श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर शहरातील सुखदा हाउसिंग सोसायटी समोरील बंद असलेले घर फोडून चोरट्यांनी फॅन, तांब्या पितळाच्या वस्तू, भांडी, घरातील रोकडसह देव्हार्यातील वस्तूंची चोरी केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्रीरामपूर शहरातील सुखदा हाउसिंग सोसायटीसमोर राहुल उत्तम अभंग यांचे घर असून ते बंद होते. दि. 19 सप्टेंबर रोजी 9.30 ते सायं. 4.45 च्या सुमारास राहूल अभंग यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील 15 हजार रुपयांची रोकड त्यात नाणे आणि नोटा तसेच 2 हजार रुपयांच्या घरगुती वस्तू, फॅन तसेच 1500 रुपयांच्या तांब्या-पितळांच्या वस्तू त्यात घंटी, दिवटी रंगनाथ, गणपती, छोटे ताट, तांब्या, बादली आदींसह देवघरातील वस्तू आरोपीने चोरून नेल्या आहेत.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात राहूल अभंग यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 851/2022 प्रमाणे सनी दिलीप थोरात, (वय 20), रा. बजरंग चौक, वॉर्ड नं. 2, श्रीरामपूर याचेविरूद्ध भादंवि कलम 457, 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक श्री. शेलार हे करत आहेत.

Post a Comment