बेलापुरच्या भुमीपुत्राचा भारत सरकारच्या वतीने दिल्लीत सन्मान

बेलापुर  (प्रतिनिधी  )- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या आझादी से अंत्योदय तक या मोहीमेत बेलापुरच्या प्रविण प्रकाश कुऱ्हे या तरुणाने वर्धा जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ग्रामीण विकास मंत्रालय नवी दिल्ली येथे त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. बेलापुरचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश कुऱ्हे यांचे चिरंजीव प्रविण कुऱ्हे हे वर्धा जिल्ह्यात जिल्हा कार्यकारी अधिकारी (MVSTF) म्हणून कार्यरत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारच्या वतीने "आझादी से अंत्योदय  तक  ही ९० दिवसांची मोहीम देशातील महत्वाच्या स्वातंत्र्य सैनिकाशी संबधीत सैनिकांचे जन्मस्थान असणाऱ्या ७५ जिल्ह्यामध्ये विकास कामांना गती देण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालय ग्रामीण विकास विभाग भारत सरकारच्या वतीने एकम "अंत्योदय" मोहीम सुरु करण्यात आली होती त्यात नऊ मंत्रालयाच्या एकुण १७ योजनांचा समावेश करण्यात आला होता. वर्धा जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीमती.प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे, बेलापुरचे भुमीपुत्र प्रविण प्रकाश कुऱ्हे यांनी दिनांक २८एप्रिल २०२२ ते १५ आँगस्ट  २०२२ दरम्यान ही मोहीम युद्ध पातळीवर राबवीली त्यामुळे देशातील टाँप टेन जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्याची ९ क्रमांकावर निवड झालेली आहे. यासाठी सर्व विभाग प्रमुख, अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. नवी दिल्ली येथे ग्रामीण विकास विभाग भारत सरकार यांच्या वतीने ग्रामीण विकास मंत्रालय येथे आयोजित कार्यक्रमात ग्रामीण मंत्रालयाचे सचिव नागेंद्र नाथ सिन्हा, उपसचिव आशिष कुमार गोयल, ग्रामविकास मंत्रालयाचे संयुक्त सचिव कर्मा जिम्पा भुटीया उपसचिव दिनेश कुमार तसेच नऊ मंत्रालयाच्या सचिवांच्या उपस्थितीत देशातुन टाँप टेनमध्ये आलेल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा कार्यकारी अधिकारी याचा सन्मान करण्यात आला असुन प्रविण कुऱ्हे यांच्या सन्मानामुळे बेलापुरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे जनता अघाडीचे अध्यक्ष रविंद्र खटोड भाजपाचे सरचिटणीस प्रफुल्ल डावरे प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा किशोर कदम आदिंनी त्याचे अभिनंदन केले आहे.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget