बेलापूरः(प्रतिनिधी )-बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या शताब्दीवर्षा निमित्त आदर्श ग्राम समितीचे सदस्य तसेच पाटोदा या राज्यातील ख्यातीप्राप्त गावाचे सरपंच भास्करराव पेरे यांचे "गाव सेवा हिच ईश्वर सेवा"या विषयावर गुरुवार(ता.८)रोजी सायं.६ वा. व्याख्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती सरपंच महेन्द्र साळवी तसेच उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी दिली आहे. बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या शताब्दीपूर्ती निमित्त ग्रामापंचायतीच्या वतीने व ग्रामस्थांच्या सहकार्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रम अंतर्गत गुरुवार ता.८ सप्टेंबर रोजी सायं ६ वा. पाटोदा(ता.जि.औरंगाबाद )येथील राज्यातील ख्यातनाम आदर्श गावचे सरपंच भास्करराव पेरे यांच्या व्याख्यानाचे आजाद मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे. श्री.भास्करराव पेरे यांना आदर्श सरपंच म्हणून राज्य शासनाचे तसेच डाॕ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.श्री.पेरे यांनी पाटोदा गावाचा कायापालट करुन राज्यातील आदर्श गाव असा लौकिक मिळवून दिला आहे.पाटोदा गावाला केन्द्र शासनाचा निर्मल ग्राम पुरस्कार ,संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार ,केन्द्र शासनाचा पंचायत राज सबलीकरण आदिसह अनेक राज्यस्तरिय पुरस्कार मिळाले आहेत.श्री.पेरे हे राज्यभर ग्रामविकासाबाबत व्याख्याने देवून जनजागृती करतात.तरी ग्रामस्थांनी श्री.भास्करराव पेरे यांचे व्याख्यानास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच श्री.साळवी,उपसरपंच श्री.खंडागळे ,ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच ग्रामसेवक यांनी केले आहे.

Post a Comment