श्रीरामपूर प्रतिनिधी-महाराष्ट्र युवा खेल परिषद अंतर्गत १७/१८/१९ सप्टेंबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे केशर लॉन्स या ठिकाणी राज्यस्तरीय कराटे किक बॉक्सिंग तायक्वांदो किक जुडो स्पर्धा पार पडल्या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य चे माजी क्रीडामंत्री माननीय खासदार चंद्रकांत जी खैरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा.रखमाजी जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माझी क्रीडा उपसंचालक मा.जगन्नाथ अधाने साहेब माजी महापौर नंदकुमार घोडेले माझी डीवायएसपी अशोक आमले महाराष्ट्र युवा खेल परिषदेचे माननीय अध्यक्ष कल्याण जाधव सर उपाध्यक्ष शंकर गायकवाड सर संघटनेचे महासचिव प्रा. पुरब सुर्यवंशी सर खजिनदार श्रीकांत पाटील सर टेक्निकल डायरेक्टर निलेश वाघचौरे राजेश जाधव आदी मान्यवर उपस्थिती होते या स्पर्धेमध्ये 15 जिल्ह्यातून 55 संघचे ३५० ते ४०० विद्यार्थी सहभागी झाले होते यात ७० क्रीडा शिक्षक क्रीडा कोच यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थी व सदस्यांनी आपला सहभाग नोंदविला. या ठिकाणी प्रथम पारितोषिक नागपूर जिल्ह्याने, दृतिय पारितोषिक पुणे जिल्ह्याने, तर तृतीय पारितोषिक अहमदनगर जिल्ह्या श्रीरामपूर ग्लोबल मार्शल आर्टने पटकविले. प्रशिक्षक कलीम बिनसाद यांचा क्रीडा कोच व सर्व पालकांकडून शिक्षकांकडून तसेच महाराष्ट्रातील कोच ह्याच्या कडून प्रशंसा करण्यात आली.
Post a Comment