September 2022

बेलापुर  (प्रतिनिधी  )- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या आझादी से अंत्योदय तक या मोहीमेत बेलापुरच्या प्रविण प्रकाश कुऱ्हे या तरुणाने वर्धा जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ग्रामीण विकास मंत्रालय नवी दिल्ली येथे त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. बेलापुरचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश कुऱ्हे यांचे चिरंजीव प्रविण कुऱ्हे हे वर्धा जिल्ह्यात जिल्हा कार्यकारी अधिकारी (MVSTF) म्हणून कार्यरत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारच्या वतीने "आझादी से अंत्योदय  तक  ही ९० दिवसांची मोहीम देशातील महत्वाच्या स्वातंत्र्य सैनिकाशी संबधीत सैनिकांचे जन्मस्थान असणाऱ्या ७५ जिल्ह्यामध्ये विकास कामांना गती देण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालय ग्रामीण विकास विभाग भारत सरकारच्या वतीने एकम "अंत्योदय" मोहीम सुरु करण्यात आली होती त्यात नऊ मंत्रालयाच्या एकुण १७ योजनांचा समावेश करण्यात आला होता. वर्धा जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीमती.प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे, बेलापुरचे भुमीपुत्र प्रविण प्रकाश कुऱ्हे यांनी दिनांक २८एप्रिल २०२२ ते १५ आँगस्ट  २०२२ दरम्यान ही मोहीम युद्ध पातळीवर राबवीली त्यामुळे देशातील टाँप टेन जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्याची ९ क्रमांकावर निवड झालेली आहे. यासाठी सर्व विभाग प्रमुख, अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. नवी दिल्ली येथे ग्रामीण विकास विभाग भारत सरकार यांच्या वतीने ग्रामीण विकास मंत्रालय येथे आयोजित कार्यक्रमात ग्रामीण मंत्रालयाचे सचिव नागेंद्र नाथ सिन्हा, उपसचिव आशिष कुमार गोयल, ग्रामविकास मंत्रालयाचे संयुक्त सचिव कर्मा जिम्पा भुटीया उपसचिव दिनेश कुमार तसेच नऊ मंत्रालयाच्या सचिवांच्या उपस्थितीत देशातुन टाँप टेनमध्ये आलेल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा कार्यकारी अधिकारी याचा सन्मान करण्यात आला असुन प्रविण कुऱ्हे यांच्या सन्मानामुळे बेलापुरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे जनता अघाडीचे अध्यक्ष रविंद्र खटोड भाजपाचे सरचिटणीस प्रफुल्ल डावरे प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा किशोर कदम आदिंनी त्याचे अभिनंदन केले आहे.

श्रीरामपूर - शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत छोट्या मोठ्या चोरीच्या घटनां समोर येत आहे. या घटनांच्या चालता २७ सप्टेंबरच्या मध्यरात्री, एम आय डी सी मधील ए १४८ मधील, निकेत बोऱ्हाडे यांच्या मालकीच्या. कृष्णा सिमेंट पाईप प्रॉडक्शन या कंपनीतील अंदाजे २ टनच्या वर, लोखंडी प्लेट चोरून नेल्याची घटना घडली आहे. या धाडसी चोरी संदर्भात माहिती मिळताच, महिला पोलीस उपनिरीक्षक एस बी देवरे, टिळकनगर पोलीस चौकीचे, पोलीस नाईक मच्छिंद्र शेलार.,साईनाथ राशिनकर, बाळासाहेब गुंजाळ आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन. घटनास्थळाचा पंचनामा करून, निकेत बोऱ्हाडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला. तसेच घटनास्थळावर मिळालेले ठसे तपासण्याकरिता, फिंगर एक्सपर्ट पथकास बोलावून नमुने घेऊन. सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. एम आय डी सी मधील या धाडसी चोरी नंतर ,सदरच्या चोरांचा बंदोबस्त करून, छोट्या व्यापाऱ्यांना सहकार्य करावे अशी विनंती, उद्योजक निकेत बोऱ्हाडे यांनी केली आहे.

अहमदनगर प्रतिनिधी-२४ सप्टेंबर-२०२२ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना, गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की , तोफखानाव एम आय डी.सी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शासनाने बंदी घातलेले तंबाखुजन्य पदार्थ बाळगुन हुक्का पार्लर चालवत असुन आता गेल्यास लगेच मिळून येतील अशी गुप्त माहिती अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी तत्काळ एक पथक तयार केले पथकाने (शनिवारी २४/९/२०२२) पहाटेपर्यंत  रात्रीत तीन हुक्का पार्लरवर धाडसत्र  राबवून १६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली  स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे ,पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे ,पोहेकॉ/४४० संदीप कचरू पवार ,

पोहेकॉ/४८६ बापूसाहेब रावसाहेब फोलाने, पोहेकॉ/ ५ ९९ सुनिल सितराम चव्हाण , पोहेका / ९ ८१ दिनेश सोपान मोरे, पोना/३७६ शंकर संपत चौधरी, पोना/१७७२ लक्ष्मण चिंधू खोकले ,पोना/ १४८७ सचिन दत्तात्रय आडबल पोना / १३७२ संतोष शंकर लोढे , पोना /१५१६ रविकिरण बाबुराव सोनटक्के, पोना / १५५७ भिमराज किसन खर्से,पोकॉ/२४८२ योगेश अशोक सातपुते,पोकॉ/ २६०० रोहित मधुकर मिसाळ, पोकॉ/१६९९ शिवाजी अशोक ढाकणे पोकॉ/२४३१ रोहित अंबादास येमुल,

यांच्या 

*पथकाने पहिली कारवाई तोफखाना पोलीस स्टेशन गुन्हा नबर ८२६/२०२२* इसम नामे राजु भागेश्वर रॉय हा सावेडी या सुवारीत शासनाने बंदी घातलेले तंबाखुजन्य पदार्थ स्वतःकडे बाळगुन हुक्का पार्लर चालवत असुन   

 जावुन खात्री केली असता नमुद ठिकाणी हॉटेल पंचशिल मध्ये एका टेबलवर तीन इसम टेबलवर हुक्का पिण्यासाठी लागणारे पॉटने हुक्का पिताना दिसले व एक इसम हुक्याचे साहित्य पुरविताना दिसला .ठिक २१/१५ वा छापा टाकुन सदर इसमांना लागीच बसण्यास सांगुन त्यांना त्यांची नाव पत्ते विचारता त्यांनी त्यांची नावे राजु भागेश्वर रॉय , वय २३ , रा . हॉटेल पंचशिल , सावेडी नाक्या जवळ , सावेडी , अ.नगर २ ) आयुष भिम भटराय , वय २१. रा . दातरंगे मळा , अनगर , ३ ) साकिब आरीफ शेख , वय १ ९ , रा . मुकुंदनगर , अ.नगर , ४ ) आझम आझीम शेख , वय १ ९ , रा . मुकुंदनगर , अ.नगर असे असल्याचे सांगितले व क्र . १. राजु भागेश्वर रॉय याने सदर हॉटेल मध्ये हुक्का पार्लर मी स्वतः चालवत असल्याचे सांगितल्याने त्यास सदर हुक्का पार्लर चालविण्याचा परवाण्या बाबत विचारपुस करता त्याने कुठल्याही प्रकारचा परवाना नसले बाबत सांगितले . सदर ठिकाणी टेबलवर हुक्का पिण्यासाठी लागणारा काचेचा पॉट व हुक्यासाठी लागणारे फ्लेवर व हुक्याचे इतर साहीत्य मिळून आले  खालील  वापरलेला अंदाजे किंमत १६३०० /००

*दुसरी कारवाई तोफखाना पोस्ट गु.र.नं. ८२५/२०२२* , इसम नामे जसविन राकेश पहजा , हा विराम हॉटेल  शेजारी , कुष्टधाम रोड , सावेडी , अ.नगर ता जि . अ.नगर येथे पत्र्याचे शेड मध्ये सार्वजनीक रित्या मानवी जिवीतस  धोका निर्माण होईल असा शासनाने बंदी घातलेले तंबाखूजन्य पदार्थ स्वतःकडे बाळगुन हुक्का पार्लर चालवीत होता नमुद ठिकाणी वा हॉटेल विराज शेजारीच पत्र्याचे शेड मध्ये दोन टेबलवर काही इसम टेबलवर हुक्का पिण्यासाठी लागणारे पाँटने हुक्का पिताना दिसले व एक इसम हुक्याचे साहित्य पुरविताना दिसला . ठिक १ ९ / ३० वा छापा टाकून सदर इसमांना  त्यांची नाव पत्ते   १ ) जसविन राकेश पहुजा , वय २४ , रा . गुलमोहर रोड , रिध्दी सिध्दी कॉलनी , सावेडी अ.नगर , २ ) ऋषीकेश सतीश हिंगे , वय २१ , रा . भुतकरवाडी , अ.नगर ता . जि . अ.नगर , ३ ) अक्षय नाना शिंदे , वय २२ , रा . सारसनगर , अ.नगर , ४ ) आकाश डॅनिअल पाटोळे , वय २२ , रा . डीवाला मळा , सोलापुर रोड , अ.नगर , ५ ) ऋषी मनिष छजलानी , वय २० , रा . पोलीस लाईन जवळ , भिंगार , ता . जि . अ.नगर , ६ ) हर्षल रणजीत बैराट वय २१ , रा नेहरू कॉलनी भिंगार , ता जि . अ.नगर , ७ ) नितीन राजु मोरे , वय ३३ , रा . वाणीनगर , पाईपलाईन रोड , अ.नगर , ८ ) सागर पन्ना काळे , वय ३२ , रा . धानोरे ता आष्टी , जि . बीड . ९ ) किरण कुमार काळे , वय २४ , रा . नालेगाव अ.नगर , १० ) भैरवनाथ बबन धिवर , वय ३ ९ , रा . सावेडी तलाठी ऑफिस जवळ , अ.नगर असे असल्याचे सांगितले व क्र . १. जसविन राकेश पहुजा याने सदर हुक्का पार्लर मी स्वतः चालवत असल्याचे सांगितल्याने त्यास सदर हुक्का पार्लर चालविण्याचा परवाण्या बाबत विचारपुस करता त्याने कुठल्याही प्रकारचा परवाना नसले बाबत सांगितले . सदर ठिकाणी टेबलवर हुक्का पिण्यासाठी लागणारा काचेचा पॉट व हुक्यासाठी लागणारे फ्लेवर व हुक्याचे इतर साहीत्य मिळुन आले त्याचे वर्णन खालील

