बेलापूर |प्रतिनिधी|-बेलापूर येथून महाविद्यालयात शिकणार्या 17 वर्षांच्या एका अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीस फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राहुरी तालुक्यातील चांदेगाव परिसरात मोलमजुरी करणार्या मुलीच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, दि. 12 सप्टेंबर रोजी 7.45 ते सकाळी 11.30 च्या दरम्यान आपली 17 वर्षे 4 महिने वयाची बेलापूर येथील महाविद्यालयात शिक्षण घेणार्या अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. लोटके करीत आहेत. नजीकच्या काळात बेलापुरातून अल्पवयीन मुलगी पळवून नेण्याची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे पालकवर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Post a Comment