
श्रीरामपुर (प्रतिनिधी) १४/९: सोमय्या विद्या विहार प्रणितश्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल,कोपरगाव येथे १४ सप्टेंबर राष्ट्र भाषा हिंदी दिनानिमित्त राज्यस्तरीय हिंदी वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये श्रीरामपूर येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजने उत्तेजनार्थ तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.मागील दीड वर्षापासून अधिक काळ शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल प्रत्येक वर्षी तिन्ही भाषाची वकृत्व स्पर्धेचे आयोजन करते. यावर्षी हिंदी वकृत्व स्पर्धेसाठी अहमदनगर,नासिक पुणे व औरंगाबाद जिल्ह्यातून २५ शाळांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी कुमारी हीरल नितीन जेठवा हिचा विषय होता "समय बडा बलवान " व कुमारी रश्मी मनोज गिडवाणी हिचा विषय होता "आझादी के ७५ साल " दोघींनीही उत्कृष्ट वकृत्व करून ५० स्पर्धकांमध्ये चतुर्थ क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री राम टेकावडे,सचिव कुमार प्रतिक्षित टेकावडे , प्रा डॉ योगेश पुंड ,पर्यवेक्षक श्री सोलंकी,पर्यवेक्षक सौ जेठवा,पर्यवेक्षक श्री त्रिपाठी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.यशस्वी विद्यार्थिनींना ज्येष्ठ हिंदी शिक्षिका शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
वकृत्व_स्पर्धेचा_अंतिम_निकाल
प्रथम क्रमांक : श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल,कोपरगाव
द्वितीय क्रमांक: आत्मा मलिक स्पेशल इंटिग्रेटेड मिलिटरी स्कूल, कोकमठण
तृतीय क्रमांक: प्रवरा पब्लिक स्कूल, प्रवरानगर
उत्तेजनार्थ पारितोषिक
१) विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल,अहमदनगर
२) सेवा निकेतन कॉन्व्हेन्ट स्कूल, कोपरगाव
३) न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज श्रीरामपूर
Post a Comment