 वापरलेला अंदाजे किंमत १ ९ ४५० /००

*स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिसरी कारवाई एम.आय.डी.सी. पो.स्टे . , अ.नगर एम आय डी प्सी पो.स्टे . 1 गुरुनं ७३६ / २०२२*

 इसम नामे शिवाजी संतराम गांगर्डे , हे नगर मनमाड रोड , विळद घाट , अ.नगर येथे हॉटेल द किंग कॅफे मध्ये एका टेबलवर एक इसम टेबलवर हुक्का पिण्यासाठी लागणारे पॉटने हुक्का पिताना दिसला व एक इसम हुक्याचे साहित्य पुरविताना दिसला . 

ठिक २२/०० वा छापा टाकून सदर इसमांना त्यांची नावे १ ) शिवाजी संतराम गांगर्डे , वय ५६ , रा . दत्तनगर , शेडी बायपास चौक , एम आय डी सी . वडगाव गुप्ता ता . जि . अनगर २ ) दिनेश ज्ञानेश्वर मिसाळ , वय २५ , रा . रेणुकानगर , बोल्हेगाव फाटा , अ.नगर , असे असल्याचे सांगितले व क्र . १. शिवाजी संतराम गांगर्डे , याने सदर हॉटेल मध्ये हुक्का पार्लर मी स्वतः चालवत असल्याचे सांगितल्याने त्यास सदर हुक्का पार्लर चालविण्याचा परवाण्या बाबत विचारपुस करता त्याने कुठल्याही प्रकारचा परवाना नसले बाबत सांगितले . सदर ठिकाणी टेबलवर हुक्का पिण्यासाठी लागणारा काचेचा पॉट व हुक्यासाठी लागणारे फ्लेवर व हुक्याचे इतर साहीत्य मिळून आले  खालील प्रमाणे  वापरलेला अंदाजे किंमत १८४५० / 

वरील 16 आरोपी  विरुध्द सिगारेट व तंबाखु उत्पादने ( जाहीरातीस प्रतिबंध आणि व्यापारी व वाणीज्य व्यवहार , उत्पादन पुरवठा व वितरण याचे विनिमय ) अधिनियम २००३ चा सुधारीत अधिनियम २०१८ कलम ४ व २१ ( १ ) प्रमाणे  फिर्याद दाखल करून आरोपींना अटक करण्यात आले आहे.

*सदाची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके,स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे ,पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे ,पोहेकॉ/४४० संदीप कचरू पवार ,पोहेकॉ/४८६  बापूसाहेब रावसाहेब फोलाने,पोहेकॉ/५९९ सुनिल सितराम चव्हाण , पोहेका/९ ८१ दिनेश सोपान मोरे,पोना/३७६ शंकर संपत चौधरी,पोना/१७७२ लक्ष्मण चिंधू खोकले ,पोना/१४८७ सचिन दत्तात्रय आडबल,पोना/१३७२ संतोष शंकर लोढे ,पोना /१५१६ रविकिरण बाबुराव सोनटक्के, पोना/१५५७ भिमराज किसन खर्से,पोकॉ/२४८२ योगेश अशोक सातपुते,पोकॉ/२६०० रोहित मधुकर मिसाळ,पोकॉ/१६९९ शिवाजी अशोक ढाकणे, पोकॉ/२४३१ रोहित अंबादास येमुल यांच्या पथकाने कारवाई केली आहे*

श्रीरामपूर प्रतिनिधी-महाराष्ट्र युवा खेल परिषद अंतर्गत १७/१८/१९ सप्टेंबर रोजी झालेल्या  राज्यस्तरीय स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे केशर लॉन्स या ठिकाणी राज्यस्तरीय कराटे किक बॉक्सिंग तायक्वांदो किक जुडो स्पर्धा पार पडल्या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य चे माजी क्रीडामंत्री माननीय खासदार चंद्रकांत जी खैरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा.रखमाजी जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माझी क्रीडा उपसंचालक मा.जगन्नाथ अधाने साहेब माजी महापौर नंदकुमार घोडेले माझी डीवायएसपी अशोक आमले महाराष्ट्र युवा खेल परिषदेचे माननीय अध्यक्ष कल्याण जाधव सर उपाध्यक्ष शंकर गायकवाड सर संघटनेचे महासचिव प्रा. पुरब सुर्यवंशी सर खजिनदार श्रीकांत पाटील सर टेक्निकल डायरेक्टर निलेश वाघचौरे राजेश जाधव आदी मान्यवर उपस्थिती होते या स्पर्धेमध्ये 15 जिल्ह्यातून 55 संघचे  ३५० ते ४०० विद्यार्थी सहभागी झाले होते यात ७० क्रीडा शिक्षक क्रीडा कोच यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थी व सदस्यांनी आपला सहभाग नोंदविला. या ठिकाणी प्रथम पारितोषिक नागपूर जिल्ह्याने, दृतिय पारितोषिक पुणे जिल्ह्याने, तर तृतीय पारितोषिक अहमदनगर जिल्ह्या श्रीरामपूर ग्लोबल मार्शल आर्टने पटकविले.  प्रशिक्षक कलीम  बिनसाद  यांचा क्रीडा कोच व सर्व पालकांकडून शिक्षकांकडून तसेच महाराष्ट्रातील कोच ह्याच्या कडून प्रशंसा करण्यात आली. 

श्रीरामपूर प्रतिनिधी-दि.रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर होऊन रयत सेवक सभासदांचे तीन पॅनल आमने सामने उतरलेले आहेत. त्यामुळे रविवार दिनांक 18 सप्टेंबर 2022 रोजी, रयत बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी होणार असे वातावरण तयार झालेले होते .रयत कल्याण मंडळ पुरस्कृत स्वाभिमानी जय कर्मवीर पॅनेलनचे अध्यक्ष नगरसेवक तथा पक्षप्रतोद राजेंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्रीरामपूर नगरपालिका यांच्या आग्रही भूमिकेमुळे संचालक मंडळाला अखेर 3% वाढीव  डिव्हिडंट जाहीर करावा लागला.त्यामुळे सभासदांना आधीच जाहीर केलेला 8% डिव्हिडंट मीटिंगच्याच दिवशी वर्ग करून उर्वरित 3 % वाढीव डिव्हीडंट डी.डी.आर च्या परवानगीने एक महिन्याच्या आत सभासदांना देण्यात यावा अशी आग्रही भूमिका राजेंद्र पवार यांनी लावून धरलेली होती.त्यास सभागृहात उपस्थित असलेल्या रयत सभासदांनी जाहीर पाठिंबा दिल्यामुळे रयत बॅंकेच्या संचालक मंडळास सर्वसाधारण सभेत नमते घेत 3%डिव्हीडंट देण्याचे जाहीर करावे लागले. बँकेने रिझर्व ठेवलेल्या फंडातून ही रक्कम देण्यात येईल असे रयत बँकेचे चेअरमन जंम्बुकुमार आडमुठे यांनी जाहीर केले. त्यामुळे रयत सेवक बँक सभासदांना एकूण 11% डिव्हिडंट मिळेल.

   रयत बॅंकेने पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेत ठेवलेल्या  ११ कोटी रुपयांच्या ठेवीबाबात  सभासद कल्याण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी अत्यंत परखड मत मांडले.संचालक मंडळाला याबाबत जाब विचारला. बॅंकेतील नोकरभरती, व्याजदर कमी करण्याबाबतचा प्रस्ताव, गुगल पे,फोन पे सेवा, बॅंकेची सभासदांना विनम्र सेवा, मयत सभासदांची संपूर्ण कर्जमाफी करण्यासाठी संचालक मंडळाने प्रयत्न करावेत अशी भूमिका स्वाभिमानी जय कर्मवीर पॅनेलने घेतली.सभासदांची बॅंकेकडून होणारी अडवणूक,त्यांचेही अनेक प्रश्न यावेळी मांडण्यात आले.सभासदांना दिवाळी भेट म्हणून कॅलेंडर ऐवजी सुंदर डायरी व उपयोगी साहित्य देण्याची मागणी देखील यावेळी केली.माणिकराव भोसले, कैलासराव पवार, जितेंद्र भोई, काशिनाथ सोलनकर, सचिन झगडे आदींनी सहभाग नोंदवून रयत सेवकांच्या हितांच्या प्रश्नांवर आवाज उठविला.आमचे मार्गदर्शक शिवाजी विद्यापीठाचे मा.प्र.कुलगुरू व रयत शिक्षण संस्थेचे मा.सचिव डॉ.अशोक भोइटे साहेब यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.रयत हे एक कुटुंब असून डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ आण्णा व डॉ.एन.डी.पाटील यांच्या विचारांचा वारसा आपण सर्वांनी जपला पाहिजे असे भावनिक आवाहन डॉ.अशोक भोईटे यांनी केले

