भोकर येथील दिपक बर्डे या तरुणाचे अपहरण करुन घातपात केल्याच्या निषेधार्थ आ. नितेश राणे व माजीमंत्री आ. अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत जनआक्रोश मोर्चा

श्रीरामपूर प्रतिनिधी-आरोपींना अटक होवून सात दिवस झाले तरी भोकर येथील अपहत दिपक बर्डेचा तपास पोलिसांकडून होवू शकला नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासाबाबत आम्हाला शंका आहे. याप्रकरणाचा तपास चांगल्या वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फत करावा. असंख्य हिंदू मुलींना गायब करुन त्यांचे धर्मांतर केले जाते. आम्ही किती सहन करायचे? सहन करण्याचे काँन्ट्रॅक्ट फक्त हिंदुंनी घेतले आहे का? यापुढे हिंदुवरील अन्याय सहन केले जाणार नाही, असा इशारा आ. नितेश राणे यांनी दिला.भोकर येथील दिपक बर्डे या तरुणाचे अपहरण करुन घातपात केल्याच्या निषेधार्थ काल सकाळी आ. नितेश राणे व माजीमंत्री आ. अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. सदरचा जनआक्रोश मोर्चा खा. गोविंदराव आदिक सभागृहापासून संगमनेर रोड, शिवाजी रोडवरुन मेनरोड व अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयात नेण्यात आला आहे. या मोर्चा दरम्यान नगरपरिषदेमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला व रेल्वे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आ. राणे व आ. उईके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या मोर्चात शहर, तालुका तसेच अन्य तालुक्यातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिपक बर्डेचा तपास लावा, धर्मांतर थांबवा, हिंदुवरील अन्याय सहन करणार नाही अशा घोषणा घेत हातात भगवे झेंडे घेवून हा मोर्चा काढण्यात आला होता.अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयात मोर्चा आल्यानंतर अप्पर पोलीस अधिक्षक यांच्या कार्यालयात आ. नितेश राणे, आ. अशोक उईके यांच्यासह काही कार्यकर्ते जावून त्यांनी या तपासाबाबत शंका उपस्थित करुन इतके दिवस होवूनही हा तपास का लागला नाही? आरोपी अटक होवून सात दिवस झाले तरी पोलिसांना काहीच माहिती मिळाली नाही का? अशा प्रश्‍नांची सरबत्ती केली.आ. राणे यांनी सांगितले की, आजचा मोर्चा माहित असूनही पोलीस निरीक्षक रजेवर गेला आहे. त्याचा अर्थ असा की, या आरोपींशी त्यांचा सहभाग असू शकतो. अशा अधिकार्‍यांची एसआयटी अथवा सीआयडीमार्फत चौकशी करा, अशी मागणी विधानसभेत करणार आहोत. असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील धर्मांतर थांबले पाहिजे, अन्यथा वेगळा मार्ग अवलंब करावा लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget