अहमदनगर - शहरात धुमाकूळ घालणारी सराईत सोनसाखळी व जबरी चोरीतील चार चोरट्यांना जेरबंद करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. राजू रामय्या दास (रा.बुडाई, स्वरा बजगा जि.बालेसुर राज्य उडिसा हल्ली रा. बोरुडे मळा, भुतकरवाडी, अहमदनगर), राम मधुकर खंडागळे ( रा.वार्ड न.१ गोधवणीरोड, आण्णाभाऊ साठे घरकुल, श्रीरामपूर, जि.अहमदनगर), नयन राजेंद्र तांदळे (रा.डावखररोड, श्री फर्निचर शेजारी, श्रीरामपूर जि.अहमदनगर) पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. भूषण बबन ससे (रा.भुतकरवाडी ता.जि.अहमदनगर) हा फरार आहे. आरोपींकडून २ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यांच्यावर तोफखाना, भिंगार व कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
Post a Comment