 सर्वसाधारण सभेस रयत शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव जी.एस खोत साहेब, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य अँथनी डिसुजा सर,

रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य बाजीराव कोरडे सर ,रयत बँकेचे माजी चेअरमन व्ही.पी.पाटील साहेब, मा. चेअरमन देविदास गुरव, मा.चेअरमन राजाभाऊ मगदूम, मा.व्हाईस चेअरमन कुंडलिक सानप, माजी मुख्याध्यापक महादार सर. माणिकराव भोसले ,गजानन बकरे ,सुरेश वाबळे, सचिन झगडे,सुनील देवकर, जितेंद्र भोई ,अरुणकुमार पाटील, सुनील मोहिते, विजयकुमार काळदाते शंकर जाधव, दादीराम साळुंखे ,राजेंद्र कदम, राजेंद्र शेलार ,सुरेखा दाते,दिपाली भोसले, जावळे सर इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

बेलापुर (प्रतिनिधी )- शांतता कमीटीच्या बैठकीत दिलेल्या अश्वासनाची पूर्तता करत श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी व प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले यांनी प्रत्येकी अकरा हजार रुपये प्रमाणे बावीस हजार रुपये बेलापुर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्याकडे जमा केले .   गणेशोत्सवापूर्वी बेलापुर पोलीस स्टेशन येथे शांतता कमीटीची बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीत गाव संरक्षणात गणेश विसर्जन मिरवणूक पार पाडण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला होता .त्यावर बोलताना पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी म्हणाले होते की अशी मागणी मी पहील्यांदाच पहात आहे त्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाल्यास मी गावाला अकरा हजार रुपये बक्षीस देईल त्या वेळी प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष  एकनाथ उर्फ लहानु नागले यांनी देखील बक्षिस देण्याचे मान्य केले गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत विना पोलीस बंदोबस्त घेता पार पडली पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते गणेश मंडळाचा सन्मानपत्र देवुन गौरव करण्यात आला त्या वेळी पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे यांनी अकरा हजार रुपये रोख,मा. जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्याकडे सूपूर्त केले त्यानंतर प्रदेश तेली  महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले यांनीही सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत अकरा हजार रुपये सरपंच  साळवी व उपसरपंच खंडागळे यांच्याकडे सुपुर्त केले या वेळी ईस्माईल शेख मोहसीन सय्यद गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे बाळासाहेब दाणी पत्रकार देविदास देसाई रणजित श्रीगोड पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे दिलीप दायमा किशोर कदम विष्णूपंत डावरे प्रफुल्ल डावरे तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे मुस्ताक शेख आदि उपस्थित होते

श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर शहरातील सुखदा हाउसिंग सोसायटी समोरील बंद असलेले घर फोडून चोरट्यांनी फॅन, तांब्या पितळाच्या वस्तू, भांडी, घरातील रोकडसह देव्हार्‍यातील वस्तूंची चोरी केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्रीरामपूर शहरातील सुखदा हाउसिंग सोसायटीसमोर राहुल उत्तम अभंग यांचे घर असून ते बंद होते. दि. 19 सप्टेंबर रोजी 9.30 ते सायं. 4.45 च्या सुमारास राहूल अभंग यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील 15 हजार रुपयांची रोकड त्यात नाणे आणि नोटा तसेच 2 हजार रुपयांच्या घरगुती वस्तू, फॅन तसेच 1500 रुपयांच्या तांब्या-पितळांच्या वस्तू त्यात घंटी, दिवटी रंगनाथ, गणपती, छोटे ताट, तांब्या, बादली आदींसह देवघरातील वस्तू आरोपीने चोरून नेल्या आहेत.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात राहूल अभंग यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 851/2022 प्रमाणे सनी दिलीप थोरात, (वय 20), रा. बजरंग चौक, वॉर्ड नं. 2, श्रीरामपूर याचेविरूद्ध भादंवि कलम 457, 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक श्री. शेलार हे करत आहेत.

श्रीरामपूर प्रतिनिधी- आज दि.21/09/2022 रोजी Dysp संदीप मिटके यांना नेवासा फाटा परिसरात सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने  वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत गुप्त बातमी मिळाली.  त्यावरून नेवासा फाटा परिसरात हॉटेल पायल,हॉटेल नामगंगा,व हॉटेल तिरंगा या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन  पंचासमक्ष छापा टाकुन सात पिडीत परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली आहे.  त्यानुसार आरोपी विरुद्ध नेवासा पोलीस स्टेशन येथे प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. एकाच वेळी तीन ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्यात आला या कारवाईमुळे नेवासा फाटा परिसरात व शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. 

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, मा.स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके , PI प्रताप दराडे, Pi हर्षवर्धन गवळी, PI विजय करे, PI विलास पुजारी, Api मानिक चौधरीं व इतर पोलीस अधिकारी व अमलदार यांनी केली.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-सण ,उत्सव ,जयंत्या मोठ्या उत्सहात साजऱ्या करा .त्याचा  आनंद लुटा. पण हे करत असताना बेलापुरकरासारखा समाजात आदर्श निर्माण होईल असा कार्यक्रम ,उपक्रम राबवा असे अवाहन पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी केले .                    भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, बेलापुर ग्रामपंचायतीचा शतक महोत्सव याचे औचित्य साधुन बेलापुरकरांनी गणेशोत्सव काळात गावात शांतता राखुन विना पोलीस बंदोबस्तात गणेश विसर्ज पार पाडले गणोशोत्सव काळात जिवंत देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण तसेच गणेश मंडळांना सन्मानपत्र असा कार्यक्रम बेलापुर येथील जुने बालाजी मंदीर येथे आयोजित करण्यात आला होता .त्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.जि प ,सदस्य शरद नवले हे होते.सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे,  रणजित श्रीगोड, कनजी टाक, एकनाथ उर्फ लहानु नागले ,गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे,सुधाकर खंडागळे,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,रामेश्वर सोमाणी, ,कनजीशेठ टाक,बाळासाहेब दाणी,विष्णुपंत डावरे,रवींद्र कोळपकर,पोलीस पाटील अशोक प्रधान,अन्वर सय्यद,प्रभात कुऱ्हे,शफीक बागवान,जाकीर हसन शेख आदि मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पोलीस अधिक्षक मनोज पाटील पुढे म्हणाले की माझ्या २५ वर्षाच्या नोकरीत पोलीस बंदोबस्त नको असे म्हणणारे बेलापूर हे पहीले गाव पाहीले आहे .आनंद लुटतानाही मनात काहीतरी भिती असते .त्यामुळे पोलीस बंदोबस्ताची मागणी केली जाते .बेलापुरगावाने विना पोलीस बंदोबस्तात गणेश विसर्जन मिरवणूक काढण्याचा दिलेला शब्द खरा करुन दाखविला. बेलापूर च्या नेतृत्वाचे हे यश आहे. बेलापुरकरांनी राबविलेला हा "बेलापुर पँटर्न" जिल्ह्यात नव्हे तर राज्यात लागु व्हावा.सण उत्सव ज्या उद्देशाने सुरु झाले तो उद्देश बाजुलाच राहीला. त्याचे कारण आपण विसरत चाललो आहोत त्यामुळे पोलीसावरील कामाचा ताण वाढत आहे .सर्वच जण पोलीस बंदोबस्त मागतात .सण उत्सव साजरा करणारे रात्री अकरा बारा नंतर झोपी जातात .पण पोलीस मात्र पहारा देत असतो सण उत्सवात काही विघ्न येवु नये म्हणून दारुबंदी करावी लागते ही दुर्दैवाची गोष्ट आहे. या गावाचे अभिनंदन करण्यासाठी मी या ठिकाणी आलो असुन इतरांनी देखील या गावाचा आदर्श घ्यावा असे अवाहनही श्री.पाटील यांनी केले. अध्यक्षीय भाषणात शरद नवले म्हणाले की सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते मुस्लीम बांधव विविध संघटनांचे प्रतिनिधी पत्रकार बंधु ग्रामस्थ या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले असुन गावाच्या विकासासाठी उज्वल भविष्यासाठी अशीच भूमिका ठेवावी असे अवाहनही नवले यांनी केले या वेळी अहमदनगर गुन्हा अन्वेषण विभागाचे अनिल कटके ,सरपंच महेंद्र साळवी प्रवासी संघटनेचे रणजित श्रीगोड  तंटामुक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे ,हाजी ईस्माईल शेख मोहसीन सय्यद भाजपाचे प्रफुल्ल डावरे आदिंनी मनोगत व्यक्त केले .या वेळी देखावा स्पर्धेत प्रथम क्रमांक हिंदु संघटक विर सावरकर मित्र मंडळ रुपये पाच हजार द्वितीय क्रमांक छत्रपती तरुण मंडळ रुपये तिन हजार  तृतीय क्रमांक गौरी गणेश बाल मित्र मंडळ रुपये दोन हजार सिध्दी विनायक युवा मंच रुपये एक हजार रामराज्य मित्र मंडळ रुपये एक हजार तसेच सन्मानपत्र देवुन गौरव करण्यात आला तसेच गणेश विसर्जन शांततेत पार पाडल्याबद्दल सर्व गणेश मंडळ पोलीस पाटील जामा मस्जिद ट्रस्ट महावितरणचे अधिकारी कर्मचारी  गणेश विसर्जन काळात मदत करणारे सफाई कर्मचारी पोहणारे बेलापुर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आदिंचा सन्मानपत्र देवुन गौरव करण्यात आला या वेळी गणेश मंडळाचे पदाधिकारी ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य विविध संघटनांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित  होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केले तर प्रफुल्ल डावरे यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार देविदास देसाई यांनी केले.यावेळी गावकरी पतसंस्थेचे संचालक विशाल आंबेकर, सचिन वाघ, महेश कुऱ्हे,अमोल गाडे,दादासाहेब कुताळ,नितीन शर्मा,भैय्या शेख, दिलीप दायमा, किशोर कदम,हैदरभाई सय्यद,गोपी दाणी,राम कुऱ्हे,राहुल माळवदे,जयेश अमोलिक, शहानवाज सय्यद,दस्तगीर शेख, सोमनाथ साळुंके, बाबुलाल पठाण,राकेश कुंभकर्ण गोपाल जोशी,रोहित शिंदे आदी उपस्थित होते.

