December 2019

०१) समाधी मंदिरातील शंखास सौ.रक्षा अलोक शर्मा (दिल्‍ली) यांनी सुमारे ३०० ग्रॅम वजनाचे सुमारे १२ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्‍याचे आवरण संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्‍याकडे देणगी स्‍वरुपात सुपूर्त केले.



फोटो नं ०२) बेंगलोर येथील दानशुर साईभक्‍त श्री.बसवराजा यांनी सरत्‍या वर्षाला निरोप व नुतन वर्षाच्‍या स्‍वागतानिमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिर व मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट केली.

धुळे( प्रतिनिधी )शहरातील जुने धुळे भागातील ग.नं.14 च्या परिसरात असलेल्या देविदास नगरात बनावट दारूचा कारखाना  आझादनगर पोलिसांनी  उद्ध्वस्त केला. तब्बल दोन तास चाललेल्या  या कारवाईत पोलिसांनी दारू बनविण्यासह पॅकिंगचे साहित्य जप्त केले असून याप्रकरणी एकाला ताब्यातही घेण्यात आले आहे.अशी माहिती आझादनगर पोलीस ठाण्याचे निरिक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे.याबाबत माहिती  जुने धुळे भागातील ग.नं.14 च्या परिसरात एका मोकळ्या जागेत बनावट दारू बनविण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधिक्षक डॉ.राजु भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली  हेकॉ.दीपक पाटील, संजय सुर्यवंशी, महिला हेकॉ.वाडिले, पोना.पाथरवट, रमेश माळी, पोकॉ. संजय भोई, शोएब बेग, अतिक शेख, डी.बी.मालचे, जे.बी.भागवत, सागर सोनवणे, संतोष घुगे यांच्या पथकाने रात्री सव्वा दहाच्या सुमारास देविदास नगरात छापा टाकला.यावेळी देविदास नगरातील सुर्यमंदिराजवळ एका घराच्या पाठीमागे असलेल्या मोकळा जागेत दारू बनविण्याचा कारखाना सुरू  असल्याचे आढळून आले. पोलिसांनी छापा टाकून त्या ठिकाणी असलेल्या देशी-विदेशी दारूच्या साठ्यासह बाटलीचे बुच, रिकाम्या बाटल्या, बुच सिलबंद करण्याचे मशिन, प्लास्टिकचे ड्रम आदी मिळून 32 हजार 549 रूपयांचा ऐवज जप्त केला.याप्रकरणी सागर गणेश परदेशी या 25 वर्षीय तरूणालाही ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ) (फ) (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

अहमदनगर (प्रतिनिधी)  मनमाड महामार्गावरील पत्रकार चौकात झालेल्या भीषण अपघातात टँकरच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी साडेबारा वाजता घडली. कमलेश अनिल पटवा (वय- 27 रा. भुतकरवाडी) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.आज दुपारी साडेबाराच्या सुमारास दुधाने भरलेला टँकर नगर कडुन मनमाडच्या दिशेने चाललेला असताना यावेळी तारकपूरकडून सावेडीकडे दुचाकीवर चाललेला तरुण टँकरला जाऊन धडकला.टँकर तरुणांच्या अंगावरून गेल्यामुळे तरूणाचा जागीच मृत्यू झाला. पत्रकार चौकातील वाहतूक शाखेच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये ही घटना कैद झाल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांनी सांगितले. दरम्यान अपघात होताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. हाकेच्या अंतरावर असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- तरुणांच्या बौध्दिक विकासा बरोबरच शारीरिक विकास होणे आवश्यक आहे त्या करीता बेलापूर गावात लवकरच व्यायाम शाळा बांधुन व्यायामाचे साहीत्य देखील  देणार असल्याची घोषणा आमदार लहु कानडे यांनी केली              
 नाताळ व नव वर्षानिमित्त  समता स्पोर्टस् क्लबच्या वतीने सायकल व रनिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या विजेत्या स्पर्धकाना आमदार लहु कानडे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते आमदार कानडे पुढे म्हणाले की बेलापूर ग्रामपंचायतीने व्यायाम शाळेस जागा उपलब्ध करुन द्यावी त्या ठिकाणी व्यायाम शाळा व व्यायामाचे साहीत्य देण्याची जबाबदारी माझी आहे संगणकामुळे आजचा तरुण हुशार झाला असला तरी त्यास शारिरीक व्यायाम करण्यास वेळच नसतो परंतु शरीर तंदुरुस्त असणे आवश्यक आहे समता स्पोर्टस् क्लबने सामाजिक कार्याची  गेल्या तीस वर्षाची परपंरा अखंडीतपणे चालु ठेवली आहे त्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन आपल्या चांगल्या कार्यात माझीही मदत लागल्यास ती मदत करण्यास मी तयार आहे असेही ते म्हणाले  सायकल स्पर्धेत प्रथम क्रमांक  मिळविणारे प्रविण जाधव यांना सायकल बक्षिस देण्यात आली दुसर्या क्रमांकाचे रुपये २२२२ चे बक्षिस उदय टिमकरे याने मिळविले तृतीय क्रमांकाचे रुपये ११११ चे बक्षिस प्रसाद कलंगडे याने मिळविले चौथ्या क्रमांकाचे रुपये ७७७ चे बक्षिस सुशांत राऊत याने मिळविले आकाश धाटे यास उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले धावण्याच्या स्पर्धेचे पहीले बक्षिस रुपये ३३३३ चे  किशोर मरकड याने मिळविले  दुसऱ्या क्रमांकाचे रुपये २२२२चे बक्षिस दिनेश पाटील याने मिळविले  तृतीय क्रमांकाचे रुपये ११११चे बक्षीस अजय साबळै याने मिळविले चौथ्या क्रमांकाचे बक्षीस रुपये ७७७ कमलेश गायकवाड याने मिळविले किसन बनकर व राहुल देशमुख यांना उत्तेजनार्थ बक्षिस  देण्यात आले या वेळी पंचायत समीती सदस्य अरुण पा नाईक उपसरपंच रविंद्र खटोड बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले भरत साळुंके मनोज श्रीगोड देविदास देसाई दिलीप दायमा जावेद शेख आदि उपस्थित  होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष संतोष शेलार उपाध्यक्ष रोहण शेलार गणेश शेलार सुयश शेलार अविनाश शेलार सुहास शेलार विपुल शेलार ऋतिक शेलार संजय शेलार अक्षय शेलार आदिनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजय शेलार यांनी केले तर बंटी शेलार यांनी आभार मानले प्रास्ताविक संजय शेलार यांनी केले

🔹 वन्यजीव विभाग हुआ सतर्क
🔸 कब खत्म होगी बाघिन की तलाश

 बुलढाणा - 29 दिसंबर

2 सप्ताह पहेले ज्ञानगंगा अभयारण्य से बाहर निकलकर अजंता पर्वतीय श्रृंखला से होते हुए अजंता की गुफाओं तक का सैर-सपाटा कर आखिर सी-1 बाघ वापस ज्ञानगंगा अभयारण्य में लौट आने की जानकारी वन्यजीव विभाग से मिली है.अपने सुरक्षित अधिवास व बाघिन की तलाश में ये 3 वर्षीय नर बाघ अब तक 1700 किलोमीटर से अधिक का प्रवास कर चुका है.इस अभयारण्य में बाघ के वापस लौट आने से अकोला वन्यजीव विभाग के अधिकारियों में उत्साह का वातावरण देखा जा रहा है.
         यवतमाल जिले के "टीपेश्वर अभयारण्य" में करीब 3 साल पहेले  "टी-1" नामक एक बाघिन ने 3 शावकों को जन्म दिया था. इन शावकों को क्रमशः सी-1, सी-2 और सी-3 ये नाम दिए गए थे.ढाई साल की उम्र में यह बाघ अपनी माँ को छोडकर पडोसी राज्य तेलंगाना के आदिलाबाद के जंगल में चला गया था जो फिर महाराष्ट्र में लौट आया और नांदेड़, हिंगोली, परभणी और वाशिम से होते हुए 5 माह में 13 सौ किलोमीटर की लंबी यात्रा करते हुए 1 दिसेंबर की रात में बुलढाणा जिलों के "ज्ञानगंगा अभयारण्य" में प्रवेश किया.सी-1 इस बाघ को रेडियो कॉलर लगा होने से उसका पीछा वाइल्डलाइफ इंस्टिट्यूट ऑफ इंडिया की टीम निरंतर कर रही है.15 दिन "ज्ञानगंगा अभयारण्य" में इस बाघ ने गुज़ारे जिस से  ये अनुमान लागाया जा रहा था कि अब इसी अभयारण्य को याद बाघ अपना आधिवास क्षेत्र बना लेगा किंतु ये बाघ अभयारण्य बाहर निकल गया और बोरखेड होते हुए बुलढाणा के करीब से गुज़रकर राजुर घाट में जा पहुंचा और बुलढाणा-मलकापुर मार्ग को क्रॉस कर अजंता पर्वत श्रृंखला से होते देवलघाट,पाडली,गिरडा,सवलतबारा जंगल से निकलकर जालना जिले के धावडा और फिर औरंगाबाद जिले की सीमा में प्रवेश करते हुए अजंता की गुफाओं के पास फरदापुर और फिर आगे सोयगांव परिक्षेत्र तक चला गया.इधर-उधर भटकने के बाद इस बाघ ने अपने कदम वापस खींचते हुए जिस रास्ते से गुज़रा था उस से सटकर ही ये बाघ अजंता की पहाड़ियों की सफारी कर 27 दिसेंबर को वापस ज्ञानगंगा अभयारण्य में लौट आया है.बाघ ने अब तक 1700 किलोमीटर से अधिक का सफर तय करते हुए एक रिकॉर्ड बनाया है.खास बात तो ये है कि इतनी लंबी यात्रा करने के बाद भी कहीं पर बाघ ने किसी मनुष्य पर हमला नही किया है. इस बाघ पर अकोला वन्यजीव विभाग के अधिकारी पूरी तरह से नज़र बनाए हुए हैं.

*कब तक यूँ ही भटकेगा सी-1 बाघ*
जानकारों की माने तो सी-1 बाघ अब पूरी तरह से जवान हो गया है जो संरक्षित अधिवास की बजाय खास तौर पर बाघिन की तलाश में घूम रहा है.अब तक 17 सौ किलोमीटर से अधिक यात्रा इस बाघ की हो गई फिर भी बाघिन नही मिल पाई है. बाघ का वापस ज्ञानगंगा अभयारण्य में वापस लौट आना इस बात के संकेत दे रहे है कि अब वे यहाँ स्थायिक हो सकता है और यदि बाघ इस अभयारण्य में रुक गया तो उसे एक बाघिन की आवश्यकता रहेगी,ऐसे में वन्यजीव विभाग इस दिशा में विचार करते हुए मेलघाट,ताडोबा या फिर अन्य किसी व्यघ्र प्रकल्प से एक बाघिन की व्यवस्था करना चाहिए.

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोतवाली पोलीस ठाण्यातील हवालदारा ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात अडकल्यापाठोपाठ तोफखान्याचा हवालदारही अडकला. सलग दोन दिवस दोन पोलीस एसीबीच्या ट्रॅपमध्ये सापडल्याने पोलीस दलातील लाचखोरी समोर आली आहे.तोफखाना पोलीस ठाण्यातील हवालदार पोपट पंडित रोकडे असे लाचेच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिसाचे नाव आहे. 10 हजार रुपयांची लाच स्वीकारण्यासाठी रोकडे याने थेट कलेक्टर ऑफिसचे आवार निवडले. तेथेच एसीबीने रोकडे यास लाच घेताना रंगेहात पकडले.वहिनीसोबतचा कौटुंबिक वादाचा गुन्हा दाखल न करता तो अदखलपात्र नोंदविण्यासाठी रोकडे याने 15 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती 10 हजार रुपये लाच देण्याचे ठरले. ही लाच घेताना रोकडे यास एसीबीने पकडले.गुरूवारी कोतवाली पोलीस ठाण्याचा हवालदार अनिल गिरी गोसावी यास 5 हजार रुपयांचा लाच घेताना पकडल्यानंतर शुक्रवारी तोफखान्यातील हवालदार रोकडेदेखील एसीबीच्या ट्रॅपमध्ये अडकले. सलग दोन दिवसांच्या या कारवाईने पोलिसांतील लाचखोरी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे

