अहमदनगर ः नागापूर एमआयडीसी येथील एमआरएफ टायरचे गोडावून फोडून टायरची चोरी करणार्या तीन आरोपींना दोन ट्रकसह कळंब (जि.उस्मानाबाद) येथे पकडण्यात आले आहे. विभीषण राजाराम काळे, बालाजी छगन काळे व सुनिल नाना काळे ( तिघे रा. आंदोरा, ता.कळंब, जि.उस्मानाबाद) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे असून अन्य 10 जण फरार आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नागापूर येथील टायरच्या गोडावूनमधून 17 लाख 98 हजार 286 रुपयांची एमआरएफ कंपनीचे ट्रक व मोटारसायकलचे टायर चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी विभीषण काळे, बालाजी काळे व सुनिल काळे या तिघांना मिळालेल्या माहितीनुसार कळंब (जि.उस्मानाबाद) येथे पकडण्यात आले. तिघा आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, ही चोरी तात्या रमेश काळे, पिल्या रविंद्र काळे, सुभाष भास्कर काळे, रमेश लघमन काळे, सुनिल कालिदास शिंदे, दादा उर्फ राजेंद्र छगन काळे, बंड्या उर्फ शहाजी बाबूराव काळे, शाम विभीषण काळे, बाबूशा भिमराज काळे, बबन बापू शिंदे, सुधाकर श्रावण भगत, भागवत उर्फ भाग्या बाप्पा काळे आदींनी मिळून केली असल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली 8 लाख रुपयांची ट्रक (एमएच 24, एफ 7130) व बंद बॉडी असलेला आयशर कंपनीचा टेम्पो (एमएच 46, एफ 7616) जप्त करून आरोपींना पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार यांच्या सुचनेनुसार पोसई गणेश इंगळे, सफौ सोन्याबापू नानेकर, पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्ता हिंगडे, पोना आण्णा पवार, रविंद्र कर्डिले, भागीनाथ पंचमूख, विशाल दळवी, विश्वास बेरड, राहुल सोळुंके, रवि सोनटक्के, दीपक शिंदे, मेघराज कोल्हे, चालक बाळासाहेब भोपळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
Post a Comment