एका कॉलेज तरूण मुलीला मुस्लिम समाजाच्या एका तरूणाने पळवून नेलेले आहे परंतू, पोलीस ठाण्यात याबाबत फक्त मिसिंगचा गुन्हा दाखल झालेला आहे. सदर प्रकार हा लव जिहादचा असल्याने सदर तरूणाचा शोध घेवून कारवाई करण्यासाठी मुलीच्या कुटूंबीयांनी अनेकदा निवेदनं दिले परंतू मुलीचा तपास न लागल्याने आज या प्रकरणी शिवप्रहार प्रतिष्ठान आणि समस्त हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठया संख्येने तरूण सहभागी झाले होते. श्रीरामपूर शहरात लव जिहादचे प्रकार वाढत असून याला वेळीच आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. शहरात एका मुलीला पळवून नेले जाते, त्यांचे कुटूंबीय पोलीसांकडे निवेदन देवून मागणी करते. त्यांना न्याय मिळत नाही म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने मोर्चा काढतो तर आम्हालाच उलट नोटीसा दिल्या जातात. मग लोकशाही मार्गानेही न्याय मागायचा नाही का? अशाप्रकारे न्याय मागणार्यांना नोटीसा देवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास भविष्यात कोणी कोणाला न्याय मिळवून देण्यासाठी उभे राहणार नाही. हे लोकशाहीच्या आणि न्यायाच्या दृष्टीने चुकीचे आहे, असे सांगत सूरजभाई आगे म्हणाले, येत्या 4 दिवसात जर सदर प्रकरणाचा तपास न लागल्यास आणि आरोपीला अटक न झाल्यास शहरातील व्यापारी वर्गाशी विचारविनिमय करून श्रीरामपूर बंद बाबतचा निर्णय किंवा लोकशाही मार्गाने अन्य आंदोलनाबाबत निर्णय घेतला जाईल, असे यावेळी शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख माजी पोलीस अधिकारी सूरजभाई आगे यांनी सांगितले. यावेळी पोनि. हर्षवर्धन गवळी, सपोनि. बोर्से यांना मागणीचे रितसर निवेदन देण्यात आले.
40 दिवसांपासून बेपत्ता तरूणीचा तपास नाहीश्रीरामपुरात पुन्हा ‘लव जिहाद’; शिवप्रहार प्रतिष्ठानचा भव्य मोर्चा
श्रीरामपूर(प्रतिनिधी)-श्रीरामपुरातील एक तरूणी 40 दिवसांपासून बेपत्ता असूनही तिचा तपास लागला नाही. हा ‘लव जिहाद’चाच प्रकार असल्याने या प्रकरणाचा तपास करून आरोपीला शोधून त्याच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी आज श्रीरामपुरात शिवप्रहार प्रतिष्ठानच्या वतीने तसेच समस्त हिंदु समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. येत्या 4 दिवसात जर सदर आरोपीचा तपास लागला नाही तर शहरातील व्यापार्यांशी चर्चा करून श्रीरामपूर बंदचे आवाहन करण्यात येईल, असा इशारा शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख माजी पेालीस अधिकारी सूरजभाई आगे यांनी दिला आहे.
Post a Comment