पाथर्डी_तालुका प्रतिनिधी विकास दिनकर-
पाथर्डी_लहुजी शक्ती सेनेच्या वतीने नगरपरिषदेवर जेसीबी गायब झाल्याबाबत सात दिवसांपूर्वी निवेदन देऊनही नगरपरिषदेने कुठलीही दखल घेतली नसल्याने लहुजी शक्ती सेनेच्या वतीने नगरपरिषद आंदोलन  करण्यात आले.
        जेसीबी गायब करणाऱ्या संबंधितावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा नगर परिषदेत पाथर्डी येथे सात दिवसाच्या आत तीव्र स्वरूपाचे आंदोलन लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात येईल असा इशारा देऊन देखील आज पर्यंत कुठल्या प्रकारची उचित कारवाई झाली नाही म्हणून आज  करण्यात आले. नगरपरिषद मध्ये जेसीबी च्या संदर्भात तोंडी व लेखी स्वरुपात  नगरपरिषद  सोबत संपर्क केला होता परंतु सात दिवस होऊन देखील जेसीबी संदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती न दिल्याने आज लहुजी शक्ती सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. नगरपालिकेचा जेसीबी बऱ्याच वर्षापासून गायब आहे कार्यालय प्रक्रिया न करता नगरपालिके मधून गायब झालेला आहे पालिकेचा जेसीबी गायब असल्याने तिच्या कामाच्या निमित्ताने पाथर्डी शहरातील लाखो रुपये खर्च केला असून उर्वरित बिले आदा करण्यात येऊ नयेत. तरी अद्याप पर्यंत जेसीबी चा तपास लागलेला नाही. वरून आता नागरिकांची खात्री झाली आहे सदरचे जेसीबी परत मिळू शकत नाही म्हणून संपत संबंधितावर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने सुहास घोरपडे यांनी दिला.
यावेळी सुभाष घोरपडे जिल्हाध्यक्ष,आनंद पवळे कार्याध्यक्ष,मुरली दिनकर संपर्कप्रमुख,लक्ष्मीताई काळोखे तालुकाध्यक्ष,रेखा काळोखे तालुका उपाध्यक्ष,मंदाबाई उकिरडे तालुका शहराध्यक्ष,संजय ससाणे शेवगाव तालुका प्रमुख,सीताबाई काकडे, जालिंदर काळोखे, पोपट शिरसाठ,आनंद उबाळे,शैलेश शिरसाठ,अर्जुन ससाने,दत्ता बिडवे,देविदास भारस्कर आदी उपस्थित होते.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) शासनाने सुरू केलेल्या अन्न सुरक्षा योजनेत गोरगरिबांना प्रतिमाणसी दरमहा पाच किलो धान्य देणे म्हणजेच गरिबांची क्रूर चेष्टा असून गरिबांना जगण्या इतपत धान्य शासनाने द्यावे याकरिता येत्या अधिवेशनात आवाज उठविणार असल्याची माहिती आमदार लहु कानडे यांनी दिली आहे     श्रीरामपूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने श्रीरामपूर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार लहू कानडे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष तालुका अध्यक्ष बजरंग दरंदले हे
होते यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई जिल्हा सचिव रज्जाक पठाण जिल्हा प्रसिद्धीप्रमुख चंद्रकांत झुरंगे शहराध्यक्ष माणिक जाधव गोदामपाल शिवाजी वायदंडे पुरवठा निरीक्षक कावेरी आदिक अव्वल कारकून चारुशीला मगरे आमदार कानडे यांचे सहाय्यक समिम बागवान उपस्थित होते केंद्र शासनाने एक व्यक्ती दोन व्यक्ती अशा निराधार अपंग विधवा व्यक्तींना अंत्योदय योजनेचा लाभ  दिल्यामुळे त्यांना 35 किलो धान्‍य दिले जात होते मागील शासन कर्त्याने त्या निराधारांचा घास हिरावून त्यांना प्राधान्य योजनेचा लाभ देण्याचा जुलमी निर्णय घेतला या बाबतही अधिवेशनात आवाज उठविणार आहे स्वस्त धान्य दुकानदार हा समाजातील गोरगरीब जनतेची सेवा करण्याचा करण्याचे महत्त्वाचे काम करत आहे हे पुण्याचे काम करत असताना त्यांचा प्रपंच व्यवस्थित चालेल असे कमिशन मार्जिन त्यांना मिळाले पाहिजे या करिता आपण प्रयत्न करू मात्र त्यांच्याकडूनही जनतेला  चांगली सेवा मिळाली पाहिजे असे ते म्हणाले        यावेळी बोलताना स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई म्हणाले की आपल्या तालुक्याला आमदार लहू कानडे च्या रूपाने अभ्यासू आमदार लाभलेला आहे शासनाने धान्य दुकानदारांना पाँज मशीन दिल्यामुळे दुकानदारा बरोबरच पुरवठा विभागही पाँश झाला आहे धान्य वाटपात अतिशय पारदर्शकता आली असून तालुक्याचे वाटप 93 टक्के असून अहमदनगर जिल्हा ही धान्य वाटपात आघाडीवर आहे दुकानदाराकडे प्रत्येक कार्डधारकांची चे फोन नंबर असून धान्य घेण्यासाठी त्यांना वेळोवेळी फोन केले जातात  दुकानदारही काळानुरूप बदलला आहे परंतु त्यांचा उदरनिर्वाह चालावा इतके कमिशन मार्जिन त्यांना दिले पाहिजे असेही देसाई म्हणाले यावेळी पुरवठा यंत्रणेत आमूलाग्र बदल झाले असून शासनाने एक व्यक्ती व दोन व्यक्ती यांचे अंत्योदय योजनेतील नाव काढून ते प्राधान्य कुटुंब योजना टाकल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झालेला असून शासनाने केरोसीन बंद केल्यामुळे दोन पिढ्या पासून केरोसीन व्यवसाय करणार्या दुकानदारावर अन्याय झाला असून केरोसीन बंद झाल्यामुळे त्यांचे प्रपंच उघडले आहेत याचा देखील या निमित्ताने  विचार व्हावा अशी मागणी संघटनेचे जिल्हा सचिव रज्जाक  पठाण जिल्हा प्रसिद्धीप्रमुख चंद्रकांत झुरंगे तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले माणिकराव जाधव आदींनी केली यावेळी गोदामपाल शिवाजी वायदंडे पुरवठा निरीक्षक श्रीमती कावेरी अधिक पुरवठा अव्वल कारकून श्रीमती चारुशीला मगरे यांनी पुरवठा यंत्रणेतील कामकाजाची माहिती दिली यावेळी आमदार कांनडे यांनी मला मोघम माहिती नको मी अधिकारी म्हणून काम केले असून त्याच पद्धतीने माहिती द्यावी अशी सूचना केली यावेळी सुभाष चोरडिया सुभाष साळुंखे गोपीनाथ शिंदे दिलीप गायके चंद्रकांत गायकवाड प्रकाश गदिया अनिल मानधना मुरलीधर वधवानी शिवाजी सैद देवराम गाडे योगेश नागले भाऊसाहेब वाघमारे बनीचंद खरात जाकीर शेख राठोड मच्छिंद्र भालके राजेंद्र वधवानी अतुल जिरंगे रवींद्र काळे विजय मैराळ सोमनाथ देवकर मंगेश छतवानी प्रेमचंद छतवानी रमेश हरदास राजेंद्र शिंदे राजेंद्र वाघ सतीश बोर्डे दशरथ पिसे पुंडलिक खरे सुरेश पवार श्याम पवार आदी उपस्थित होते                     [  मला स्वतःचे डोके आहे त्यात मेंदूही माझाच आहे त्यामुळे निर्णय घेण्यास व विकास कामे करण्यास मी सक्षम आहे शिवाय मी  शासनात उपायुक्त पदावर काम केल्यामुळे कायद्याची अंन कागदाची मला चांगली माहिती आहे त्यामुळे तालुक्यात आपल्या सर्वांच्या सहकार्याने चांगले काम केले जाईल जेणेकरून प्रत्येक नागरिकाला मी आमदार झाल्यासारखे वाटेल असेही आमदार कानडे म्हणाले.