विना पोलीस बंदोबस्त गणेश विसर्जन मिरवणूक पार पाडल्यास रु.११,००० बक्षीस देईल असे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत जाहीर केले होते तसेच श्री. गवळी साहेबांनी ११००० रुपये दिल्या नंतर मी ही ११००० रुपये बक्षीस देईल असे तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले यांनी जाहीर केले होते. काल जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या समक्ष पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी रु.११००० बक्षीस रक्कम सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्या कडे सुपूर्द केली. त्या नंतर लगेच एकनाथ नागले यांनी देखील रु.११००० सरपंच, उपसरपंच यांच्या कडे जमा केली.


बेलापुर  (प्रतिनिधी  )- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पगारवाढ करण्यात यावी  प्राँव्हीडंट फंडाची रक्कम त्वरीत अदा करण्यात यावी या मागणीसाठी बेलापुर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गेल्या पाच दिवसापासून  ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले होते अखेर प्रशासन ग्रामस्थ व कामगार संघटना यांच्यात तडजोड होवुन कामगारांना रुपये नऊशे तसेच महागाई भत्ता दोनशे रुपये वेतनवाढ देण्याचा एकमताने निर्णय  झाला त्यामुळे कामगारांनी आपले आंदोलन मागे घेतले वेतनवाढ करण्यात यावी पंधरा महीन्यापासुन थकीत असलेली प्राँव्हीडंट फंडाची रक्कम तातडीने जमा करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य श्रमीक संघाचे काँ.जिवन सुरुडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरु केलेले आहे .आंदोलनाचा आज पाचवा दिवस होता .कामगार व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यात तोडगा काढण्यासाठी गटविकास अधिकारी अनंत परदेशी हे ग्रामपंचायत कार्यालयात आले होते ते येण्यापुर्वी जि प सदस्य शरद नवले सुनिल मुथा देविदास देसाई प्रफुल्ल डावरे गांवकरीचे चेअरमन साहेबराव वाबळे मोहसीन सय्यद मुस्ताक शेख यांनी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे व कामगारांचे नेते जिवन सुरुडे यांच्याशी चर्चा करुन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी ८००रुपये व २००रुपये अशी एक हजार रुपये पगारवाढ देण्याचे कबुल केले मात्र कामगार हे १२००रुपये पगारवाढ करण्यावर ठाम राहीले त्यामुळे बैठकीत एकमत होवु शकले नाही  कामगारांच्या मागण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासन नागरिक कर्मचारी व कामगार नेते जिवन सुरुडे यांच्यात अनेक बैठका झाल्या .आज अखेर या बैठकीत तोडगा काढण्यात ग्रामस्थ प्रशासन व महाराष्ट्र राज्य श्रमीक संघ यांना यश आले .पाच दिवसापासून कामगार आपल्या मागण्यावर ठाम होते महागाई वाढली त्यामुळे पगार वाढ करण्यात यावी अशी मागणी कामगारांनी केली होती तर ग्रामपंचायतीचा वसुल कमी असल्यामुळे इतकी पगारवाढ देता येत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे होते विरोधी पक्षनेते माजी सरपंच भरत साळूंके जनता अघाडीचे अध्यक्ष रविंद्र खटोड बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले यांनीही कामगारांच्या मागण्यावर योग्य तो तोडगा काढावा  अशी सुचना केली होती आमदार लहु कानडे ,अशोक उद्योग समुहाचे सर्वेसर्वा भानुदास मुरकुटे गटविकास अधिकारी अनंत परदेशी यांनी आंदोलन स्थळी भेट देवुन कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या.सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे गांवकरी मंडळाचे नेते सुनिल मुथा गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे पत्रकार देविदास देसाई,ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले, मुस्ताक शेख,भाजपाचे प्रफुल्ल डावरे,तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष लहानु नागले,पुरुषोत्तम भराटे,हाजी इस्माईल शेख,मोहसीन सय्यद,बाळासाहेब दाणी,अमोल गाडे,भैय्या शेख, सचिन वाघ,दिलीप दायमा,किशोर कदम, शफिक बागवान,रत्नेश गुलदगड, जिना शेख,रामदास वाबळे,दादासाहेब कुताळ, महेश कुऱ्हे,विशाल आंबेकर तसेच श्रीकृष्ण बडाख मदीना शेख शरद संसारे राजेंद्र मुसमाडे प्रकाश भांड आदिंनी तोडगा काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले अखेर ग्रामपंचायतीच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करुन ग्रामस्थासमोर गावाकरीता दोन पावले मागे घेत आंदोलन स्थगीत करत असल्याचे कामगारांनी सांगितले या वेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे  कामगार नेते जिवन सुरुडे देविदास देसाई सुनिल मुथा प्रफुल्ल डावरे सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले आदिंनी मनोगत व्याक्त केले प्रफुल्ल डावरे यांच्या भाषणाचा धागा पकडून सुधीर नवले यांनी राजकारणाचा उल्लेख करताच उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी आक्षेप नोंदवला यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला भरत साळूंके यांनीही आक्रमक पावित्रा घेतला अखेर ग्रामस्थांच्या मध्यस्थीनंतर वादावर पडदा पडला.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - अहमदनगर जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकान आय एस ओ मानांकन करण्यासाठी जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर अनेक बैठका घेवुन सर्व सुचना व मार्गदर्शन करण्यात येवुनही अजुन पर्यत तयारी झालेली नसुन दुकानदारांनी महीना अखेरपर्यत सर्व तयारी करावी अशी सक्त सुचना पुरवठा निरीक्षण अधिकारी दत्तात्रय भावले यांनी दिली                           जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकाने आय एस ओ करावयाची असुन श्रीरामपुर तालुक्यातील दुकानाचा आढावा घेण्यासाठी पुरवठा निरीक्षण अधिकारी भावले यांनी बैठक बोलवीली होती त्या वेळी दुकानदारांना मार्गदर्शन करताना भावले म्हणाले की  रंग रंगोटी करणे, रजिष्टर अद्यावत करणे, सर्वत्र एकाच आकाराचे फलक लावावेत, राज्य सरकारने दिलेल्या पुर्तता करून महीना अखेरी पर्यंत सर्व धान्य दुकाने सज्ज करा .

राज्य सरकारने आय एस ओ मानांकना करीता ९१ प्रकारच्या सुचना देण्यात आल्या आहेत, त्यानुसार स्वस्त धान्य दुकानदारांच्या अहमदनगर येथे जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम यांनी वेळोवेळी बैठका घेवून मार्गदर्शन केले आहे, त्याच बरोबर तहसिलदार प्रशांत पाटील यांनीही तालुकास्तरावर वेळोवेळी  बैठका घेऊन मार्गदर्शन केले, त्यानुसार अनेक दुकानदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यात सर्वांना एकाच आकाराचे फलक व रजिष्टर देण्यात आले आहेत. उर्वरीत पुर्तता दुकानदारांनी करायची आहे. 

 त्यानुसार आता उर्वरीत दुकानदारांनी यात लक्ष घालून या महिना अखेरी पर्यंत आय एस ओ मानांकनासाठी सज्ज व्हायचे आहे.

ज्या दुकानदारांना आय एस ओ मानांकन प्राप्त होईल त्यांना लवकरच सरकार कडुन सी एस सी केंद्रा सारख्या पुढील व्यावसायिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार  असल्याचे ही यावेळी श्री भावले यांनी सांगितले.

या वेळी श्रीरामपूर तालुका गोदामाच्या धान्य पुरवठ्यात मार्च महीन्या पासुन मोठ्या प्रमाणात तुटवडा येत असल्याने तालुक्यांच्या वितरणावर मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. रेशनकार्ड धारक व दुकानदारांत विनाकारण वाद होत आहेत.सध्या सणासुदीचे व पावसाळ्याचे दिवस आहेत. अन्न धान्यांची नितांत गरज आहे.

