श्रीरामपूर प्रतिनिधी-येथील एका अल्पवयीन मुलीची त्याच शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाने वर्गात जावून छेड काढल्या प्रकरणी संतप्त झालेल्या जमावाने शाळेत जाऊन धरणे आंदोलन केले.श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले, मात्र तो पर्यंत चितळी स्टेशन परिसरातील व्यापारी वर्गानी आपले दुकाने बंद ठेवून घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच चितळी गाव व स्टेशन परिसरात पोलिसांच्या आशीर्वादाने फोफावलेले अवैध धंदे या घटनेला कारणीभूत ठरत असल्याचे चर्चा दिवस भर गावात रंगली होती.सविस्तर माहिती अशी की, चितळी (ता.राहाता) येथील हायस्कुल मध्ये इयत्ता नववीमध्ये शिकणारा अल्पवयीन आरोपीने दहावीत शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलीच्या वर्गात जावून तिची छेड काढली. झालेल्या प्रकाराने ही विदयार्थी घाबरून गेली, झालेला प्रकार घरी समजल्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबाने श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात सदर आरोपी विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.दरम्यान या घडलेल्या घटनेचा निषेध व आरोपीने चार दिवसा पूर्वी शाळेत दुसऱ्या एका अल्पवयीन मुलीशी गैर वर्तन केले होते. त्यामुळे त्यास शाळेतून काढून टाकावे व लवकरात लवकर अटक करून कारवाई होण्याकरिता परिसरातील जळगाव, एलमवाडी, धनगरवाडी तसेच परिसरातील पालक व नागरिक मोठ्या संख्येने शाळेच्या प्रागणात जमा झाले होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने पो.नि. शिंदे, सहाय्यक पो.नि.अमृत बोरसे यांनी निवेदन स्वीकारून शाळेच्या वेळेत पेट्रोलिंग करून कायमस्वरूपी पोलीस दूरक्षेत्रासाठी कर्मचारी नेमणूक करण्याचे आश्वासन दिले.

Post a Comment