श्रीरामपूर शहरात शिवजयंती शोभायात्रेने,झेंड्यानी उत्साहात संपन्न

शिरसगाव[वार्ताहर]श्रीरामपूर शहरात मराठा समाज बहुउद्देशीय विकास सेवा प्रतिष्ठान श्रीरामपूर यांचे वतीने हिंदवी सम्राज्याचे संस्थापक एक आदर्श शासनकर्ता तसेच शौर्य,पराक्रम,ध्येयवाद,कुशल संघटन,कडक,नियोजनबद्ध प्रशासन असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अभूतपूर्व अशी भव्य पायी शोभायात्रेने,ढोल ताशाचे गजरात,आनंदाने साजरी करण्यात आली.प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मंगल आरती करण्यात आली.त्यावेळी प्रांताधिकारी अनिल पवार,तहसीलदार प्रशांत पाटील,नगराध्यक्षा अनुराधा आदिक,किशोरअण्णा निर्मळ,आ.लहू कानडे,माजी आ.भाऊसाहेब कांबळे,माजी आ.भानुदास मुरकुटे,मंजुश्री मुरकुटे,नारायण डावखर,वंदना मुरकुटे,अशोक थोरे,आदी मान्यवर उपस्थित होते.प्रतिमा पूजन झाल्यावर शिवाजी महाराज व जिजाऊमासाहेब यांची वेशभूषा असलेले कलाकार दोन रथातून विराजमान होते.
मिरवणूक सुरु होताना प्रथम महिला,पुरुष सवार असलेले घोडेस्वार होते.त्यावेळी पारंपारिक वेशात,पारंपारिक वाद्द्यासह वाघ्या मुरळी,पोतराज,आदींनी आपली कला सदर केली.त्यामागे शिवरायाचे झेंडे हातात घेऊन भव्य पायी शोभायात्रा फटाक्याची  आतिषबाजी करीत थत्ते ग्राउंड बेलापूर रोड ते शिवाजी रोडमार्गे मेनरोड मार्गे परत थत्ते ग्राउंडला आल्यावर विसर्जन करण्यात आले.फार मोठ्या संख्येने महिला पुरुष,पंचक्रोशीतील ग्रामस्थ,विद्यार्थी,बालके सह्भागी झाले होते.सर्व महिला पुरुषांनी भगवे फेटे बांधल्याने आकर्षक मिरवणूक दिसत होती.राममंदिर चौकात भजनी मंडळाने शिवाजी महाराज व तुकाराम महाराज यांच्या भेटीचा देखावा अप्रतिम सादर करण्यात आला.इतका मोठा उत्साह यावर्षी जास्त दिसत होता.शहरात.चौकाचौकात,गावागावात प्रचंड उत्साह जाणवला.शिवजयंती महोत्सवाचे नियोजन मराठा समाज बहुउद्देशीय विकास सेवा प्रतिष्ठान श्रीरामपूर,जिजाऊ महिला मंडळ,वधूवर सूचक मंडळ,युवा ग्रुप,यांच्या वतीने करण्यात आले होते.यावेळी संस्थापक अध्यक्ष विलासराव जाधव,शिवजयंती उत्सव अध्यक्ष किशोरअण्णा निर्मळ,यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र मोरगे,भागवत लासुरे,रावसाहेब तोडमल,व सर्व सहकारी,महिला मंडळ सीमा जाधव व सहकारी, तसेच युवा ग्रुपचे सर्व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.त्याठिकाणी शिवाजी महाराज यांची अप्रतिम रांगोळी व सर्व रस्त्यांनी रांगोळीच्या पायघड्या प्रज्ञा सातपुते,कलावती देशमुख,ज्योती कवडे,घातल्या होत्या.आभार प्रदर्शन विलासराव जाधव यांनी केले.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget