ल्यातील आठशे रुपये रोख एक कुरमुर्याची गोणी चहा पावडर साखर लपांस केली काल पुन्हा चोरट्यानी अनेक बंद घरांना टारगेट केले लक्ष्मी नारायण नगर मधील दिपक जधव यांचे बंद घर चोरट्यांनी फोडले परंतु तेथे काहीच हाती लागले नाही त्यांनतंर रमेश मिसाळ व राजेंद्र भराटे यांचेही बंद असलेले घर चोरट्यांनी फोडले परंतु तेथेही चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही बेलापूर येथील पटारे यांची मोटार सायकल चोरट्यांनी चोरुन नेली असुन सलग घडणार्या या घटनामुळे नागरीकामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे बेलापूर पोलीस या घटनाचा तपास करत असुन आत्ता पर्यत फक्त एकच गुन्हा दाखल झालेला आहे.
Post a Comment