बेलापुर (प्रतिनिधी )-श्रीरामपुर तालुक्यात सर्वात मोठे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेलापुर गावाने विना पोलीस बंदोबस्तात गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडुन एक नवा इतिहास रचला असुन सन २००७ नंतर दुसऱ्यांदा असा उपक्रम राबविण्यात आला आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व बेलापुर ग्रामपंचायतीचा शतक महोत्सवाचे औचित्य साधुन बेलापुर ग्रामस्थांनी पोलीस संरक्षणात नाही तर गाव संरक्षणात गणेश विसर्जन मिरवणूक पार पाडण्याचा निर्णय घेतला तसे आश्वासन सर्व ग्रामस्थांनी शंतता कमीटीच्या बैठकीत पोलीस अधीकाऱ्यांना दिले होते त्या करीता पुर्व तयारी म्हणून बेलापुर पोलीस स्टेशन येथे दोन दिवस आगोदर सर्व गणेश मंडळ प्रमुख व नेते मंडळीच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीतही
विना पोलीस बंदोबस्तात गणेश विसर्जन करण्याच्या निर्णयावर ग्रामस्थ ठाम राहीले .त्यामुळे बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके यांनी सर्व ग्रामस्थ व गणेश मंडळे आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे वरीष्ठांना कळवीले तरीही खबरदारी म्हणून नेहमीप्रमाणे तीन पोलीस कर्मचारी बेलापुरातील मुख्य जाम मस्जिदसमोर बंदोबस्तासाठी आले असता मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते मोहसीन सय्यद यांनी पत्रकार देविदास देसाई यांना कळविले की आपण आपल्या संरक्षणात गणेश विसर्जन मिरवणूक करणार आहोत परंतू या ठिकाणी पोलीस आलेले आहेत पत्रकार देसाई यांनी तातडीने पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचेशी सांपर्क साधला व तेथुन पोलीस बंदोबस्त हटविण्याची विनंती केली त्यानंतर तातडीने सर्व पोलीस पोलीस स्टेशनला गेले.सकाळी जे.टी. एस.हायस्कुल च्या गणेशाची विसर्जन मिरवणुक संपन्न झाली.शाळेच्या विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधले.सायंकाळी साडेचार वाजता गणेश विसर्जन मिरवणूकीस सुरुवात झाली बेलापुरातील मुख्य झेंडा चौकात सर्वात प्रथम मेहेत्रे वस्ती येथील गणराज मित्र मंडळाची मिरवणूक आली या मंडळाने झेंडा चौकाला वळसा घालुन नगररोडनेच मिरवणूक नेली त्यानंतर छत्रपती तरुण मंडळाची मिरवणूक आली झेंडा चौकात आल्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली या आरतीसाठी सर्व ग्रामस्थ जमा झाले होते त्यांनतर हिंदु संघटक विर सावरकर मित्र मंडळाचा गणपती होता त्या पाठोपाठ श्रीराम हेल्थ क्लब ,लक्ष्मी नारायण नगर मित्र मंडळाचा गणपती ,सर्वात शेवटी रामराज्य मित्र मंडळाचा गणपती होता झेंडा चौकात मिरवणूक आल्यानंतर मा जिं प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले कै मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड,माजी सरपंच भरत साळुंके,गावकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे,हाजी ईस्माईल शेख,विलास मेहेत्रे,चंद्रकांत नाईक, मोहसीन सय्यद,बाबुलाल पठाण,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,रमेश अमोलिक,मोहसीन ख्वाजा शेख अजिज शेख, पुरुषोत्तम भराटे,पोलिस पाटील अशोक प्रधान,शिवाजी वाबळे,पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा किशोर कदम,महेश कु-हे,दादासाहेब कुताळ,विशाल आंबेकर,सचिन वाघ,अमोल गाडे आदि मान्यवरांच्या हस्ते गणपती बाप्पाची पुजा करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले. मिरवणूकीचे वैशिष्ट्य म्हणून प्रत्येक मंडळाने स्वतंत्र वाद्य लावले होते सर्व मंडळाची मिरवणूक वाजत गाजत बेलापुरच्या मुख्य जामा मस्जिद समोर आली असता मुस्लिम बांधवांच्या वतीने सर्व मंडळाच्या गणपती बाप्पांना पुष्पहार अर्पण करण्यात आले .दोन वर्षानंतर गणेशोत्सव साजरा करण्यास मिळाल्यामुळे सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मनसोक्त आंनद लुटला सर्व मंडळांनी वाजत गाजत रात्री दहा वाजता छत्रपती तरुण मंडळाच्या गणपतीचे विसर्जन झाले त्या पाठोपाठ सर्व मंडळांनी शांततेत गणेश विसर्जन केले कसलाही पोलीस बंदोबस्त न घेता गावाच्या संरक्षणात शांततेत मिरवणूक पार पाडण्याचा मान नगर जिल्ह्यात बेलापुर गावाने सर्व प्रथम मिळवीला .या पुर्वी सन २००७ मध्येही असाच उपक्रम राबविण्यात आला होता त्यानंतर सर्व ग्रामस्थ व मंडळाचे कार्यकर्ते या सर्वांच्या सहकार्यातुन गाव संरक्षणात कसलीही वादावादी न होता आनंदात गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. मुस्लिम बांधवांनी देखील ग्रामस्थांच्या अवाहनाला प्रतिसाद देत मिरवणूक शांततेत पार पाडण्याकामी विशेष सहकार्य केले . अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी ग्रामस्थांचे तसेच सर्व गणेश मंडळाचे आभार मानले आहे .गणेश विसर्जन झाल्यानंतर सर्व मंडळाचे आभार व्यक्त करण्यात आले या वेळी मा जि प सदस्य शरद नवले पत्रकार देविदास देसाई पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे तंटामुक्ती अध्यक्ष प्रफुल्ल डावरे विष्णूपंत डावरे हाजी ईस्माईल शेख मोहसीन सय्यद भाजपाचे प्रफुल्ल डावरे आदिनी सर्व गणेश मंडळांना धन्यवाद दिले तसेच गावाकरीता आपले मतभेद बाजुला ठेवुन अशाच प्रकारे एक राहण्याचेही अवाहन करण्यात आले.बेलापुर ग्रामपंचायतीच्या आरोग्य विभाग कामगारांनी निर्माल्य गोळा करण्याचे काम केले तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने विसर्जन स्थळी लाईट व सुरक्षा कठडे लावण्यात आले होते. त्याचप्रमाणाने पोहणारे तरुण देखील सज्ज ठेवण्यात आले होते.

Post a Comment