अकोले ( प्रतिनिधी )- केवळ सवंग प्रसिध्दीसाठी ह भ प निवृत्ती महाराज ईंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार्या तृप्ती देसाई यांच्यावरच कठोर कारवाई करण्यात यावी तसेच त्याच्यावर असलेले गुन्हे विचारात घेवुन त्यांना तडीपार करण्यात यावे अशी मागणी डाँ. विजय मकासरे यांनी केली आहे ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख यांच्या समर्थनार्थ अकोले तालुका बंद ठेवुन निषेध सभा घेण्यात आली होती .या निषेध सभेला डाॅ.विजय मकासरे यांनीही हजेरी लावून महाराजांना आपला पाठिंबा दर्शवला आहे.
ह.भ.प .निवृत्ती महाराज देशमुख यांच्या पुञ प्राप्तीसाठी केलेल्या वक्तव्याविषयी तृप्ती देसाई यांनी गुन्हा दाखल करण्याची जी मागणी केली आहे ती केवळ प्रसिध्दि साठी आहे असे मत डाॅ.विजय मकासरे यांनी मांडले आहे .
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या व्यक्ती विषयी काहीही विधाने करुन आपली प्रसिद्धी करवुन घेणे हाच तृप्ती देसाई यांचा हेतु असतो असेही यावेळी मकासरे म्हणाले
.त्याच प्रमाणे त्यांच्यावर अन्य ९ गुन्हे दाखल आहेत .तरीही प्रशासन त्यांना अटक किंवा तडिपार का करत नाही असा सवाल मकासरे यांनी केला आहे
ह भ प निवृत्ती महाराजांची ईंदोरीकर यांची सुरु असलेली बदनामी आता थांबवावी अन्यथा मोठे जनांदोलन उभे करु असे मत अकोले येथे निवृत्ती महाराज देशमुख यांच्या समर्थनार्थ आयोजीत करण्याता आलेल्या निषेध सभेत अनेकांनी व्यत्क केले.डाँ विजय मकासरे यांच्यावर तृप्ती देसाई यांनी २०१७ मध्ये प्राणघातक हल्ला केला होता तो खटला न्यायप्रविष्ट आहे
Post a Comment