आम्ही आय एस ओ करीता प्रयत्नशिल आहोत पण तुम्ही आम्हाला वेळेवर धान्य पुरवठा करा . अशी मागणी जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई यांनी केली.या वेळी नायब तहसीलदार अभया राजवळ पुरवठा निरीक्षक सुहास पुजारी जिल्हाध्यक्ष देविदास देसाई जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरंगे  तालुकाध्यक्ष बजरांग दरंदलेआदिसह गोपीनाथ शिंदे, दिलीप गायके, माणीक जाधव, सुभाष चोरडीया, प्रकाश गदिया, मुरली वधवाणी, चंद्रकांत गायकवाड, देवराम गाढे, अनिल मानधना, योगेश नागले, अजीज शेख, एकनाथ थोरात, सुधिर गवारे,  नरेंद्र खरात, उमेश दरंदले, मच्छींद्र भालके,  श्याम पवार, सचीन मानधने, बाळकृष्ण कांगुणे, विजय मैराळ, राजन वधवाणी, धनु झिरंगे, वासुदेव वधवाणी आदिंसह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार उपस्थीत होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पगारवाढ करण्यात यावी  प्राँव्हीडंट फंडाची रक्कम त्वरीत अदा करण्यात यावी या मागणीसाठी बेलापुर ग्रामपंचायत कर्मचारी  धरणे आंदोलन सुरु केले असुन गटविकास अधिकारी अनंत परदेशी यांच्यासमोर कामगारांनी टोकाची भुमीका घेतल्यामुळे बोलणी फिसकटली वेतनवाढ करण्यात यावी पंधरा महीन्यापासुन थकीत असलेली प्राँव्हीडंट फंडाची रक्कम तातडीने जमा करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य श्रमीक संघाचे काँ.जिवन सुरुडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरु केलेले आहे .आंदोलनाचा आज दुसरा दिवस होता .कामगार व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यात तोडगा काढण्यासाठी गटविकास अधिकारी अनंत परदेशी हे ग्रामपंचायत कार्यालयात आले होते ते येण्यापुर्वी जि प सदस्य शदर नवले, भाजपाचे जेष्ठ नेते,सुनिल मुथा देविदास देसाई प्रफुल्ल डावरे,गावकरी पतसंस्थे चे चेअरमन साहेबराव वाबळे,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख, हाजी इस्माईल शेख, पुरुषोत्तम भराटे,मोहसीन सय्यद,प्रभात कु-हे, शफिक बागवान, विशाल आंबेकर,शफिक आतार,जब्बार आतार  यांनी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे व कामगारांचे नेते जिवन सुरुडे यांच्याशी चर्चा करुन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी ८००रुपये व २००रुपये अशी एक हजार रुपये पगारवाढ देण्याचे कबुल केले मात्र कामगार हे १२००रुपये पगारवाढ करण्यावर ठाम राहीले त्यामुळे बैठकीत एकमत होवु शकले नाही त्यामुळे बोलणी फिसकटली अन कर्मचारी आंदोलन  सुरुच ठेवण्यावर ठाम राहीले ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी देखील या पुढे आपण पगारवाढ देवु शकत नसल्याचे स्पष्ट केले त्या वेळी बोलताना उपसरपंच अभिषेक खंडागळे म्हणाले की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पगारावर ३५% खर्च करण्याची तरतुद असतानाही बेलापुर ग्रामपंचायत पगारावर ७०% खर्च करते ५०लाख उत्पन्न असुन ३६ लाख रुपये त्याकरीता आगोदरच पगारावर खर्च होत आहे आणखी खर्ख वाढला तर इतर कामे करणे अवघड होईल हे सर्व ग्रामस्थाच्या नजरेसा आणून दिले आहे .८००+ २०० पगारवाढ देतानाही फार कसरत करावी लागणार असल्याचे सरपंच साळवी यांचे म्हणणे आहे तर कामगार नेते जीवन सुरुडे यांच्या मते कोरोनामुळे वसुली झाली नाही याचे निमित्त पुढे करुन कामगारांना पगारवाढ केलेली नाही महागाई भरमसाठ वाढल्यामुळे किमान पंधराशे रुपये  पगारवाढ देण्यात यावी आशी मागणी केली

बेलापूर |प्रतिनिधी|-बेलापूर येथून महाविद्यालयात शिकणार्‍या 17 वर्षांच्या एका अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीस फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राहुरी तालुक्यातील चांदेगाव परिसरात मोलमजुरी करणार्‍या मुलीच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, दि. 12 सप्टेंबर रोजी 7.45 ते सकाळी 11.30 च्या दरम्यान आपली 17 वर्षे 4 महिने वयाची बेलापूर येथील महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. लोटके करीत आहेत. नजीकच्या काळात बेलापुरातून अल्पवयीन मुलगी पळवून नेण्याची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे पालकवर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे.

श्रीरामपुर (प्रतिनिधी) १४/९: सोमय्या विद्या विहार प्रणितश्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल,कोपरगाव येथे १४ सप्टेंबर राष्ट्र भाषा हिंदी दिनानिमित्त राज्यस्तरीय हिंदी वकृत्व स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये श्रीरामपूर येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजने उत्तेजनार्थ तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.मागील दीड वर्षापासून अधिक काळ शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल प्रत्येक वर्षी तिन्ही भाषाची वकृत्व स्पर्धेचे आयोजन करते. यावर्षी हिंदी वकृत्व स्पर्धेसाठी अहमदनगर,नासिक पुणे व औरंगाबाद जिल्ह्यातून २५ शाळांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी कुमारी हीरल नितीन जेठवा हिचा विषय होता "समय बडा बलवान " व कुमारी रश्मी मनोज गिडवाणी हिचा विषय होता "आझादी के ७५ साल " दोघींनीही उत्कृष्ट वकृत्व करून ५० स्पर्धकांमध्ये चतुर्थ क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री राम टेकावडे,सचिव कुमार प्रतिक्षित टेकावडे , प्रा डॉ योगेश पुंड ,पर्यवेक्षक श्री सोलंकी,पर्यवेक्षक सौ जेठवा,पर्यवेक्षक श्री त्रिपाठी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.यशस्वी विद्यार्थिनींना ज्येष्ठ हिंदी शिक्षिका शेख यांचे मार्गदर्शन लाभले.

वकृत्व_स्पर्धेचा_अंतिम_निकाल

प्रथम क्रमांक : श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल,कोपरगाव

द्वितीय क्रमांक: आत्मा मलिक स्पेशल इंटिग्रेटेड मिलिटरी स्कूल, कोकमठण 

तृतीय क्रमांक: प्रवरा पब्लिक स्कूल, प्रवरानगर 

उत्तेजनार्थ पारितोषिक

 १) विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल,अहमदनगर

२) सेवा निकेतन कॉन्व्हेन्ट स्कूल, कोपरगाव

३) न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज श्रीरामपूर


बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर व परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या अचानक वाढली असुन या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे                                गेल्या काही दिवसापासून गावात मोकाट कुत्रे गल्लोगल्ली फिरताना दिसत आहेत अज्ञात वहानातुन पहाटेच्या वेळेस टेम्पोतुन हे कुत्रे बाजार तळाजवळ सोडण्यात आल्याचे काही नागरीकांनी पाहीले आहे आता टेम्पोतुन आणलेले हेच कुत्रे टोळक्याने गावात फिरत आहे गावातील कुत्री व नव्यानेच गावात दाखल झालेली कुत्री एकमेकावर हल्ले करत आहे . या मोकाट कुत्र्यापासुन लहान मुले तसेच जनावरांना धोका आहे .मागे काही दिवसापूर्वी अशाच प्रकारे प्रवरा पुलाजवळ कुत्रे सोडण्यात आले होते त्या वेळी नागरीकांच्या तक्रारीवरुन ग्रामपंचायतीने मोकाट कुत्री पकडून बाहेरगावी सोडली होती त्याच पध्दतीने पुन्हा मोकाट कुत्रे पकडून न्यावेत अशी ग्रामस्थांची मागणी आहे या बाबत नुकतेच बेलापुर ग्रामपंचायतीने श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिलेली असुन त्या तक्रारीतही अज्ञात वाहनातुन ही कुत्री सोडण्यात आली असल्याचे म्हाटले आहे

बेलापुर  (प्रतिनिधी  )-गाव संरक्षणात गणेश विसर्जन शांततेत पार पाडून बेलापूरगावाने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला असुन अशा प्रकारे सर्वांनी कृती केल्यास पोलीस खात्यावरील वाढता ताण निश्चितच कमी होण्यास मदत होईल असा विश्वास पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केला  बेलापुर ग्रामपंचायतीच्या शतक महोत्सव व गणेशोत्सवाचे औचित्य साधुन देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न व्हावा अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे त्यामुळे त्यांना निमंत्रण देण्यासाठी गावातील शिष्टमंडळ अहमदनगर येथे गेले होते त्या वेळी गावाने आत्तापर्यत वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले असुन सर्व धर्मिय प्रार्थना स्थळावरील भोंग्यावरुन राष्ट्रगीत लावण्यात आले होते पंधरा आँगस्टचे ध्वजारोहन सर्व धर्मिय संत महंताच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर गणेशोत्सवा दरम्यान जिवंत देखाव्याचे आयोजन करण्यात आले होते तसेच पोलीस बंदोबस्ताशिवाय गणेश विसर्जन मिरवणूक काढण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता सर्व गणेश मंडळ व गणेश भक्तांच्या सहकार्यातुन कसलेही विघ्न न येता मिरवणूक शांततेत पार पडली .त्यामुळे आपण देखावा स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमास उपस्थित रहावे अशी विनंती जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केली चांगले उपक्रम राबविणारे गाव म्हणून बेलापुरची ओळख असुन या कार्यक्रमास निश्चितच येईल असे अश्वासन पोलीसा अधिक्षक मनोज पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले या शिष्टमंडळात जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे  पत्रकार देविदास देसाई गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे भाजपाचे सरचिटणीस प्रफुल्ल डावरे ,गांवकरी पतसंस्थेचे संचालक अजिज शेख मोहासीन सय्यद दादासाहेब कुताळ आदिंचा समावेश होता

