बेलापूर ( प्रतिनिधी )- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या सिव्हील जज्ज व ज्यूडीशिअल मँजिस्टेट फस्ट क्लास पदाकरीता घेण्यात आलेल्या परिक्षेत बेलापूर येथील शैलेश राजेंद्र सातभाई याने राज्यातून ५८ क्रमांक मिळवीला आहे बेलापूर येथील प्रगतशील शेतकरी व बेलापूर सेवा संस्थेचे माजी चेअरमन राजेंद्र कचरु सातभाई यांचे ते चिरंजीव आहे त्याचे १० पर्यंतचे शिक्षण केशव गोविंद विद्यालय बेलापूर खूर्द येथे तर बारावी पर्यंतचे शिक्षण जे टी एस हायस्कूल बेलापूर येथे झाले त्यांचे बी काँमचे शिक्षण एस पी काँलेज पुणे येथे झाले एल एल बीचे शिक्षण आय एल एस काँलेज पुणे येथे झाले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लाँ विभागातुन त्यांनी एल एल एम ही पदवी संपादन केली शिवाजीनगर पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयात त्यांनी प्रँक्टीस केली बेलापूर व परिसरात न्यायाधीश म्हणून नियुक्ती होणारे शैलेश सातभाई हे पहीले व्यक्ती आहे त्याच्या यशाबद्ल बेलापूरातील अनेकांनी त्याचे अभिनंदन केले आहे
Post a Comment