बुलडाणा - 24 फेब्रूवारी
देशभरात CAA, NRC व NPR या विधेयकाच्या विरोधात विविध आंदोलन सुरु असून आज शेकडो नागरिक या विधेयकाच्या विरोधात मोताळा ते बुलडाणा असा 25 किलोमीटरचा पायी मोर्चा काढून आपली भूमिका मांडली व आपल्या मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.या विधेयकाच्या विरोधात 25 किलोमीटर पायी मोर्चा देशात फक्त येथेच काढण्यात आला.
मोताळा ते बुलडाणा एनआरसी विरोधात 25
किलोमिटरचा प्रवास करीत शेकडो लोकांनी तिरंगा पदयात्रा काढली. या तिरंगा पदयात्रेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची शेख मुक्तार शेख अबरार यांनी साकारलेली वेशभूषा लक्षवेधी ठरली.सुधारित नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदनी विरोधात दिल्लीतील शाहीन बाग येथे मागील दीड महिन्या पेक्षा जास्त काळापासून निदर्शने सुरू आहेत. याच धर्तीवर बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा व बुलडाण्यातही शाहीन बाग आंदोलन कुल जमाती तंझीमच्या नेतृत्वात सुरू आहे. दरम्यान आज 24 फेब्रवारीला उपोषणाच्या 45 व्या दिवशी मोताळा ते बुलडाणा असा 25 कि.मि ची सर्वधर्मीय तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा शहरात पोहचल्यावर जयस्तंभ चौकातील शाहीनबाग आंदोलनात सहभागी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
२४ फेब्रूवारी जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता कुल जमाती तंझीमच्या वतीने तिरंगा पदयात्रेचे आयोजन मोताळा येथील शाहीनबाग उपोषण मंडप ते बुलडाणा शाहीनबाग उपोषण मंडपादरम्यान करण्यात आले. राजूर घाटाच्या चढणीनंतर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथील तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करून जयस्तंभ चौक येथे मोर्चा पोहचल्यावर शाहीनबागच्या समोर याचे रूपांतर एका जनसभेत झाले. यावेळी कुल जमाती तंझीमच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आपली लढाई कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून केंद्र सरकारद्वारे पारित करण्यात आलेल्या एनआरसी, सीएए व एनपीआरच्या विरोधात आहे.
आपल्या आंदोलनामुळे कोणत्याही धर्माच्या नागरिकांना त्रास होऊ नये, याकडे सर्वांनी लक्ष द्यावे, असे आवाहन कुल जमाती तंझीमच्या वतीने करण्यात आले. या तिरंगा पदयात्रेत शेकडोच्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
Post a Comment