श्रीरामपूर प्रतिनिधी-आरोपींना अटक होवून सात दिवस झाले तरी भोकर येथील अपहत दिपक बर्डेचा तपास पोलिसांकडून होवू शकला नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासाबाबत आम्हाला शंका आहे. याप्रकरणाचा तपास चांगल्या वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फत करावा. असंख्य हिंदू मुलींना गायब करुन त्यांचे धर्मांतर केले जाते. आम्ही किती सहन करायचे? सहन करण्याचे काँन्ट्रॅक्ट फक्त हिंदुंनी घेतले आहे का? यापुढे हिंदुवरील अन्याय सहन केले जाणार नाही, असा इशारा आ. नितेश राणे यांनी दिला.भोकर येथील दिपक बर्डे या तरुणाचे अपहरण करुन घातपात केल्याच्या निषेधार्थ काल सकाळी आ. नितेश राणे व माजीमंत्री आ. अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. सदरचा जनआक्रोश मोर्चा खा. गोविंदराव आदिक सभागृहापासून संगमनेर रोड, शिवाजी रोडवरुन मेनरोड व अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयात नेण्यात आला आहे. या मोर्चा दरम्यान नगरपरिषदेमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला व रेल्वे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आ. राणे व आ. उईके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या मोर्चात शहर, तालुका तसेच अन्य तालुक्यातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिपक बर्डेचा तपास लावा, धर्मांतर थांबवा, हिंदुवरील अन्याय सहन करणार नाही अशा घोषणा घेत हातात भगवे झेंडे घेवून हा मोर्चा काढण्यात आला होता.अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयात मोर्चा आल्यानंतर अप्पर पोलीस अधिक्षक यांच्या कार्यालयात आ. नितेश राणे, आ. अशोक उईके यांच्यासह काही कार्यकर्ते जावून त्यांनी या तपासाबाबत शंका उपस्थित करुन इतके दिवस होवूनही हा तपास का लागला नाही? आरोपी अटक होवून सात दिवस झाले तरी पोलिसांना काहीच माहिती मिळाली नाही का? अशा प्रश्‍नांची सरबत्ती केली.आ. राणे यांनी सांगितले की, आजचा मोर्चा माहित असूनही पोलीस निरीक्षक रजेवर गेला आहे. त्याचा अर्थ असा की, या आरोपींशी त्यांचा सहभाग असू शकतो. अशा अधिकार्‍यांची एसआयटी अथवा सीआयडीमार्फत चौकशी करा, अशी मागणी विधानसभेत करणार आहोत. असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील धर्मांतर थांबले पाहिजे, अन्यथा वेगळा मार्ग अवलंब करावा लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

बेलापुर (प्रतिनिधी  )-श्रीरामपुर तालुक्यात सर्वात मोठे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेलापुर गावाने विना पोलीस बंदोबस्तात गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडुन एक नवा इतिहास रचला असुन सन २००७ नंतर दुसऱ्यांदा असा उपक्रम राबविण्यात आला आहे              स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व बेलापुर ग्रामपंचायतीचा शतक महोत्सवाचे औचित्य साधुन बेलापुर  ग्रामस्थांनी पोलीस संरक्षणात नाही तर गाव संरक्षणात गणेश विसर्जन मिरवणूक पार पाडण्याचा निर्णय घेतला तसे आश्वासन सर्व ग्रामस्थांनी शंतता कमीटीच्या बैठकीत पोलीस अधीकाऱ्यांना दिले होते त्या करीता पुर्व तयारी म्हणून बेलापुर पोलीस स्टेशन येथे दोन दिवस आगोदर सर्व गणेश मंडळ प्रमुख व नेते मंडळीच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीतही

विना पोलीस बंदोबस्तात गणेश विसर्जन करण्याच्या निर्णयावर ग्रामस्थ ठाम राहीले .त्यामुळे बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके यांनी सर्व ग्रामस्थ व गणेश मंडळे आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे वरीष्ठांना कळवीले तरीही खबरदारी म्हणून  नेहमीप्रमाणे तीन पोलीस कर्मचारी बेलापुरातील मुख्य जाम मस्जिदसमोर बंदोबस्तासाठी आले असता मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते मोहसीन सय्यद यांनी पत्रकार देविदास देसाई यांना कळविले की आपण आपल्या संरक्षणात गणेश विसर्जन मिरवणूक करणार आहोत परंतू या ठिकाणी पोलीस आलेले आहेत पत्रकार देसाई यांनी तातडीने पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचेशी सांपर्क साधला व तेथुन पोलीस बंदोबस्त हटविण्याची विनंती केली त्यानंतर तातडीने सर्व पोलीस पोलीस स्टेशनला गेले.सकाळी जे.टी. एस.हायस्कुल च्या गणेशाची विसर्जन मिरवणुक संपन्न झाली.शाळेच्या विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधले.सायंकाळी साडेचार वाजता गणेश विसर्जन मिरवणूकीस सुरुवात झाली बेलापुरातील मुख्य झेंडा चौकात सर्वात प्रथम मेहेत्रे वस्ती येथील गणराज मित्र मंडळाची मिरवणूक आली या मंडळाने झेंडा चौकाला वळसा घालुन नगररोडनेच मिरवणूक नेली त्यानंतर छत्रपती तरुण मंडळाची मिरवणूक आली झेंडा चौकात आल्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली या आरतीसाठी सर्व ग्रामस्थ जमा झाले होते त्यांनतर हिंदु संघटक विर सावरकर मित्र मंडळाचा गणपती होता त्या पाठोपाठ श्रीराम हेल्थ क्लब ,लक्ष्मी नारायण नगर मित्र मंडळाचा गणपती ,सर्वात शेवटी रामराज्य मित्र मंडळाचा गणपती होता  झेंडा चौकात मिरवणूक आल्यानंतर मा  जिं प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले कै मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड,माजी सरपंच भरत साळुंके,गावकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे,हाजी ईस्माईल शेख,विलास मेहेत्रे,चंद्रकांत नाईक, मोहसीन सय्यद,बाबुलाल पठाण,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,रमेश अमोलिक,मोहसीन ख्वाजा शेख अजिज शेख, पुरुषोत्तम भराटे,पोलिस पाटील अशोक प्रधान,शिवाजी वाबळे,पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा किशोर कदम,महेश कु-हे,दादासाहेब कुताळ,विशाल आंबेकर,सचिन वाघ,अमोल गाडे आदि मान्यवरांच्या हस्ते   गणपती बाप्पाची पुजा करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले. मिरवणूकीचे वैशिष्ट्य म्हणून प्रत्येक मंडळाने स्वतंत्र वाद्य लावले होते सर्व मंडळाची मिरवणूक वाजत गाजत बेलापुरच्या मुख्य जामा मस्जिद समोर आली असता मुस्लिम बांधवांच्या वतीने सर्व मंडळाच्या गणपती बाप्पांना पुष्पहार अर्पण करण्यात आले .दोन वर्षानंतर गणेशोत्सव साजरा करण्यास मिळाल्यामुळे सर्व  मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मनसोक्त आंनद लुटला सर्व मंडळांनी वाजत गाजत रात्री दहा वाजता छत्रपती तरुण मंडळाच्या गणपतीचे विसर्जन झाले त्या पाठोपाठ सर्व मंडळांनी शांततेत गणेश विसर्जन केले कसलाही पोलीस बंदोबस्त न घेता गावाच्या संरक्षणात शांततेत मिरवणूक पार पाडण्याचा मान नगर जिल्ह्यात बेलापुर गावाने सर्व प्रथम मिळवीला .या पुर्वी सन २००७ मध्येही असाच उपक्रम राबविण्यात आला होता त्यानंतर सर्व ग्रामस्थ व मंडळाचे कार्यकर्ते या सर्वांच्या सहकार्यातुन गाव संरक्षणात कसलीही वादावादी न होता आनंदात गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. मुस्लिम बांधवांनी देखील ग्रामस्थांच्या अवाहनाला प्रतिसाद देत मिरवणूक शांततेत पार पाडण्याकामी विशेष सहकार्य केले . अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी ग्रामस्थांचे तसेच सर्व गणेश मंडळाचे आभार मानले आहे .गणेश विसर्जन झाल्यानंतर सर्व मंडळाचे आभार व्यक्त करण्यात आले या वेळी मा जि प सदस्य शरद नवले पत्रकार देविदास देसाई पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे तंटामुक्ती अध्यक्ष प्रफुल्ल डावरे विष्णूपंत डावरे हाजी ईस्माईल शेख मोहसीन सय्यद भाजपाचे प्रफुल्ल डावरे आदिनी सर्व गणेश मंडळांना धन्यवाद दिले तसेच गावाकरीता आपले मतभेद बाजुला ठेवुन अशाच प्रकारे एक राहण्याचेही अवाहन करण्यात आले.बेलापुर ग्रामपंचायतीच्या आरोग्य विभाग कामगारांनी निर्माल्य गोळा करण्याचे काम केले तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने विसर्जन स्थळी लाईट व सुरक्षा कठडे लावण्यात आले होते. त्याचप्रमाणाने पोहणारे तरुण देखील सज्ज ठेवण्यात आले होते.

