श्रीरामपूर (प्रतिनिधी) शासनाने सुरू केलेल्या अन्न सुरक्षा योजनेत गोरगरिबांना प्रतिमाणसी दरमहा पाच किलो धान्य देणे म्हणजेच गरिबांची क्रूर चेष्टा असून गरिबांना जगण्या इतपत धान्य शासनाने द्यावे याकरिता येत्या अधिवेशनात आवाज उठविणार असल्याची माहिती आमदार लहु कानडे यांनी दिली आहे श्रीरामपूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने श्रीरामपूर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार लहू कानडे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष तालुका अध्यक्ष बजरंग दरंदले हे
होते यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई जिल्हा सचिव रज्जाक पठाण जिल्हा प्रसिद्धीप्रमुख चंद्रकांत झुरंगे शहराध्यक्ष माणिक जाधव गोदामपाल शिवाजी वायदंडे पुरवठा निरीक्षक कावेरी आदिक अव्वल कारकून चारुशीला मगरे आमदार कानडे यांचे सहाय्यक समिम बागवान उपस्थित होते केंद्र शासनाने एक व्यक्ती दोन व्यक्ती अशा निराधार अपंग विधवा व्यक्तींना अंत्योदय योजनेचा लाभ दिल्यामुळे त्यांना 35 किलो धान्य दिले जात होते मागील शासन कर्त्याने त्या निराधारांचा घास हिरावून त्यांना प्राधान्य योजनेचा लाभ देण्याचा जुलमी निर्णय घेतला या बाबतही अधिवेशनात आवाज उठविणार आहे स्वस्त धान्य दुकानदार हा समाजातील गोरगरीब जनतेची सेवा करण्याचा करण्याचे महत्त्वाचे काम करत आहे हे पुण्याचे काम करत असताना त्यांचा प्रपंच व्यवस्थित चालेल असे कमिशन मार्जिन त्यांना मिळाले पाहिजे या करिता आपण प्रयत्न करू मात्र त्यांच्याकडूनही जनतेला चांगली सेवा मिळाली पाहिजे असे ते म्हणाले यावेळी बोलताना स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई म्हणाले की आपल्या तालुक्याला आमदार लहू कानडे च्या रूपाने अभ्यासू आमदार लाभलेला आहे शासनाने धान्य दुकानदारांना पाँज मशीन दिल्यामुळे दुकानदारा बरोबरच पुरवठा विभागही पाँश झाला आहे धान्य वाटपात अतिशय पारदर्शकता आली असून तालुक्याचे वाटप 93 टक्के असून अहमदनगर जिल्हा ही धान्य वाटपात आघाडीवर आहे दुकानदाराकडे प्रत्येक कार्डधारकांची चे फोन नंबर असून धान्य घेण्यासाठी त्यांना वेळोवेळी फोन केले जातात दुकानदारही काळानुरूप बदलला आहे परंतु त्यांचा उदरनिर्वाह चालावा इतके कमिशन मार्जिन त्यांना दिले पाहिजे असेही देसाई म्हणाले यावेळी पुरवठा यंत्रणेत आमूलाग्र बदल झाले असून शासनाने एक व्यक्ती व दोन व्यक्ती यांचे अंत्योदय योजनेतील नाव काढून ते प्राधान्य कुटुंब योजना टाकल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झालेला असून शासनाने केरोसीन बंद केल्यामुळे दोन पिढ्या पासून केरोसीन व्यवसाय करणार्या दुकानदारावर अन्याय झाला असून केरोसीन बंद झाल्यामुळे त्यांचे प्रपंच उघडले आहेत याचा देखील या निमित्ताने विचार व्हावा अशी मागणी संघटनेचे जिल्हा सचिव रज्जाक पठाण जिल्हा प्रसिद्धीप्रमुख चंद्रकांत झुरंगे तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले माणिकराव जाधव आदींनी केली यावेळी गोदामपाल शिवाजी वायदंडे पुरवठा निरीक्षक श्रीमती कावेरी अधिक पुरवठा अव्वल कारकून श्रीमती चारुशीला मगरे यांनी पुरवठा यंत्रणेतील कामकाजाची माहिती दिली यावेळी आमदार कांनडे यांनी मला मोघम माहिती नको मी अधिकारी म्हणून काम केले असून त्याच पद्धतीने माहिती द्यावी अशी सूचना केली यावेळी सुभाष चोरडिया सुभाष साळुंखे गोपीनाथ शिंदे दिलीप गायके चंद्रकांत गायकवाड प्रकाश गदिया अनिल मानधना मुरलीधर वधवानी शिवाजी सैद देवराम गाडे योगेश नागले भाऊसाहेब वाघमारे बनीचंद खरात जाकीर शेख राठोड मच्छिंद्र भालके राजेंद्र वधवानी अतुल जिरंगे रवींद्र काळे विजय मैराळ सोमनाथ देवकर मंगेश छतवानी प्रेमचंद छतवानी रमेश हरदास राजेंद्र शिंदे राजेंद्र वाघ सतीश बोर्डे दशरथ पिसे पुंडलिक खरे सुरेश पवार श्याम पवार आदी उपस्थित होते [ मला स्वतःचे डोके आहे त्यात मेंदूही माझाच आहे त्यामुळे निर्णय घेण्यास व विकास कामे करण्यास मी सक्षम आहे शिवाय मी शासनात उपायुक्त पदावर काम केल्यामुळे कायद्याची अंन कागदाची मला चांगली माहिती आहे त्यामुळे तालुक्यात आपल्या सर्वांच्या सहकार्याने चांगले काम केले जाईल जेणेकरून प्रत्येक नागरिकाला मी आमदार झाल्यासारखे वाटेल असेही आमदार कानडे म्हणाले.
Post a Comment