अहमदनगर – कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. गुरुवारी रात्री हॉटेल इम्पेरियलसमोर ही कारवाई करण्यात आली. रात्री उशीरा झालेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे कोतवाली पोलीस स्टेशन पुन्हा चर्चेत आले आहे.अनिल अजिनाथ गिरीगोसावी (वय 33, पोलिस हवालदार, कोतवाली पोलीस स्टेशन, अहमदनगर, रा. प्लॉट नं. 100, माधवनगर , भूषणनगर , केडगाव, अहमदनगर) हे पकडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, गिरीगोसावी यांच्याकडे तपास असलेल्या गुन्ह्यात तक्रारदार हे फिर्यादी आहेत. सदर गुन्ह्यात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पोलीस हवलदार गिरीगोसावी यांनी पंचासमक्ष 5000/- रु लाचेची मागणी करून स्विकारण्याचे मान्य केले. रात्री अकरा वाजेच्या सुमारास शहरातील जुने बसस्थानक येथील हाॅटेल इम्पिरिअलसमोर पाच हजार रुपयांची लाच स्वीकारली.पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शाम पवरे, दीपक करांडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

शिर्डी प्रतिनिधि श्रीरामपूर येथून शिर्डीत प्लास्टिकचे ग्लास पत्तरवाळी ड्रोन  विकण्यासाठी आलेली महिंद्राची मालवाहतूक   mh17 bd  3085 ही रिंगरोड येथे खाली करतांना नगरपंचायतच्या पथकाने पकडली  महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी असतांना राजरोसपणे प्लास्टिकचा वापर होत आहे स्वता पर्यावरण मंत्री यांनी शिर्डीत  होत असलेल्या प्लास्टिकच्या वापरा विषयी नाराजगि व्यक्त केली असतांना ही शिर्डीत राजरोसपणे विक्री केली जाते याला नेमक कोणाचा  आशीर्वादा आहे की  शिर्डीत प्लास्टिकची विक्री होते आता नगरपंचायत नेमकी काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

नाशिक । प्रतिनिधी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर विल्होळी येथून 16 लाख रूपयांची औषधे असलेला ट्रक चोरटे पळवून नेत असताना नाशिक तालुक्यातील मुंगसरा शिवारात तो पलटी झाल्याची घटना घडली होती. हा ट्रक लुटणार्‍या चौघांच्या टोळक्यास ग्रामिण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले.संदिप शिवाजी गायकवाड (32, रा. वेळुंजे, ता. त्र्यंबकेश्वर), आकाश शिवाजी गायकवाड (22, रा. वेळुंजे, ता. त्र्यंबकेश्वर), गणेश पाराजी गांगुर्डे (28, रा. तळेगाव काचुर्ली ता. त्र्यंबकेश्वर/ तीघेही रा. सध्या महिरावणी) राहुल कारभारी जाधव (मुळेगाव, ता. नाशिक, सध्या रा. भंदुरे वस्ती, सातपूर)अशी संशयितांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिककडून मुंबईकडे औषधसाठा घेऊन जाणारा ट्रक (एमएच 04-सीए-7764) चोरट्यांनी चालकास मारहाण करून रविवारी (दि.22) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास विल्होळी शिवारातून पळवला होता. याप्रकरणी ट्रकचालकाने वाडीवर्‍हे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.चोरटे भरधाव ट्रक गिरणारेमार्गे मुंगसरा, दरी, मातोरी रस्त्याने पेठरोडकडे घेऊन जात असताना मुंगसरा शिवारात पलटी झाला. लाखो रूपयांचा औषधसाठा व ट्रक रात्रीपासून रस्त्याच्या कडेला पडून असल्याने सोमवारी (दि.23) ग्रामस्थांंनी नाशिक तालुका पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तत्काळा तपास सुरू केला होता.जिल्ह्याच्या अधिक्षक आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने याचा समांतर तपास सुरू केला होता. विल्होळीत घटना घडलेल्या भागातील सीसीटिव्ही फुटेज तपासले असता संशयित चौघे त्यात आढळून आले. त्यांची चौकशी करता हे जिंदाल कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करत असल्याचे समोर आले.पोलीसांनी तात्काळ कारवाई करत त्यांना घरून ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता. कामावरून सुटल्यानंतर घरी येत असताना त्यांनी सबंधीत ट्रक हात करून थांबवला होता. त्यात बसून येत असताना चालकास हातातील डब्याने मारहाण करत त्यास जैन मंदिराजवळ उतरवून देण्यात आले होते.तर हा ट्रक घेऊन चौघे पळून जात असताना ट्रक मुंगसरा परिसरात पलटी झाला. यामध्ये चौघांनाही जखमा झाल्या आहेत. पोलीसांनी ट्रक हस्तगत केला असून चौघांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक के.के. पाटील, सहायक निरिक्षक स्वप्नील राजपुत, सागर शिंपी व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