श्रीरामपूर प्रतिनिधी-येथील एका अल्पवयीन मुलीची त्याच शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाने वर्गात जावून छेड काढल्या प्रकरणी संतप्त झालेल्या जमावाने शाळेत जाऊन धरणे आंदोलन केले.श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले, मात्र तो पर्यंत चितळी स्टेशन परिसरातील व्यापारी वर्गानी आपले दुकाने बंद ठेवून घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच चितळी गाव व स्टेशन परिसरात पोलिसांच्या आशीर्वादाने फोफावलेले अवैध धंदे या घटनेला कारणीभूत ठरत असल्याचे चर्चा दिवस भर गावात रंगली होती.सविस्तर माहिती अशी की, चितळी (ता.राहाता) येथील हायस्कुल मध्ये इयत्ता नववीमध्ये शिकणारा अल्पवयीन आरोपीने दहावीत शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलीच्या वर्गात जावून तिची छेड काढली. झालेल्या प्रकाराने ही विदयार्थी घाबरून गेली, झालेला प्रकार घरी समजल्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबाने श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात सदर आरोपी विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.दरम्यान या घडलेल्या घटनेचा निषेध व आरोपीने चार दिवसा पूर्वी शाळेत दुसऱ्या एका अल्पवयीन मुलीशी गैर वर्तन केले होते. त्यामुळे त्यास शाळेतून काढून टाकावे व लवकरात लवकर अटक करून कारवाई होण्याकरिता परिसरातील जळगाव, एलमवाडी, धनगरवाडी तसेच परिसरातील पालक व नागरिक मोठ्या संख्येने शाळेच्या प्रागणात जमा झाले होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने पो.नि. शिंदे, सहाय्यक पो.नि.अमृत बोरसे यांनी निवेदन स्वीकारून शाळेच्या वेळेत पेट्रोलिंग करून कायमस्वरूपी पोलीस दूरक्षेत्रासाठी कर्मचारी नेमणूक करण्याचे आश्वासन दिले.

शिर्डी प्रतिनिधी-शिर्डी  शहरातील हॉटेल,लॉजमध्ये जर वेश्या व्यवसाय चालत असेल तर त्यावर तातडीने कारवाई करून सदरचे हॉटेल, लॉजींग सिल करण्यात यावेत, असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला दिले असून भाविकांना छळणार्‍या पॉलीशवाल्यांचा मुळापासून नायनाट करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.शिर्डीच्या सुरक्षिततेसाठी शिर्डी शहरातील हॉटेल लॉजींग मालक चालक यांची बैठक बुधवारी पोलीस स्टेशनसमोरील मॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, वाहतूक कक्षाचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, सहा. पोलीस निरीक्षक प्रविण दातरे, सहा पोलीस निरीक्षक संभाजी पाटील, सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती कोकाटे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.यावेळी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी प्रत्येकाचे मत ऐकून घेतले. यानंतर श्री. पाटील यांनी सांगितले की, येथील हॉटेल इंडस्ट्रीजचे मालक चालक यांचे नुकसान व्हावे अशी आमची इच्छा नाही. या ठिकाणी येणारा भाविक सुरक्षीत असायला हवा. जिल्ह्यात सुरक्षेच्या कारणास्तव कलम 144 लागू करण्यात आले आहे. हॉटेलमध्ये येणार्‍या पर्यटकांची ओळखपत्र घेणे आवश्यक आहे. विमानाने शिर्डीत येणार्‍या भाविकांचे रेकॉर्ड तपासणे गरजेचे आहे. भाविकांना चुकीच्या सेवा दिल्या जाणार नाही याची दक्षता घ्यावी. हॉटेल तसेच लॉजमध्ये काम करणार्‍या कामगारांचे देखील ओळखपत्र किंवा पोलीस व्हेरिफिकेशन दाखला घ्यावेत. हॉटेलमध्ये इंटरनेटद्वारे देण्यात येणारी अनसिक्युअर वायफाय सेवा सिक्युअर करण्यात यावी.परदेशी पर्यटकांचे प्रत्येक हॉटेलमध्ये सी फार्म भरुन घेणे क्रमप्राप्त असून परदेशी पर्यटकांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. परदेशी पर्यटकांच्या निवासासाठी शिर्डी शहरात अद्यापपर्यंत फक्त चोवीस हॉटेलला मान्यता देण्यात आली आहे. ज्यांना सी फार्म बाबत माहिती हवी असल्यास स्थानिक पोलीस प्रशासनाला संपर्क साधावा. मुदतबाह्य तसेच व्हिसा संपलेल्या नागरिकांना बिलकुल थारा देऊ नये.प्रत्येक हॉटेल, लॉजमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. येणार्‍या भाविकांना तसेच लोकांना त्रास देणार्‍या पॉलीशीवाल्यांवर तसेच वेळप्रसंगी हॉटेल मालकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल याची गांभीर्याने दक्षता घ्यावी. यासंदर्भात पोलीसांना सक्त सुचनाही देण्यात आल्या आहेत.भाविकांना छळणार्‍या पॉलीशवाल्यांचा मुळापासून नायनाट करण्यासाठी पोलीसांना सहकार्य करावे.शहरातील रिक्षावाल्यांचे रेकॉर्ड तसेच वाहनांची कागदपत्रे तपासणी करण्यात यावी, असेही शिर्डी वाहतूक कक्षाचे पोलिस निरीक्षक यांना आदेश देण्यात आले. घरमालकांनी भाडेकरुंना भाड्याने घर देताना भाडेकरूंची सर्व माहिती घेऊन पोलीस ठाण्यात द्यावी. सायबर कॅफे चालक-मालक यांनी येणार्‍या ग्राहकांचे ओळखपत्र घेऊन प्रवेश द्यावा. इंटरनेट वापरलेल्या कालावधीची नोंद घ्यावी. वेबसाईटवर आक्षेपार्ह मजकूर टाकण्यासाठी वापर करू देऊ नये. शिर्डी शहरात सदरची कारवाई निरंतर चालू ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. शहरात गांजा, दारू, नशेची पदार्थांचे विक्री तसेच अवैध धंदे याबाबत माहिती देणार्‍यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही उपविभागीय अधिकारी सातव यांनी सांगितले.

बेलापूरः(प्रतिनिधी  )-बेलापूर बुll  ग्रामपंचायतीच्या शताब्दीवर्षा निमित्त आदर्श ग्राम समितीचे सदस्य तसेच पाटोदा या राज्यातील ख्यातीप्राप्त गावाचे सरपंच भास्करराव पेरे यांचे "गाव सेवा हिच ईश्वर सेवा"या विषयावर गुरुवार(ता.८)रोजी सायं.६ वा. व्याख्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती सरपंच महेन्द्र साळवी तसेच उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी दिली आहे. बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या शताब्दीपूर्ती निमित्त ग्रामापंचायतीच्या वतीने व ग्रामस्थांच्या सहकार्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रम अंतर्गत गुरुवार ता.८ सप्टेंबर रोजी सायं ६ वा. पाटोदा(ता.जि.औरंगाबाद )येथील राज्यातील ख्यातनाम आदर्श गावचे सरपंच भास्करराव पेरे यांच्या व्याख्यानाचे आजाद मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे.                                                           श्री.भास्करराव पेरे यांना आदर्श सरपंच म्हणून  राज्य शासनाचे तसेच डाॕ.बाबासाहेब आंबेडकर  मराठवाडा विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.श्री.पेरे यांनी पाटोदा गावाचा कायापालट करुन राज्यातील आदर्श गाव असा लौकिक मिळवून दिला आहे.पाटोदा गावाला केन्द्र शासनाचा निर्मल ग्राम पुरस्कार ,संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार ,केन्द्र शासनाचा पंचायत राज सबलीकरण आदिसह अनेक राज्यस्तरिय पुरस्कार मिळाले आहेत.श्री.पेरे हे राज्यभर ग्रामविकासाबाबत व्याख्याने देवून जनजागृती करतात.तरी ग्रामस्थांनी श्री.भास्करराव पेरे यांचे   व्याख्यानास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच श्री.साळवी,उपसरपंच श्री.खंडागळे ,ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच ग्रामसेवक यांनी केले आहे.

बेलापुर (प्रतिनिधी )- गणेश विसर्जना दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये या करीता अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांनी बेलापुर येथील प्रवरा नदीवरील गणपती विसर्जन जागेची पहाणी करुन बेलापुर ग्रामपंचायत तसेच सर्व शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याचा योग्य त्या सुचना दिल्या , बेलापूरात एकुण सोळा गणेश मंडळांनी श्रीगणेशाची स्थापना केली असुन सर्व गणेश मंडळ गणेश विसर्जन हे बेलापूर नदीवरील पुलाजवळच करत असतात तसेच प्रवरा नदीला पाणी असल्यामुळे श्रीरामपुर येथील गणेश मंडळेही गणपती विसर्जन करण्याकरीता बेलापुरला येतात त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून श्रीरामपुरच्या पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांनी सर्व शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत गणेश विसर्जन स्थळाला भेट दिली. या वेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे व ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांनी गणेश विसर्जन नियोजनाबाबत  माहीती दिली या वेळी आवश्यक त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करा बँरेकेट़्स लावा सीसीटीव्ही कँमेरे बसवा गर्दी होणार नाही याची दक्षता घ्या अशा सुचना अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांनी संबधीतांना दिल्या .गणेश विसर्जना दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडल्यास पोहणाऱ्या तरुणांची टिमही तयार ठेवण्यात आली असुन तीच मुले नदी पात्रात जावुन गणेश विसर्जन करतात इतरांना खोल पाण्यात जावु दिले जात नाही तसेच या ठिकाणी बँरेकेट़्स तसेच ठिकठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सांगितले   या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी नगरपालीकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे हवालदार अतुल लोटके हरिष पानसंबळ पत्रकार देविदास देसाई,ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक,विशाल आंबेकर  तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्रीरामपूर प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष, दै.जय बाबा व विठ्ठल प्रभा वर्तमानपत्राचे संस्थापक,भारत सरकार नोटरी,ॲडव्होकेट श्री.शंकरराव बाळाजी आगे यांचे आज दि.०७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ०८:४५ वा वृद्धापकाळाने वयाच्या ७७ व्या वर्षी दुःखद निधन झाले.त्यांचा अंत्यविधी आज दि.०७ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ०४:००वा  अमरधाम,श्रीरामपूर येथे होईल.

- अंत्ययात्रा सप्तश्रृंगी निवास,बजरंगनगर,बेलापूर रोड,वार्ड नं-०७,श्रीरामपूर येथुन निघेल.

बेलापुर  ( वार्ताहर ) श्रीरामपुर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या टाकळीभान ग्रामपंचायतीचे एकाच वेळेस दहा सदस्य अपात्र ठरविण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असुन घुमनदेव नंतर टाकळीभानचे सदस्य  अपात्र झाले असुन आता तालुक्याबरोबरच जिल्ह्यातही खळबळ उडाली आहे              घुमनदेव ग्रामपंचायतीचे तीन सदस्य सरकारी जागेत अतिक्रमण केल्यामुळे अपात्र झाल्यानंतर आता राजकिय प्रतिष्ठा असलेल्या व नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असलेल्या टाकळीभान ग्रामपंचायतीच्या १० सदस्यांवर सरकारी जागेत अतिक्रमण केल्याच्या कारणाने ग्रामपंचायत आधिनियमातील तरतुदी नुसार सदस्यपदी रहाण्यास अपाञ ठरवले आहे. महाराष्ट्र राज्यात प्रथमच एवढीमोठी कारवाई झाल्याने व सरपंच व उपसरपंच एकाच वेळी अपाञ झाल्याने ग्रामपंचायत कामकाजाचा गुंता वाढल्याने पुन्हा प्रशासकिय राज सुरु होण्याचे संकेत मिळत आहेत.

           टाकळीभान ग्रामपंचायतीची १८ जानेवारी २०२१ ला मोठी चुरशीची निवडणुक झाली होती. जिल्हाभर या निवडणुकिची चर्चा रंगली होती.  माजी सभापती नानासाहेब पवार यांची एकहाती सत्ता मतदारांनी उलथुन टाकत निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या तरुण उमेद्वारांच्या बाजुने  कौल देत १७ पैकी १६ सदस्य विजयी करुन एकहाती सत्तेच्या चाव्या दिल्या होत्या. महाविकास आघाडीत माजी आ. भानुदास मुरकुटे गटाचे संख्याबळ जास्त असल्याने सरपंच व उपसरपंच निवडीत मुरकुटे गटाने बाजी मारली होती  माञ मुरकुटे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना व स्थानिक गावपुढार्यांना हा आनंद फार काळ पचवता आला आला नाही. गेल्या काही दिवसापासून ग्रामपंचायत कारभारात अंतर्गत धुसफुस सुरु झाल्याने कलह वाढत गेला.

           नुकत्याच निवडुन आलेल्या १० ग्रामपंचायत सदस्यांनी सरकारी जागेत अतिक्रमण करुन रहात असल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १४ ( १ )( ज - ३ ) व १६ प्रमाणे या सदस्यांची झालेली निवड बेकायदेशिर असल्याने त्यांचे सदस्यत्व कायद्याने अपाञ झाले आहे टाकळीभान ग्रामपंचायतीच्या दहा सदस्यांनी सरकारी जागेत अतिक्रमण  केले असुन त्याचे सदस्यपद रद्द करावे असा विवाद अर्ज २९ जुन २०२१ रोजी जेष्ठ शिवसेना नेते राधाकृष्ण वाघुले यांनी प्रभाग १ च्या सदस्या सविता पोपट बनकर, प्रभाग २ चे अशोक लालचंद कचे, सुनिल तुकाराम बोडखे व लता भाऊसाहेब पटारे, प्रभाग ३ चे संतोष अशोक खंडागळे व अर्चना शिवाजी पवार, प्रभाग ४ चे सरपंच अर्चना यशवंत रणनवरे व कल्पना जयकर मगर, प्रभाग ५ च्या कालिंदा बाबासाहेब गायकवाड व दिपाली सचिन खंडागळे यांच्या विरोधात विवाद अर्ज अहमदनगर येथील अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात दाखल केला होता.

      या दाखल विवाद अर्जाची वेळोवेळी जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात घेण्यात आली. गटविकास आधिकारी श्रीरामपुर यांनी या प्रकरणी प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण करुन जिल्हाधिकारी यांना आहवाल सादर केला होता. या सर्व पुराव्यांच्या कागदपञांची पडताळणी करुन जिल्हाधिकारी यांनी तक्रारदार राधाकृष्ण वाघुले यांचा विवाद आर्ज मंजुर करत वरील पैकि १० सदस्यांना सदस्यपदी रहाण्यास आपाञ ठरवत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचे लेखी आदेश दिले आहेत. तर विभागिय आयुक्तांकडे अपिलासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे.

         या निर्णयामुळे सतरा सदस्य आसलेल्या या ग्रामपंचायतीत सरपंच व उपसरपंचासह १० सदस्य आपाञ ठरवले गेल्याने व त्यांचे सदस्यपद रद्द झाल्याने  केवळ ७ सदस्य उरले आहेत. त्यामुळे या सदस्यांना धोरणात्मक निर्णय घेता येणार नसल्याने व आर्थिक व्यवहार ठप्प होणार आसल्याने ग्रामपंचायतीवर पुन्हा प्रशासकाची नियुक्ति होवुन प्रशासकिय राज सुरु होणार का ? याकडे ग्रामस्थांच्या नजरा लागल्या आहेत. जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आसल्याने सरकारी जागेत अतिक्रमण करुन रहाणार्या सदस्यांचे धाबे दणानले आहे. जिल्हाधिकारी यांच्या या निकालामुळे विरोधी गटात माञ खुशी निर्माण झाली आहे.

 जिल्हाधिकारी यांनी केलेल्या या कारवाईमुळे ग्रामपंचायतीचा प्रभाग क्रमांक २ व ३ चे सर्व सदस्यांचे सदस्यपद रद्द झाल्याने हे दोन्ही प्रभाग पोरके झाले आहेत तर प्रभाग ४ मधील सरपंचासह दोन महीला, प्रभाग १ मधील एक महीला तर प्रभाग ४ मधील दोनमहीला आपाञ झाल्या आहेत. प्रभाग ६ माञ सुरक्षित राहीला आहे. या १० सदस्यांच्या अपाञञेत ७ महीला सदस्य अपाञ ठरल्या आहेत. सभासदत्व रद्द झालेल्या दहा सदस्यांनी निवडणुकित प्रतिज्ञा पञ सादर करताना चुकिची माहीती देवुन शासनाची फसवणुक केलेली असल्यामुळे हे सदस्य अपात्र करावेत अशी मागणी शिवसेनेचे राधाकृष्ण वाघुले यांनी केली होती

श्रीरामपूर(प्रतिनिधी)-श्रीरामपुरातील एक तरूणी 40 दिवसांपासून बेपत्ता असूनही तिचा तपास लागला नाही. हा ‘लव जिहाद’चाच प्रकार असल्याने या प्रकरणाचा तपास करून आरोपीला शोधून त्याच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी आज श्रीरामपुरात शिवप्रहार प्रतिष्ठानच्या वतीने तसेच समस्त हिंदु समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. येत्या 4 दिवसात जर सदर आरोपीचा तपास लागला नाही तर शहरातील व्यापार्‍यांशी चर्चा करून श्रीरामपूर बंदचे आवाहन करण्यात येईल, असा इशारा शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख माजी पेालीस अधिकारी सूरजभाई आगे यांनी दिला आहे.

एका कॉलेज तरूण मुलीला मुस्लिम समाजाच्या एका तरूणाने पळवून नेलेले आहे परंतू, पोलीस ठाण्यात याबाबत फक्त मिसिंगचा गुन्हा दाखल झालेला आहे. सदर प्रकार हा लव जिहादचा असल्याने सदर तरूणाचा शोध घेवून कारवाई करण्यासाठी मुलीच्या कुटूंबीयांनी अनेकदा निवेदनं दिले परंतू मुलीचा तपास न लागल्याने आज या प्रकरणी शिवप्रहार प्रतिष्ठान आणि समस्त हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठया संख्येने तरूण सहभागी झाले होते. श्रीरामपूर शहरात लव जिहादचे प्रकार वाढत असून याला वेळीच आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. शहरात एका मुलीला पळवून नेले जाते, त्यांचे कुटूंबीय पोलीसांकडे निवेदन देवून मागणी करते. त्यांना न्याय मिळत नाही म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने मोर्चा काढतो तर आम्हालाच उलट नोटीसा दिल्या जातात. मग लोकशाही मार्गानेही न्याय मागायचा नाही का? अशाप्रकारे न्याय मागणार्‍यांना नोटीसा देवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न  केल्यास भविष्यात कोणी कोणाला न्याय मिळवून देण्यासाठी उभे राहणार नाही. हे लोकशाहीच्या आणि न्यायाच्या दृष्टीने चुकीचे आहे, असे सांगत सूरजभाई आगे म्हणाले, येत्या 4 दिवसात जर सदर प्रकरणाचा तपास न लागल्यास आणि आरोपीला अटक न झाल्यास शहरातील व्यापारी वर्गाशी विचारविनिमय करून श्रीरामपूर बंद बाबतचा निर्णय किंवा लोकशाही मार्गाने अन्य आंदोलनाबाबत निर्णय घेतला जाईल, असे यावेळी शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख माजी पोलीस अधिकारी सूरजभाई आगे यांनी सांगितले. यावेळी पोनि. हर्षवर्धन गवळी, सपोनि. बोर्से यांना मागणीचे रितसर निवेदन देण्यात आले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget