श्रीरामपूर MIDC मध्ये चोरांनी लाखोंच्या लोखंडी प्लेट केल्या लंपास क्रेन जेसीबीचा वापर झाल्याची चर्चा.
श्रीरामपूर - शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत छोट्या मोठ्या चोरीच्या घटनां समोर येत आहे. या घटनांच्या चालता २७ सप्टेंबरच्या मध्यरात्री, एम आय डी सी मधील ए १४८ मधील, निकेत बोऱ्हाडे यांच्या मालकीच्या. कृष्णा सिमेंट पाईप प्रॉडक्शन या कंपनीतील अंदाजे २ टनच्या वर, लोखंडी प्लेट चोरून नेल्याची घटना घडली आहे. या धाडसी चोरी संदर्भात माहिती मिळताच, महिला पोलीस उपनिरीक्षक एस बी देवरे, टिळकनगर पोलीस चौकीचे, पोलीस नाईक मच्छिंद्र शेलार.,साईनाथ राशिनकर, बाळासाहेब गुंजाळ आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन. घटनास्थळाचा पंचनामा करून, निकेत बोऱ्हाडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला. तसेच घटनास्थळावर मिळालेले ठसे तपासण्याकरिता, फिंगर एक्सपर्ट पथकास बोलावून नमुने घेऊन. सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. एम आय डी सी मधील या धाडसी चोरी नंतर ,सदरच्या चोरांचा बंदोबस्त करून, छोट्या व्यापाऱ्यांना सहकार्य करावे अशी विनंती, उद्योजक निकेत बोऱ्हाडे यांनी केली आहे.
Post a Comment