प्रतिनिधी ।
सावळीविहीर कारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिर्डी विमानतळा वर जाऊन विविध विमानांच्या टेकअप व लँडिंग चा मनसोक्त आनंद घेत तसेच तेथील स्वच्छतेचा आदर्श घेऊन स्वच्छतेचे धडे गिरवत संत गाडगे महाराज यांची आठवण काढत मनोमन स्वच्छतेची शपथ घेतली,
सावळीविहीर कारवाडी येथील श्री हनुमान क्लास या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी पर्यंतच्या सुमारे पन्नास चिमुकल्या विद्यार्थ्यांची सहल नुकतीच शिर्डी जवळील काकडी येथील श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेली होती, नेहमी आकाशात दिसणारी विमाने, आता प्रत्यक्ष या विमानतळावर समक्ष बघण्याचा आनंद या विद्यार्थ्यांनी घेतला, तसेच दिल्ली, बेंगलोर आदी ठिकाणाहून आलेल्या 180 सिटर विमानांचे लँडिंग तसेच टेकअप बघण्याचा चा आनंदही या विद्यार्थ्यांनी यावेळी अनुभवला ,त्याचबरोबर या विमानतळावरील स्वच्छता, शिस्त, सुरक्षा याविषयी येथील अधिकारी वर्गाकडून जाणून घेत या विमानतळा प्रमाणेच नेहमीच स्वच्छता राखण्याची मनोमन शपथही या विद्यार्थ्यांनी यावेळी घेतली, या छोट्याशा चिमुकल्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेशात पाहून दूरदूरहून विमानाने आलेल्या प्रवाशांनी व जाणाऱ्या येणाऱ्या साईभक्तांनी या मुलांबरोबर फोटो काढले, हितगुज साधले ,मुलांना चॉकलेट, खाऊ देण्यात आला, यावेळी विमानतळावर जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती बाबासाहेब दिघे ,जिल्हा परिषद सदस्य आशाताई दिघे ,,पत्रकार राजेंद्र गडकरी , भाजयुमोचे तालुका अध्यक्ष रावसाहेब एखंडे यांनी व विमानतळ अधिकाऱ्यांनी या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे यावेळी स्वागत व कौतुकही केले, ही सहल यशस्वी करण्यासाठी या शाळेचे शिक्षक संदीप घोलप सर सोमनाथ वाबळे सर, सोनम रा मॅडम आदींनी विशेष परिश्रम घेतले ,
Post a Comment