सिल्लोड, प्रतिनिधी : धडाकेबाज कारवाई, कल्याण नावाचा मटका घेणाऱ्या तिघांना पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापा मारुन रंगेहाथ पकडले. ही कारवाई तालुक्यातील आमठाणा येथे शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी तिघांन विरोधात सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तेजराव वाळुबा बावस्कर (60), युनूस शेख उमर शेख (30), व शेख शरीफ शेख दाऊद (51) तिघे रा. आमठाणा अशी मटका घेताना पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आमठाणा येथील चौफुलीवर दोघे तर बाजार पट्टीत एक जण कल्याण मटका घेत असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांना मिळाली. माहिती मिळताच किरण बिडवे यांनी पोलिस कर्मचारी हरिदास आहेर, दिनेश पुसे यांना सोबत घेऊन आमठाणा येथे सापळा लावला असता चौफुलीवर तेजराव बावस्कर, युनूस शेख, तर बाजार पट्टीत शेख शरीफ मटका घेताना मिळून आले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता 5 हजार 370 रुपये मिळून आले, अशी माहिती किरण बिडवे यांनी दिली.
मटका घेणारे तेजराव बावस्कर, युनूस शेख यांना धंदा कुणाला देता असे पोलिसांनी विचारले असता आम्ही शेख कालू (आमठाणा) यांना देतो. ते राजू शिंदे (घाटनांद्रा) यांना तर राजू शिंदे हे विजय सिंघवी (भराड़ी) यांना देतो असे सांगितले, तर शेख शरीफ यांनी हाजी पटेल (देऊळगाव बाजार) यांना देतो असे सांगितले.
Post a Comment