अहमदनगर (प्रतिनिधी) जिल्ह्यातील पाच सराईत गुन्हेगारांवर नगर पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. या पाचही अट्टल गुन्हेगारांना नाशिक जेलमध्ये रवाना करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पीआय दिलीप पवार यांनी दिली.प्रशांत ऊर्फ पांड्या साईनाथ लेकूरवाळे (रा. निमगाव खैरी, श्रीरामपूर), गणेश ऊर्फ सोमनाथ बापूसाहेब हाळनोर (रा. फत्याबाद, श्रीरामपूर), कमलेश दिलीप डेरे (रा. धांदरफळ, संमगमनेर), संतोष राघू शिंदे (रा. राजापूर, श्रीगोंदा) आणि राजू ऊर्फ राजेंद्र भाऊ गागरे (मांडवे खुर्द, पारनेर) अशी स्थानबध्द केलेल्या पाच सराईतांची नावे आहेत. पारनेर, संगमनेर, श्रीरामपूर, लोणी, बेलवंडी या स्थानिक पोलिस पोलीस अधिकार्यांनी एमपीडीएचा प्रस्ताव तयार करून एसपींकडे पाठविला. एलसीबीचे पीआय दिलीप पवार यांनी त्याची पडताळणी करत तो कलेक्टरांकडे पाठविला.कलेक्टर राहुल द्विवेदी यांनी या पाचही जणांना एक वर्षासाठी नाशिक जेलमध्ये स्थानबध्द ठेवण्याचा अंतिम आदेश पारीत केला. त्यानंतर एलसीबीच्या टिमने या पाचही सराईत गुन्हेगारांची रवानगी नाशिक जेलमध्ये काल (दि.24) केली. सराईतांची कुंडली प्रशांत लेकुरवाळे विरोधात दरोडा, अपहरण, गणेश हाळनोर विरोधात सरकारी कामात अडथळा, हत्यार प्रतिबंध कायदा, कमलेश डेरे विरोधात चोरी, हाणामारी, संतोष शिंदे विरोधात चोरी, खुनी हल्ला आणि राजू गागरे विरोधात सरकारी कामात अडथळा आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आगामी काळात वाळू तस्कर, हातभट्टी दारू माफियांविरोधात एमपीडीएचे प्रस्ताव तयार करून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पीआय दिलीप पवार यांनी दिली.
Post a Comment