बुलडाणा- 20 डिसेंबर (कासिम शेख)5 महिन्यात 13 शे किलोमीटरचा पायी प्रवास करत यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयरण्यातून बाहेर निघालेला "C1" नावाचा 3 वर्षीय सबअडल्ट पट्टेदार वाघ चक्क बुलडाणा जिल्ह्यातील "ज्ञानगंगा अभयारण्यात" दाखल झाला होता व 15 दिवस या जंगलात राहून आपल्या सुरक्षित आधिवास किंवा वाघिनच्या शोधात हा वाघ आता अजिंठा पर्वत रांगा ओलांडत पुढे जात असल्याची गोपनीय माहिती "बिंदास न्यूज़" च्या हाती लागली आहे."ज्ञानगंगा अभयारण्य" सोडून गेल्या मुळे अधिकारी निराश झाले तरी काही कामचोर कर्मचारी खुश झालेले आहे.या वाघच्या आगमनाने ज्ञानगंगा अभ्यारण्यातील कर्मचाऱ्यांची जबाबदारी वाढली होती परंतु आता तो निघुन गेल्याने त्यांचा कामाचा भार कमी झाला आहे.
यवतमाळच्या "टिपेश्वर अभयारण्यात" 3 वर्षा अगोदर एका "T1" नावाची वाघिनने 3 बछडे दिले होते त्यांचे अनुक्रमे C1,C2 आणि C3 अशे नामकरण करण्यात आले होते.लहानपणा पासून C1 वाघ लवकर उघड़पणे समोर येत नव्होता म्हणजेच तो अतिशय लाजाळु होता.आपली आईला सोडून हा वाघ तेलंगाना राज्यातील आदिलाबादच्या जंगलात फिरून महाराष्ट्रात परत आला व नांदेड, हिंगोली,परभणी,वाशिमहुन बुलडाणा जिल्ह्यात दाखल झाला. 5 महिन्यात 13 शे किलोमीटरचा प्रवास केल्यावर असे वाटत होते की हा वाघ आता "ज्ञानगंगा अभ्यारण्यात" थांबणार व इथेच राहणार परंतु जवळपास 15 दिवस या अभयारण्यात खुप फिरल्यानंतर शेवटी हा वाघ अभ्यारण्याच्या बाहेर निघाला व बुलडाणा शहरा जवळून जात राजुर घाट गाठले व मग अजिंठा पर्वत रांगेत आपली वाट काढत पुढे निघालेला आहे.सद्या हा वाघ विदर्भ- मराठवाडा व खान्देशच्या सीमेवर असल्याचे कळाले.अजिंठा पर्वत रांग औरंगाबाद,बुलडाणा जालना व जळगांव खान्देश या जिल्ह्यात पसरलेली आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील "गौताळा औट्रमघाट अभयारण्य" चा काही भाग जळगाव जिल्ह्यात ही विस्तारलेला आहे व C1 वाघ आता याच अभ्यारण्यच्या दिशेने जाऊ शकतो असा कयास लावण्यात येत आहे.मात्र या वाघच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाघ "ज्ञानगंगा अभयारण्य" सोडून गेल्याची माहिती उघड होऊ नये, याची पूर्णपणे दक्षता घेतली जात आहे.
Post a Comment