अहमदनगर (प्रतिनिधी)  जिल्ह्यातील पाच सराईत गुन्हेगारांवर नगर पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. या पाचही अट्टल गुन्हेगारांना नाशिक जेलमध्ये रवाना करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पीआय दिलीप पवार यांनी दिली.प्रशांत ऊर्फ पांड्या साईनाथ लेकूरवाळे (रा. निमगाव खैरी, श्रीरामपूर), गणेश ऊर्फ सोमनाथ बापूसाहेब हाळनोर (रा. फत्याबाद, श्रीरामपूर), कमलेश दिलीप डेरे (रा. धांदरफळ, संमगमनेर), संतोष राघू शिंदे (रा. राजापूर, श्रीगोंदा) आणि राजू ऊर्फ राजेंद्र भाऊ गागरे (मांडवे खुर्द, पारनेर) अशी स्थानबध्द केलेल्या पाच सराईतांची नावे आहेत. पारनेर, संगमनेर, श्रीरामपूर, लोणी, बेलवंडी या स्थानिक पोलिस पोलीस अधिकार्‍यांनी एमपीडीएचा प्रस्ताव तयार करून एसपींकडे पाठविला. एलसीबीचे पीआय दिलीप पवार यांनी त्याची पडताळणी करत तो कलेक्टरांकडे पाठविला.कलेक्टर राहुल द्विवेदी यांनी या पाचही जणांना एक वर्षासाठी नाशिक जेलमध्ये स्थानबध्द ठेवण्याचा अंतिम आदेश पारीत केला. त्यानंतर एलसीबीच्या टिमने या पाचही सराईत गुन्हेगारांची रवानगी नाशिक जेलमध्ये काल (दि.24) केली. सराईतांची कुंडली प्रशांत लेकुरवाळे विरोधात दरोडा, अपहरण, गणेश हाळनोर विरोधात सरकारी कामात अडथळा, हत्यार प्रतिबंध कायदा, कमलेश डेरे विरोधात चोरी, हाणामारी, संतोष शिंदे विरोधात चोरी, खुनी हल्ला आणि राजू गागरे विरोधात सरकारी कामात अडथळा आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आगामी काळात वाळू तस्कर, हातभट्टी दारू माफियांविरोधात एमपीडीएचे प्रस्ताव तयार करून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पीआय दिलीप पवार यांनी दिली.

चिखली- 24 डिसेंबर
केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 ( CAA ) च्या समर्थनार्थ राष्ट्रप्रेमी नागरिक समिती तर्फे आज मंगळवार दि. 24 डिसेंबर रोजी एकता मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. विविध राजकीय पक्ष, सामाजिक व सांस्कृतिक संस्था, संघटना तसेच नागरिक या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसीलदारांना निवेदन सादर करून चिखलीकरांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थन केले.
         भारताच्या शेजारच्या पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशातील हिंदू, शीख, बौद्ध, जैन आणि ख्रिश्चन या धर्माचे अनुयायी तेथे अल्पसंख्याक म्हणून गणले जातात. अश्यांना धार्मिक छळाला सामोरे जावे लागत असल्यास त्यांना भारताचे नागरीकत्व देण्याची तरतूद असलेला नागरिकत्व सुधारणा कायदा - 2019 ( CAA ) संसदेत पारित केला. या कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली असून देशभरात हा कायदा लागू झाला आहे. परंतु, काही राजकीय पक्ष व संघटना आपल्या स्वार्थासाठी जाणीवपूर्वक विशिष्ट धर्मियांमध्ये गैरसमज पसरवून देशात हिंसाचार माजवत आहेत. अश्या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी आणि या कायद्याचे समर्थन करण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिक समिती,चिखली तर्फे 24 डिसेंबर रोजी एकता मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून दुपारी 12 वाजता मोर्चाला सुरुवात झाली. जयस्तंभ चौक, सीमेंट रोड, चिंच परिसर आणि नगर पालिका कार्यालयासमोरुन मार्गक्रमण करीत हा मोर्चा तहसील कार्यालयासमोर पोहचेला. त्यानंतर राष्ट्रप्रेमी नागरिक समिती तर्फे तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.शांततामय पध्दतीने निघालेल्या या मोर्चातील सहभागींनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ विविध घोषवाक्यांचे फलक हातात धरले होते. "भारत माता की जय" तसेच "वन्दे मातरम्" अश्या घोषणा मोर्चेकऱ्यांनी दिल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक अरविंद असोलकर, नगर संघचालक शरद भाला, चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय कोठारी, सुरेशअप्पा खबुतरे, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पोफळे, शहराध्यक्ष सुरेंद्र प्रसाद पांडे, अॅड. मंगेश व्यवहारे, रामकृष्णदादा शेटे, प्रेमराज भाला, राजेंद्र व्यास, अॅड. जयश्री कुटे, प्रा. निळूभाऊ चौधरी, रमेश बाहेती, सचिव गोविंद गिनोडे, माजी नगराध्यक्ष सुहास शेटे, शिवराज पाटील, अमोल साठे, अजय बिडवे, हनुमंत भवर, नंदकिशोर काछवाल, अशोक अग्रवाल, सतीश शिंदे, कुणाल बोंद्रे, नगरसेवक गोविंद देव्हडे  यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. सामुदायिक राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप झाला.

बुलडाणा- 23 डिसेंबर
जिल्ह्यातील खामगाव मतदार संघात मोठ्या प्रमाणात वरली मटका, अवैध मोबाईल बँक, जुगार अड्डे, रेतीची तस्करी, गुटखा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या सर्व अवैध धंद्यांना काही पोलीस अधिकारी व काही नेते राजकीय आश्रय देत आहे. अश्याच अवैध धंद्यांमुळे 21 डिसेंबरच्या मध्यरात्री भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी विशाल देशमुख व सचिन पवार यांची निर्घुण हत्या होऊन हे दुहेरी हत्याकांड घडले. त्यामुळे खामगांव मतदारसंघातील सर्व अवैध धंदे त्वरीत बंद करावे अन्यथा मुंबई येथे मुख्यमंत्री व पोलीस महासंचालकांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करू, असा खणखणीत ईशारा माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांना आज 23 डिसेंबर रोजी  निवेदनाद्वारे दिला आहे.
     
 माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, घाटपुरी नाका परिसरात विशाल देशमुख व सचिन पवार यांची निर्घुण हत्या झाली. दोघेही भाजपा युवामोर्चा चे पदाधिकारी होते. त्यांना राजकीय पाठभळ मिळत असल्याने दोघांचे अवैध धंदे व दादागिरी वाढली होती. याशिवाय दोघांची हत्या करणारे आरोपी देखील भाजपा पक्षाशी संबंधित आहेत. रविंद्र भोंगळ याच्या सोशल नेटवर्कींगवर तसेच जाहिरातीचे फलक व फेसबुक पेजवर तो भाजपाचा कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट होते.
     विशेष म्हणजे विशाल देशमुख विरूद्ध पोलीसात अवैध व्यवसायासंबंधी अनेक गुन्हे दाखल होते. तसेच पत्नीच्या मृत्यू प्रकरणी देखील त्याच्यावर ठपका होता. सदरचे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. याशिवाय विशाल देशमुख विरूद्ध पालिसांनी तळीपाराचा प्रस्ताव सुद्धा तयार केला होता. परंतु पोलीसांकडून वेळीच कारवाई न झाल्याने अखेर त्याच्या दादागिरीचे फलीत म्हणून निर्घुण हत्या झाल्याचे बोलल्या जात आहे.तरी मतदारसंघात शांती सलोखा व सामाजिक स्वास्थ आबाधित ठेवण्यासाठी तसेच अश्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणनू खामगाव मतदार संघातील अवैध धंदे त्वरीत बंद करण्यात यावे अशी मागणी ही माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी निवेदनातून केली आहे.

अहमदनगर - शहरात धुमाकूळ घालणारी सराईत सोनसाखळी व जबरी चोरीतील चार चोरट्यांना जेरबंद करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. राजू रामय्या दास (रा.बुडाई, स्वरा बजगा जि.बालेसुर राज्य उडिसा हल्ली रा. बोरुडे मळा, भुतकरवाडी, अहमदनगर), राम मधुकर खंडागळे ( रा.वार्ड न.१ गोधवणीरोड, आण्णाभाऊ साठे घरकुल, श्रीरामपूर, जि.अहमदनगर), नयन राजेंद्र तांदळे (रा.डावखररोड, श्री फर्निचर शेजारी, श्रीरामपूर जि.अहमदनगर) पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. भूषण बबन ससे (रा.भुतकरवाडी ता.जि.अहमदनगर) हा फरार आहे. आरोपींकडून २ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यांच्यावर तोफखाना, भिंगार व कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस ठाण्यात पो.नि. विकास वाघ यांनी दिलेल्या सूचनेनुसार पो उप नि.सतीश शिरसाठ, पोना शाहीद शेख, नितीन शिंदे, नितीन गाडगे, मुकुंद दुधाळ, संदीप थोरात, भारत इंगळे, राहुल शेळके, सुजय हिवाळे आदीच्या पथकाने ही कारवाई केली.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- महाराष्ट्र  लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या सिव्हील जज्ज व ज्यूडीशिअल मँजिस्टेट फस्ट क्लास पदाकरीता घेण्यात आलेल्या परिक्षेत बेलापूर येथील शैलेश राजेंद्र सातभाई याने राज्यातून ५८ क्रमांक मिळवीला आहे                           बेलापूर येथील प्रगतशील शेतकरी व बेलापूर सेवा संस्थेचे माजी चेअरमन राजेंद्र कचरु सातभाई यांचे ते चिरंजीव  आहे त्याचे १० पर्यंतचे शिक्षण केशव गोविंद विद्यालय बेलापूर खूर्द येथे तर बारावी पर्यंतचे शिक्षण जे टी एस हायस्कूल बेलापूर  येथे झाले त्यांचे बी काँमचे शिक्षण एस पी काँलेज पुणे येथे झाले एल एल बीचे शिक्षण आय एल एस काँलेज पुणे येथे झाले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लाँ विभागातुन त्यांनी एल एल एम ही पदवी संपादन केली शिवाजीनगर पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयात त्यांनी प्रँक्टीस केली बेलापूर  व परिसरात न्यायाधीश म्हणून नियुक्ती होणारे शैलेश सातभाई हे पहीले व्यक्ती  आहे त्याच्या यशाबद्ल बेलापूरातील अनेकांनी त्याचे अभिनंदन  केले आहे

बुलडाणा- 21 डिसेंबर
नवीन नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी बुकडाणा येथे  भारतीय मुस्लिम परिषद यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला तर त्याला जमीअत उलमा ए हिंद,जमात ए इस्लामी,महामानव ग्रुप संघटना, आजाद हिंद संघटना व इतर अनेक संघटनांचा पाठिंबा होता. जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवार धडकलेल्या या आक्रश मोर्च्यात हजारोच्या संख्येने सर्व जाती धर्माचे नागरिक सहभागी झाले होते.
   
 केंद्र शासनाने CAA हा नवीन कायदा अमलात आणला असून हा कायदा फक्त मुस्लिम समाजाला टारगेट करण्यासाठी बनवन्यात आला आहे.यात बदल करण्यासाठी देशभरातील बुद्धिजीवी लोक,कायदे तज्ञ,विद्यार्थी व अनेक इतर समाजातील लोक समोर येवून या नवीन कायद्याला असंवैद्यानिक म्हणत विरोध करीत आहे.बुलडाणा जिल्ह्यात ही अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले.आज 21 डिसेंबर रोजी भारतीय मुस्लिम परिषदच्या नेतृत्वात बुलढाणा शहरात भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.दुपारी या मोर्चाला बुलढाणाच्या इदगाह मैदानावरुन सुरुवात झाली, मोर्चा संगम चौक,जयस्तंभ चौक,बाजार लाइन, जनता चौक, कारंजा चौक ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. मोरच्यामध्ये तरुणाची संख्या लक्षणीय होती,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा फोटो व विविध मागण्याचे फलके यावेळी
मोर्चेकर्यांच्या हातात दिसून आले, यावेळी एका शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी यांना भेटून आपली मागणीचे निवेदन दिले.या निवेदनात नमूद करण्यात आले की केंद्र सरकारचा CAA व NRC कायदा असंवैधानिक असून ते रद्द करण्यात यावे.या वेळी शहरात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता तर एसपी डॉ.दिलीप पाटील भुजबळ हे स्वता हजर होते.निवेदन देते वेळी शिष्ठमंडळ मध्ये जमात इस्लामी चे जिलाध्यक्ष डॉ. यासीन,जमीअत उलेमाचे जिलाध्यक्ष हाफिज़ शेख खलील उल्लाह,अब्दुल हफीज़ खान,हाफिज़ रहमत खान,विजयराज शिंदे,मो.सज्जाद,एड.जयश्रीताई शेळके,एड.शरदचंद्र रोठे,प्रा.सुनील सपकाळ आदि हजर होते.आक्रोश मोर्च्याला यशस्वी करण्यासाठी हाजी सय्यद बिलाल डोंगरे,हाजी वकार अहमद खान, रईसोद्दीन काझी, जाकीर कुरेशी, सरपंच गजनफर उल्लाह खान, शेख अकबर, एड. राज शेख, शफीक खान, मो. दानिश, शकीब खान, मो अबुजर, तारीक नदीम, मुजाहीद शेख, नवेद मिर्झा, जावेद शेख, जुबेर खान, सादीक उर्फ राजु, मो.अफसर मो.सरवर आदीने अथक प्रयत्न केले.

अहमदनगर ः नागापूर एमआयडीसी येथील एमआरएफ टायरचे गोडावून फोडून टायरची चोरी करणार्‍या तीन आरोपींना दोन ट्रकसह कळंब (जि.उस्मानाबाद) येथे पकडण्यात आले आहे. विभीषण राजाराम काळे, बालाजी छगन काळे व सुनिल नाना काळे ( तिघे रा. आंदोरा, ता.कळंब, जि.उस्मानाबाद) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे असून अन्य 10 जण फरार आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  नागापूर येथील टायरच्या गोडावूनमधून 17 लाख 98 हजार 286 रुपयांची एमआरएफ कंपनीचे ट्रक व मोटारसायकलचे टायर चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी विभीषण काळे, बालाजी काळे व सुनिल काळे या तिघांना मिळालेल्या माहितीनुसार कळंब (जि.उस्मानाबाद) येथे पकडण्यात आले. तिघा आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, ही चोरी तात्या रमेश काळे, पिल्या रविंद्र काळे, सुभाष भास्कर काळे, रमेश लघमन काळे, सुनिल कालिदास शिंदे, दादा उर्फ राजेंद्र छगन काळे, बंड्या उर्फ शहाजी बाबूराव काळे, शाम विभीषण काळे, बाबूशा भिमराज काळे, बबन बापू शिंदे, सुधाकर श्रावण भगत, भागवत उर्फ भाग्या बाप्पा काळे आदींनी मिळून केली असल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली 8 लाख रुपयांची ट्रक (एमएच 24, एफ 7130) व बंद बॉडी असलेला आयशर कंपनीचा टेम्पो (एमएच 46, एफ 7616) जप्त करून आरोपींना पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
 स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार यांच्या सुचनेनुसार पोसई गणेश इंगळे, सफौ सोन्याबापू नानेकर, पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्ता हिंगडे, पोना आण्णा पवार, रविंद्र कर्डिले, भागीनाथ पंचमूख, विशाल दळवी, विश्वास बेरड, राहुल सोळुंके, रवि सोनटक्के, दीपक शिंदे, मेघराज कोल्हे, चालक बाळासाहेब भोपळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 

बुलडाणा- 20 डिसेंबर (कासिम शेख)5 महिन्यात 13 शे किलोमीटरचा पायी प्रवास करत यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयरण्यातून बाहेर निघालेला "C1" नावाचा 3 वर्षीय सबअडल्ट पट्टेदार वाघ चक्क बुलडाणा जिल्ह्यातील "ज्ञानगंगा अभयारण्यात" दाखल झाला होता व 15 दिवस या जंगलात राहून आपल्या सुरक्षित आधिवास किंवा वाघिनच्या शोधात हा वाघ आता अजिंठा पर्वत रांगा ओलांडत पुढे जात असल्याची गोपनीय माहिती "बिंदास न्यूज़" च्या हाती लागली आहे."ज्ञानगंगा अभयारण्य" सोडून गेल्या मुळे अधिकारी निराश झाले तरी काही कामचोर कर्मचारी खुश झालेले आहे.या वाघच्या आगमनाने ज्ञानगंगा अभ्यारण्यातील कर्मचाऱ्यांची जबाबदारी वाढली होती परंतु आता तो निघुन गेल्याने त्यांचा कामाचा भार कमी झाला आहे.
        यवतमाळच्या "टिपेश्वर अभयारण्यात" 3 वर्षा अगोदर एका "T1" नावाची वाघिनने 3 बछडे दिले होते त्यांचे अनुक्रमे C1,C2 आणि C3 अशे नामकरण करण्यात आले होते.लहानपणा पासून C1 वाघ लवकर उघड़पणे समोर येत नव्होता म्हणजेच तो अतिशय लाजाळु होता.आपली आईला सोडून हा वाघ तेलंगाना राज्यातील आदिलाबादच्या जंगलात फिरून महाराष्ट्रात परत आला व नांदेड, हिंगोली,परभणी,वाशिमहुन बुलडाणा जिल्ह्यात दाखल झाला. 5 महिन्यात 13 शे किलोमीटरचा प्रवास केल्यावर असे वाटत होते की हा वाघ आता "ज्ञानगंगा अभ्यारण्यात" थांबणार व इथेच राहणार परंतु जवळपास 15 दिवस या अभयारण्यात खुप फिरल्यानंतर शेवटी हा वाघ अभ्यारण्याच्या बाहेर निघाला व बुलडाणा शहरा जवळून जात राजुर घाट गाठले व मग अजिंठा पर्वत रांगेत आपली वाट काढत पुढे निघालेला आहे.सद्या हा वाघ विदर्भ- मराठवाडा व खान्देशच्या सीमेवर असल्याचे कळाले.अजिंठा पर्वत रांग औरंगाबाद,बुलडाणा जालना व जळगांव खान्देश या जिल्ह्यात पसरलेली आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील "गौताळा औट्रमघाट अभयारण्य" चा काही भाग जळगाव जिल्ह्यात ही विस्तारलेला आहे व C1 वाघ आता याच अभ्यारण्यच्या दिशेने जाऊ शकतो असा कयास लावण्यात येत आहे.मात्र या वाघच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाघ "ज्ञानगंगा अभयारण्य" सोडून गेल्याची माहिती उघड होऊ नये, याची पूर्णपणे दक्षता घेतली जात आहे.

सिल्लोड, प्रतिनिधी : विद्यालयातील विद्यार्थीनींची छेड काढणाऱ्या एका एकोणीस वर्षीय तरुणाला दामिनी व निर्भया पथकातील पोलिसांनी तालुक्यातील पालोद येथील यशवंत विद्यालयाबाहेर शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पकडले. तरुणावर प्रतिबंधक कारवाई करीत भावासमोर समज देऊन सोडून देण्यात आले, अशी माहिती पथकातील पोलिसांनी दिली.

      पालोद येथील यशवंत विद्यालयात लागून असलेल्या छोट्या- छोट्या गावांचे विद्यार्थी- विद्यार्थीनी शिक्षण घेण्यासाठी येतात. यातील विद्यार्थीनींची गावातील एक तरुण नेहमी छेड काढत होता. यामुळे तरुणाच्या नेहमीच्या छेडछाडीला कंटाळून या विद्यार्थीनींनी ही माहिती  दामिनी पथकाला दिली. शुक्रवारी पथकातील सहायक पोलिस उपनिरीक्षक पंडित इंगळे, सहायक फौसदार भगवान भिसे, विठ्ठल डोके, नायसे, महिला पोलिस मंगला ढोले, सिता ढाकणे यांनी सकाळी पालोद येथे जाऊन पाळत ठेवली व छेड काढणाऱ्या तरुणाला पकडले.

     या तरुणावर पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई केली व त्याच्या भावासमोर त्याला समज देऊन भावासमक्ष सोडून दिले. शाळा, महाविद्यालय, धार्मिकस्थळे, बस थांब्यावर तसेच बसमध्ये गर्दीचा फायदा घेत महिला, विद्यार्थीनींची छेड काढतात. याला आळा घालण्यासाठी नुकतीच सहायक पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांनी या पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाची पालोद येथे ही पहिली कारवाई केली. या पथकाची शाळा, महाविद्यालय, धार्मिकस्थळे, बस थांब्यावर करडी नजर राहणार आहे.
      शाळा, महाविद्यालय, धार्मिकस्थळे, बस थांब्यावर तसेच बसमध्ये गर्दीचा फायदा घेत महिला, विद्यार्थीनींची रोडरोमिओ छेड काढतात. परंतु त्यांच्या विरोधात कुणी तक्रार करत नाही. यामुळे रोडरोमिओंच्या अशा प्रकाराला बळ मिळते. याला आळा घालण्यासाठी महिला, विद्यार्थीनींनी भीती न बाळगता पोलिसांना कळवावे असे आवाहन पथकातील अधिकारी, पोलिस कर्मचाऱ्यांनी केले आहे.

सिल्लोड, प्रतिनिधी : धडाकेबाज कारवाई, कल्याण नावाचा मटका घेणाऱ्या तिघांना पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापा मारुन रंगेहाथ पकडले. ही कारवाई तालुक्यातील आमठाणा येथे शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी तिघांन विरोधात सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
        तेजराव वाळुबा बावस्कर (60), युनूस शेख उमर शेख (30), व शेख शरीफ शेख दाऊद (51) तिघे रा. आमठाणा अशी मटका घेताना पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.
    पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आमठाणा येथील चौफुलीवर दोघे तर बाजार पट्टीत एक जण कल्याण मटका घेत असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांना मिळाली. माहिती मिळताच किरण बिडवे यांनी पोलिस कर्मचारी हरिदास आहेर, दिनेश पुसे यांना सोबत घेऊन आमठाणा येथे सापळा लावला असता चौफुलीवर तेजराव बावस्कर, युनूस शेख, तर बाजार पट्टीत शेख शरीफ मटका घेताना मिळून आले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता 5 हजार 370 रुपये मिळून आले, अशी माहिती किरण बिडवे यांनी दिली.
       मटका घेणारे तेजराव बावस्कर, युनूस शेख यांना धंदा कुणाला देता असे पोलिसांनी विचारले असता आम्ही शेख कालू (आमठाणा) यांना देतो. ते राजू शिंदे (घाटनांद्रा) यांना तर राजू शिंदे हे विजय सिंघवी (भराड़ी) यांना देतो असे सांगितले, तर शेख शरीफ यांनी हाजी पटेल (देऊळगाव बाजार) यांना देतो असे सांगितले.
   

बुलडाणा- 20 डिसेंबर
केंद्र सरकारने नागरीकता संशोधन विधेयक पारीत करुन देशभरातील मुस्लीम बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.नागरिकता संशोधन विधेयकाच्या विरोधात भारतभर ठिकठिकाणी निदर्शने होत असून या पार्श्र्वभुमीवर बुलढाणा मध्ये सुद्धा आज 20 डिसेंबर रोजी एमआयएमच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत काही कार्यकर्त्यांनी मुंडन केले तसेच CAA बिलाची प्रत फाडून आपला रोष व्यक्त केला.
      या वेळी प्रशासनाला देण्या आलेल्या निवेदनाव्दारे असे सुचीत करण्यात आले आहे की, दि.9 डिसेंबर 2019 रोजी लोकसभेत आणी 11 डिसेंबर 2018 रोजी राज्य सभेत सिटीजन अमेंडमेंट बिल 2019 (नागरिकता संशोधन बिल) बहुमताने मंजुर करुन इंडियन सिटीझन अ‍ॅक्ट 1955 मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली असुन त्यामध्ये मुस्लीम धर्मीयांना जाणीव पुर्वक वगळुन इतर धर्मीयांना नागरिकत्व देण्याची तरतुद करण्यात आलेली आहे. भारतीय संविधानाचे उल्लंघन करुन सदर विधेयक मंजुर करण्यात आले आहे. सदर विधेयक हे असंवेधानीक असुन मुस्लीम धर्मीयांच्या लोकांवर अन्याय करणारे आहे. त्यामुळे सदर विधेयकावर पुनर्विलोकन व संशोधन होणे नितांत गरजेचे असून सदर कायदा रद्द करण्यात यावी या मागणीसाठी आज एमआईएमचे जिल्हाध्यक्ष शहज़ाद खान यांच्या नेतृत्वात आज धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी काही कार्यकर्त्यांनी आपले मुंडन करुण या कायद्याच्या प्रत फाडून आपला रोष व्यक्त केला.या आंदोलनात दानिश शेख,समीर खान,डॉ. मोबीन खान,शाकिर रज़ा,एड.ज़ुबैर मिर्ज़ा,मो.मौसूफ,मौलाना मजीद खान,हफीज़ खान सह जिल्हा भरातून आलेले पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget