July 2025

बेलापूर: श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या बेलापूर पोलीस दूरक्षेत्रात कर्तव्यास असलेले पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे यांनी पोलीस सेवेत १५ वर्षांचा टप्पा पार केला, त्यानिमित्त बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला.


पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे यांनी पोलीस सेवेत अकरा वर्षे मुंबईमध्ये सेवा केली. या कार्यकाळात त्यांनी अनेक गुन्ह्यांचा पर्दाफास केरुन गुन्हेगारांना जेरबंद केले. त्यानंतर त्यांची बदली श्रीरामपूर येथे झाली, येथेही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. वरिष्ठांच्या हस्ते अनेकदा त्यांचा सन्मान झाला आहे. श्री.बडे यांना उत्तर महाराष्ट्रातील "बेस्ट कॉप ऑफ द मंथ" अर्थात 'महिन्यातील सर्वोत्तम पोलीस अधिकारी' हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या या खडतर आणि यशस्वी सेवेबद्दल बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.


या प्रसंगी कॉन्स्टेबल बडे यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सत्कार स्वीकारताना, बडे यांनी आपल्या पूर्वीच्या नियुक्तीच्या ठिकाणांचे अनेक धाडसी आणि प्रेरणादायी अनुभव सांगितले. त्यांच्या या अनुभवांबद्दल उपस्थित ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले.


या छोट्याशा सत्कार सोहळ्याला पत्रकार देवदास देसाई, सुहास शेलार, दिलीप दायमा, पोलीस कॉन्स्टेबल भारत तमनर, सामाजिक  कार्यकर्ते दादासाहेब कुताळ, तिळवण तेली महासंघाचे एकनाथ उर्फ लहानुभाऊ नागले यांसह मान्यवर उपस्थित होते.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे) – सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगाव येथील विद्यार्थ्यांनी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवत शाळेचा नावलौकिक उंचावला आहे. इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीच्या जोरावर हे यश संपादन केले असून, शाळेच्या इतिहासात प्रेरणादायी अशी कामगिरी नोंदवली आहे. यामुळे संपूर्ण शाळेत आनंदाचे व अभिमानाचे वातावरण आहे.या परीक्षेमध्ये इयत्ता पाचवीतील आदर्श आढळ, अवधूत अंभोरे, आयुष निर्मल, शर्वरी बोरसे, श्रीरंग मालपुरे आणि श्रेया वर्गुडे तर इयत्ता आठवीतील सृष्टी वावधणे आणि नचिकेत काठमोरे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. ही कामगिरी म्हणजे विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत, पालकांचा पाठिंबा आणि शिक्षकांचे प्रामाणिक मार्गदर्शन यांचे उत्कृष्ट उदाहरण ठरली आहे.या यशामध्ये शिक्षिका शिल्पा खांडेकर, सोनल निकम, माधुरी भस्मे,सुनंदा कदम, स्वरूपा वडांगळे, सीमा शिंदे, गणेश मलिक आणि अर्चना बाजारे यांनी विद्यार्थ्यांसोबत विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या अथक प्रयत्नांचे हे फळ आहे. शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे, उपप्राचार्य शुभांगी अमृतकर, पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे व नथलीन फर्नांडिस यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेसारख्या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश केवळ शाळेसाठीच नव्हे तर संपूर्ण परिसरासाठी अभिमानास्पद असून भावी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

बेलापूरः(प्रतिनिधी )- जलसंपदा तथा पालकमंञी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली बेलापूर बु ग्रामपंचायतीने  सातत्याने विविध उपक्रम राबविले असुन या उपक्रमामुळे गावातील विकासाला चालना मिळाली असल्याचे प्रतिपादन मा. जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी केले.                                बेलापूर बुll ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या महिला मेळाव्यास संबोधित करताना नवले बोलत होते.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.मिनाताई साळवी या होत्या.तर मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून बाजार समितीचे मा. उपसभापती अभिषेक खंडागळे,उपसरपंच चंद्रकांत नवले,ग्रामपंचायत सदस्य मुश्ताक शेख,तबसुम बागवान,प्रियंका कु-हे,उज्वला कुताळ,सुशिलाबाई पवार,रंजना बोरुडे,प्रतिभा नवले, मानवी खंडागळे,पंचायत समितीच्या प्रकल्प अधिकारी  शोभा शिंदे,बँक आॕफ महाराष्ट्र चे शाखा व्यवस्थापक राजेश परदेशी, डॉ. अश्विनी लिपटे, शशिकांत दुशिंग आदि उपस्थित होते.                         आपल्या भाषणात नवले पुढे म्हणाले की गावात महिलांची संख्या पन्नास टक्के असुन या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी नाम.राधाकृष्ण विखे पा, माजी खा.डाॕ.सुजय विखे पा.,जि.परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.शालिनीताई विखे पा.यांचे सहकार्याने व मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले  आहेत. गावकरी मंडळाच्या ताब्यात सत्ता आल्यापासून गावात विविध विकास कामे वेगाने होत असून बेलापूर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच स्वाती अमोलिक,मिनाताई  साळवी,माजी उपसरपंच तबसुम बागवान,प्रियंका कु-हे,सदस्य उज्वला कुताळ,सुशिलाबाई पवार,शिलाताई पोळ,छायाताई निंबाळकर आदिंचा यात  मोठा सहभाग आहे.गावकरी मंडळाने  समाजांतील सर्व घटकांना समान न्याय देण्याचे धोरण अवलंबिले असुन लवकरच १००० घरकुलांचे बांधकाम सुरू होणार आहे.महिलांकरीता शासनाच्या अनेक  योजनां असुन योजनांची माहिती न झाल्यामुळे अनेक महिला लाभापासून वंचित राहतात.महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर कुटुंबाचेही आरोग्य चांगले राहू शकते.त्यामुळे महीलांनी आरोग्याबाबात सजग व्हावे यासाठी आरोग्य प्रबोधन व तपासणी स्वच्छता महिलांना मिळणारे लाभ गावाच्या विकासात महीलांचे योगदान या सर्व बाबींची माहिती व्हावी या हेतुने मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे नवले यांनी सांगीतले .                                          प्रास्तविक भाषणात बाजार समितीचे माजी उपसभापती म्हणाले की,आजवर बेलापूर ग्रामपंचातीच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी नामदार.राधाकृष्ण विखे पा.यांचे  भक्कम सहाय्य व पाठबळ मिळाले आहे.नाम.विखे यांच्या सहकार्याने १२६ कोटीची पाणी पुरवठा योजना तसेच या योजनेच्या साठवण तलावासाठी आठ एकर जमिन ग्रामपंचायतीला मोफत मिळाली.या योजनेचे काम प्रगतीपथावर असून येत्या सहा महिन्यात योजना पूर्ण होणार असुन तिनं म्हशीने पुरेल इतका पाणीसाठा त त्यात असणार आहे.गावातील गरजूंसाठी तब्बल ११०० घरकुले मंजूर झाली आहेत.  या घरकुलासह,सेंद्रिय खत प्रकल्प,क्रिडा संकुल तसेच सर्वधर्मियांच्या स्मशानभुमिसाठी ३४ एकर जागा नाम.विखे पा. यांच्या प्रयत्नातून मिळाली आहे.ग्रामपंचायतीने भुयारी गटारीचे काम मोठ्या प्रमाणावर केले आहे.तसेच ओला व सुका कचरा स्वतंञपणे संकलित करण्याचे कामही सुरु केले आहे.भविष्यात कच-यावर प्रक्रिया करुन खतप्रकल्प उभारणी केली जाणार आहे.सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे कामही प्रगतीपथावर आहे.पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनसाठी रस्ते खोदाई झाल्याने रस्त्यांची कामे करता आली नाहीत.माञ पावसाळ्यानंतर लगेचच रस्त्यांची कामे केली जातील. त्यासाठी निधी उपलब्धतेसाठी नाम.विखे पा.यांचे माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. लवकरच पाणीपुरवठा योजना कामाचा पाहणी दौरा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती खंडागळे यांनी दिली.                                                यावेळी सरपंच मिनाताई साळवी यांनी उपस्थितांचे स्वागत करुन मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला तर सौ.आशाताई गायकवाड ,ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प.समितीच्या प्रकल्प आधिकारी शोभा शिंदे यांनी बचतगटा संदर्भातील योजना,त्या माध्यमातून करता येणारे व्यवसाय याची माहिती दिली. महाराष्ट्र बँकेचे बेलापूर शाखेचे व्यवस्थापक  राजेश परदेशी यांनी महिलांसाठी बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देवून त्याबाबात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रारंभ प्रकल्पचे शशिकांत दुशिंग यांनी घनकचरा व ओलाकचरा संकलन व प्रक्रियाबाबत सविस्तर माहिती दिली.प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या आरोग्य अधिकारी डाॕ.अश्विनी लिप्टे यांनी महिलांच्या आरोग्याबाबत प्रबोधन केले.पञकार देविदास देसाई यांनी अंधश्रध्देबाबत प्रबोधन केले.मेळाव्याचे दरम्यान महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.अध्यक्षीय सूचना सौ. मनिषा दळे यांनी मांडली त्यास सौ. संध्या तेलोरे यांनी अनुमोदन दिले.कार्यक्रमाचे सूञसंचलन सौ.योगिताताई अमोलिक यांनी केले तर सौ. वैशालीताई शेळके यांनी आभार मानले.मेळाव्यास उपसरपंच चंद्रकांत नवले सदस्य मुस्ताक शेख तबसूम बागवान प्रियंका खुरे उज्वला कुताळ जया भराटे आशा गायकवाड ज्योती जगताप मंगल जावरे सरिता मोकाशी वैशाली शेळके मनीषा दळे संगीता देसाई प्रतिभा देसाई संगीता शिंदे तेलोरे नीलिमा कुमावत सुजाता गुंजाळ वैशाली शिरसाठ सुवर्णा खंडागळे आदिसह मोठ्या संख्येने परिसरातील बचत गटाच्या महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

कोपरगाव (गौरव डेंगळे): श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगाव यांच्या वतीने आयोजित ‘शारदा एक्सप्रेस खो खो संमिश्र लीग २०२५’ ही राज्यस्तरीय स्पर्धा शनिवार, २६ जुलै रोजी मोठ्या उत्साहात आणि पावसाच्या सरींसह संपन्न झाली. कोपरगाव, संगमनेर, येवला, अहिल्यानगर येथून आलेल्या एकूण १३ संघांनी सहभाग घेतलेला असून १८ सामन्यांमध्ये दमदार खेळाचा थरार अनुभवायला मिळाला.

स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे,युवराज नगरकर,संकेत पारखे, पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे, नथलीन फर्नांडिस, कोपरगाव क्रीडा समिती अध्यक्ष धनंजय देवकर,रामदास खरात, अजित पवार,रवी नेद्रे, भरत थोरात आणि दिगंबर गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

चार गटांमध्ये विभागलेली ही स्पर्धा गटसाखळी,उपांत्य आणि अंतिम फेरी अशा तीन टप्प्यांमध्ये झाली. अ गटातून नूतन विद्यालय संगमनेर, ब गटातून आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल संगमनेर, क गटातून दिग्विजय क्रीडा मंडळ अहिल्यानगर आणि ड गटातून आत्मा मालिक कोकणठाण यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्या उपांत्य सामन्यात दिग्विजय क्रीडा मंडळने नूतन विद्यालयाचा पराभव केला, तर दुसऱ्या लढतीत आत्मा मालिक संघाने आदर्श स्कूलवर मात केली.

अंतिम सामन्यात आत्मा मालिक कोकणठाण संघाने जबरदस्त खेळ करत दिग्विजय क्रीडा मंडळ अहिल्यानगरचा पराभव केला आणि शर्यतीचे विजेतेपद पटकावले. यावेळी खेळाडूंनी पावसाचे आव्हान अंगिकारत मैदानावर चिवट झुंज दिली आणि उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून राधिका भोसले आणि जयदत्त गाडेकर यांना गौरविण्यात आले. अंतिम सामन्याचा मानकरी तनिष मानकर ठरला. स्पर्धेत विविध सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित हसे, साईराज पाटील, साहिल नेहे, तेजल रोकडे, साई सरोदे, साई भराडे, अनामिका आहेर, कार्तिक कराळे, रिंकू वळवी, मनीषा वळवी, अर्णव थोरात, अमित वासवे आणि तनवी देवकर यांचा समावेश होता.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामध्ये पंच म्हणून अण्णासाहेब गोपाल, बाळासाहेब शेळके, गणेश वाघ, गणेश मोरे, रितेश माळवदे, ओम जगताप, यश जाधव, साई जाधव, प्रसाद मावळ यांचे मोलाचे योगदान लाभले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना मैदानी खेळात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यांच्यात नेतृत्वगुण, संघभावना, स्पर्धात्मकता आणि आत्मविश्वास यांचे उत्तम संकलन घडल्याचे दृश्य मैदानात दिसून आले.पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. विजेता आत्मा मालिक कोकणठाण संघाला ₹२१०० रोख रक्कम व चषक देण्यात आला, तर उपविजेता दिग्विजय मंडळ अहिल्यानगर संघाला कोपरगाव क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री. धनंजय देवकर यांच्या हस्ते ₹१००० रोख रक्कम व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यासोबतच सर्वोत्तम खेळाडू, अंतिम सामन्याचा मानकरी व इतर उल्लेखनीय खेळाडूंनाही स्मृतिचिन्हे देण्यात आली.

‘शारदा एक्सप्रेस खो खो लीग’ ही स्पर्धा केवळ एक खेळ नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रेरणादायी मंच ठरली आहे.



*कोट*


"कालपर्यंत संपूर्ण जिल्ह्याला पावसाने वेढलं होतं... प्रश्न होता, 'स्पर्धा होणार तरी कशा?' पण मनामध्ये एक आशा होती, की देव जिथं खेळाचं मंदिर असतं, तिथं पावसालाही थांबावं लागतं. आज सकाळी मैदानावर आलो, ओलसर माती, पाण्याच्या साऱ्या, पण मनात एकच विनंती – ‘देवा, चार तास विश्रांती दे… खेळू दे आमचं स्वप्न.’ आणि खरंच... पावसाने थोडं बाजूला सरून मैदान खुलं केलं आणि शारदा खो खो लीगचा थरार साऱ्या सीमारेषा तोडून मैदानावर अवतरला!"


गौरव अरविंद डेंगळे (क्रीडा मार्गदर्शक)

बेलापूर (प्रतिनिधी)-एका दिव्यांगाला प्रवाहात आणण्याची टाकलेली जबाबदारी एका कर्मचाऱ्याला चांगलीच महागात पडली .50 हजार रुपये रोख भूर्दंड भरुन इज्जतीचा पंचनामा करण्याची वेळ त्या कर्मचाऱ्यांवर आली पण दिवसांचा गोंधळ रात्री च मिटला अन् त्याने सुटकेचा निश्वास टाकला.                      त्याचे झाले असे की परिसरातील एका परिवारात एक मुलगा दिव्यांग होता. त्याची माहिती पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी मिळाली. त्यांनी एका कर्मचाऱ्याला आदेश दिला की त्या दिव्यांग मुलाच्या घरी जाऊन त्याला प्रवाहात आणा. वरिष्ठाच्या आदेशानुसार तो कर्मचारी त्या दिव्यांग मुलाच्या घरी गेला त्याने दिव्यांग व्यक्तीला मिळणारे लाभ, शासकीय योजनांची माहिती दिव्यांग व्यक्तीच्या आईला दिली . त्याचबरोबर त्या मुलाचे अहिल्यानगर येथे जाऊन दिव्यांगाचे प्रमाणपत्र काढून आणा ते कसे करायचे याविषयी देखील सविस्तर मार्गदर्शन केले. काही अडचण आल्यास माझ्या फोन नंबर वर संपर्क साधा असे सांगून त्या कर्मचार्‍याने आपला फोन नंबर त्या महिलेला दिला .त्यानंतर दिवसभर त्या महिलेने वेगवेगळ्या कारणाने संबंधित कर्मचाऱ्याला फोन केले. तो कर्मचारी प्रामाणिकपणे दिव्यांगाची माहिती व येणाऱ्या अडचणी विषयी सांगत होता. हे सर्व झाल्यानंतर सायंकाळी ती महिला विचारपूस करत राहुरी येथील कर्मचाऱ्यांच्या घरी गेली व तेथे आरडा ओरडा करून हा मला दिवसभर घेऊन फिरला याने नको ते केले असे सांगून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. झालेला प्रकार पाहून तो कर्मचारीही गडबडून गेला. आजूबाजूचे नागरिक जमा होऊ लागले .तसे ती महिला आणखीनच जोर जोरात ओरडू लागले त्यामुळे त्या कर्मचाऱ्याने आपल्या मित्रांचा सल्ला घेऊन त्या महिलेसह बेलापूर गाठले. बेलापूरला आल्यानंतर ते सरळ पोलीस स्टेशनला गेले तेथे आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा त्या कर्मचाऱ्याला होती.परंतु तिथेही संबंधित महिलेने एकच रट लावून धरली. त्यामुळे कर्मचारी आणखीनच गडबडून गेला त्याने गावातील काही व्यक्तींना बोलावले. परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. ती महिला एका विषयावर ठाम राहिले. रात्री अकरा वाजता सुरू झालेले नाट्य दीड दोन वाजेपर्यंत सुरू होते. अखेर शेवटी त्या महिलेने आपला प्रस्ताव ठेवला. मनात नसतानाही सर्वांच्या आग्रहा खातर त्या कर्मचाऱ्याला पन्नास हजार रुपयांचा भूर्दंड बसला.वास्तविक तो कर्मचारी दिवसभर पंचायत समितीत आपल्या सहकाऱ्यां बरोबर काम करत होता.पण एका महीलेपुढे त्याला हतबल व्हावे लागले. यापूर्वीही अशाच घटना घडलेल्या असून हनी ट्रॅप सारखे प्रकार आता ग्रामीण भागातही सुरू झाले आहेत.या याबाबत काही कर्मचारी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना समक्ष भेटून निवेदन देणार असल्याचे समजले

श्रीरामपूरःपुणतांबा येथील रहिवासी असलेले धीरज व सूरज संपतराव बोर्डे या बंधुची अनुक्रमे  जलसंपदा व नगरपालिका विभागात अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.                                                     महाराष्ट्र शासनाच्या 'जलसंपदा विभाग' तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत  धीरज बोर्डे याची सहाय्यक अभियंता (ज्यु. इंजिनियर ) पदी निवड झाली आहे . तर सूरज बोर्डे यांची सन २००० मध्ये नगरपालिका विभागात लेखाधिकारी म्हणून निवड झाली असून ते बुलढाणा नगरपालिकेत रुजू झाले आहेत. धीरज व सूरज हे दोघे अशोक सहकारी कारखान्याचे माजी कर्मचारी संपतराव बोर्डे यांचे चिरंजीव आहेत.विशेष म्हणजे सुरज व धीरज हे जुळेबंधू असून दोघांचीही शासकीय अधिकारी म्हणून निवड होणे  दुर्मिळ ठरते.धीरज व सुरज बोर्डे यांच्या या नियुक्तीबद्दल भास्कर खंडागळे ,नानासाहेब जोंधळे,अॕड.एन.जी.खंडागळे ,बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

बेलापूर( प्रतिनिधी )-आंबी येथून पुण्याला जाण्याकरता पहाटे निघालेल्या मायलेकाच्या मोटरसायकलला बिबट्याची धडक बसल्यामुळे दोघेही  जखमी झाले असुन त्यांचेवर श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल उपचार सुरू आहेत केवळ दैव बलवत्तर म्हणून दोघेही वाचले.                याबाबत समजलेली हकीगत अशी की आंबी येथील अलका भगवान वायदंडे वय वर्ष 45 व त्यांचा मुलगा विशाल भगवान वायदंडे वय 28 हे पुणे येथे जाण्याकरिता सकाळी साडेपाच वाजता आंबी येथून निघाले श्री हरिहर केशव गोविंद बन या ठिकाणी रस्त्याच्या वळणावर गाडी असतानाच अचानक बिबट्याने गाडीला धडक दिली. या धडकी मुळे बिबट्या देखील एका बाजूला पडला तर विशाल वायदंडे व त्याच्या आई अलका वायदंडे या एका बाजूला पडल्या बिबट्या लगेच शेजारील झुडपात निघून गेला. गाडीवरून पडल्यामुळे विशाल व अलका यांना मार लागल्यामुळे ते साखर कामगार रुग्णालयात दाखल झाले तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत बिबट्याची धडक बसून देखील दोघे सुखरूप आहेत याबद्दल दोघाही मायलेकांनी देवाचे आभार मानले.

कोपरगाव ( गौरव डेंगळे):सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल,कोपरगाव यांच्या वतीने आयोजित शारदा Xpress खो-खो संमिश्र लीग २०२५ स्पर्धेला शनिवार, दिनांक २६ जुलै २०२५ रोजी सुरुवात होणार आहे. कोपरगाव, संगमनेर, येवला आणि अहिल्यानगर येथून आलेल्या १३ संघांचा या स्पर्धेत सहभाग असून एकूण १८ सामने रंगणार आहेत.

शारदा स्पार्टनचे कर्णधार फरहान शेख आणि उपकर्णधार तन्वी देवकर, शारदा Xpress संघाचे जय शिंदे आणि श्रेया वाघ, शारदा महारथीचे सरस ठोळे आणि अनुष्का देवकर, शारदा शूरवीरचे अमित बोरनारे आणि श्रद्धा ठेके, शारदा बाजीराव संघाचे श्रेयस अनाड आणि श्रद्धा कालेकर अशी शारदा परिवारातील पाच संघांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.

शहराबाहेरील सहभागी संघांमध्ये आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल संगमनेरचे तेजस रोकडे आणि किरण पथवे, राधिका इंग्लिश मीडियम स्कूल येवल्याचे ओम भंडारी आणि स्वरा पानमळे, नूतन माध्यमिक विद्यालय राजापूर संगमनेरचे राजवीर पवार आणि कावेरी मोरे, दिग्विजय क्रीडा सामाजिक व सांस्कृतिक मंडळ अहिल्यानगरचे जयदत्त गाडेकर आणि श्रावणी थोरात, आत्मा मालिक कोकणठाणचे निलेश तडवी आणि मनीषा वाळवी, सोमैया विद्यामंदिर लक्ष्मीवाडीचे अभिजीत पवार आणि प्रीती अहिरे, संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल कोपरगावचे सार्थक कुलकर्णी आणि अन्वी परजणे तसेच सोमैया विद्यामंदिर साखरवाडीचे ओम शिंदे आणि अनुष्का भाकरे यांचा सहभाग आहे.स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे, युवा उद्योजक मनोज नगरकर, संकेत पारखे, उपप्राचार्य शुभांगी अमृतकर, पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे व नथलीन फर्नांडिस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.कोपरगाव क्रीडा समिती अध्यक्ष धनंजय देवकर, सचिव अनुप गिरमे, पंच समिती प्रमुख अण्णासाहेब रतन गोपाल,अजित कदम, गणेश वाघ,बाळासाहेब शेळके, अनिल तेलगट,भीमाशंकर औताडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.स्पर्धेच्या तांत्रिक बाबतीत दिग्विजय भोरे,जयदीप दरंगे व जिशान इनामदार कार्यरत राहणार आहेत.या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना मैदानी खेळात सहभागाची संधी मिळणार असून नेतृत्व, संघभावना आणि स्पर्धेची चुणूक यांचे उत्तम दर्शन घडणार आहे.

बेलापूरात काही महिन्यांपूर्वी बेलापूरच्या कोल्हार चौकात एटीएम फोडून धुमाकूळ घालणारे आरोपी पुन्हा बेलापुरात सक्रिय झाल्याचे पाहून स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे. सतर्क पोलिसांनी आपल्या जीवाची पर्वा न करता, जीव मुठीत धरून या संशयितांचा थरारक पाठलाग केला.

​मिळालेल्या माहितीनुसार, सुज्ञ नागरिक यांनी नंदकिशोर लोखंडे यांना बाजारात एक संशयित निळ्या रंगाची मारुती ८०० गाडी उभी असल्याची माहिती दिली. तात्काळ नंदकिशोर लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गाडीचा दरवाजा वाजवला. मात्र, पोलिसांना पाहताच संशयितांनी गाडी भरधाव वेगाने पळवून नेली. पेठेतून झेंडा चौक मार्गे पडेगावच्या दिशेने आरोपी फरार झाले.


​या घटनेची माहिती मिळताच, नंदकिशोर लोखंडे यांनी भारत तमनर यांना फोन करून संशयितांचा पाठलाग करण्यास सांगितले. तात्काळ भारत तमनर आणि पंकज सानप यांनी सरकारी गाडीतून, तर जाधव साहेब आणि कोळपे दादा यांनी त्यांच्या खाजगी गाडीतून संशयितांचा पाठलाग सुरू केला. नंदकिशोर लोखंडे आणि होमगार्ड महेश थोरात हे देखील त्यांच्या गाडीतून पाठलागात सहभागी झाले.

​पोलिसांच्या या थरारक पाठलागादरम्यान, भरधाव वेगाने पळणाऱ्या निळ्या रंगाच्या मारुती ८०० गाडीचा लाडगाव रेल्वे चौकीजवळ ताबा सुटला आणि ती पलटी झाली. या अपघातात गाडीतील तीनही संशयित जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांना तात्काळ साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पलटी झालेली गाडी बेलापूर आऊटपोस्ट येथे आणण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

​पोलिसांनी दाखवलेल्या या धाडसामुळे बेलापूरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला असून, त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बेलापूर (प्रतिनिधी)-संत सावता महाराज म्हणजे प्रेमाचे प्रतीक असून त्यांचे प्रेरणादायी चरित्र तरुण पिढीने अभ्यासणे आवश्यक आहे असे संमत हरिभक्त परायण अनिल महाराज महांकाळे यांनी व्यक्त केले .              संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त बेलापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी काल्याच्या कीर्तनात ह.भ . प. अनिल महाराज महांकाळे बोलत होते   श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात ह भ प अनिल महाराज महांकाळे म्हणाले  की प्रत्येकाने आपले कर्म करताना आपल्या कर्माशी प्रामाणिक असले पाहिजे. आज समाजात वाढत असलेली अराजकता ही चिंतेची बाब आहे समाजाला योग्य दिशा देण्याकरता संत सावता महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करण्याची गरज आहे. संकटाला घाबरून आत्महत्या करू नका नैराश आले तरी चुकीचा मार्ग निवडू नका आपल्या कामाला भक्तिमार्गाची जोड द्या जिवन अधिक सुखकर होईल असेही ते म्हणाले . प्रारंभी गावातून संत सावता महाराज यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी अनेकांनी आपल्या घरापुढे सडा रांगोळी काढली होती मिरवणूक झेंडा चौकात आल्यानंतर अनेक मान्यवरांनी श्री संत सावता महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त विविध स्पर्धांचे ही आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ही महाराजांच्या हस्ते संपन्न झाला त्यानंतर महाप्रसाद वाटप होऊन कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रम यशस्वीते साठी हे भ प मयुर महाराज बाजारे, ह भ प कृष्णा महाराज शिरसाठ, संजय महाराज शिरसाठ,जालिंदर कुर्हे, विलास मेहत्रे, प्रकाश कुऱ्हे ,राजेंद्र टेकाडे ,राजेंद्र सातभाई ,अशोक महाराज शिरसाठ, बबन महाराज अनाप, साईनाथ महाराज शिरसाठ, चांगदेव मेहेत्रे, अर्जुन कुर्हे, मधुकर अनाप , तुकाराम मेहेत्रे, गोरक्षनाथ कुर्हे ,सोमनाथ शिरसाठ सचिन नगरकर संदीप कुर्हे, महेश कुऱ्हे केशव कुर्ते, रमेश लगे, चंद्रकांत रासकर, संदीप कुऱ्हे ,वैभव कुरे ,अमोल मेहेत्रे ,रवी मेहेत्रे, भैय्या शिरसाठ, कान्हा लगे ,बाळासाहेब टेकाडे ,ज्ञानेश्वर शिरसाठ, दादा कुऱ्हे, तुकाराम मेहेत्रे,शरद गायकवाड ,अशोक कुर्हे, विशाल मेहत्रे बबलू कुर्हे भाऊसाहेब लगे तुषार जेजुरकर कार्तिक मेहत्रे किरण कुर्हे सागर कुर्हे चेतन कुर्हे सौरभ लगे अशोक दुधाळ अमोल आनाप अच्युत कुर्हे प्रफुल्ल कुर्हे योगेश कुर्हे बाळासाहेब टेकाळे सागर कुर्हे प्रकाश दुधाळ अनिल कुर्हे गौरव कुर्हे आदींनी विशेष प्रयत्न केले

श्रीरामपूर (गौरव डेंगळे): शब्दांची ताकद काय असते, हे दाखवून देणारी एक संस्मरणीय आणि प्रेरणादायी राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धा कोपरगाव येथे पार पडली. सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे हे पाचवे पर्व होते.या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध भागांतील – नाशिक, श्रीरामपूर, येवला, निफाड, संभाजीनगर, प्रवरानगर, शिर्डी आदी परिसरातील ३५ शाळांमधील ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मंचावर उभा राहून विचार व्यक्त करताना प्रत्येक वक्त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि राष्ट्रभक्तीची झळाळी दिसून येत होती. भाषणात त्यांनी समाज, शिक्षण, संविधान, स्त्री सक्षमीकरण, शिवरायांचे राष्ट्रनिर्माण, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातील माणुसकी आणि नवभारताचे स्वप्न अशा अनेक विषयांवर प्रभावी मांडणी केली.छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानिक वारसा, शिवरायांची आदर्श नेतृत्वशैली, स्त्री शक्तीचा जागर – या सर्व विषयांवर भाष्य करताना विद्यार्थ्यांनी केवळ स्पर्धा जिंकण्याचे नाही, तर विचार प्रबळ करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते. त्यांच्या वक्तृत्वशैलीत ओघवती भाषा, भावनिक आविष्कार आणि समाजप्रबोधनाचा प्रगल्भ दृष्टीकोन स्पष्टपणे दिसून येत होता.स्पर्धेचे उद्घाटन प्रा. अमोल चिने यांच्या हस्ते झाले. त्यांच्यासोबत शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे,पालक संघाचे उपाध्यक्ष रामदास खरात आणि काशिनाथ दामोदर लव्हावाटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. परीक्षक म्हणून सुमित डेंगळे (इतिहास अभ्यासक),ॲड. प्रवीण जमदाडे आणि प्राचार्या सुनीता हिंगडे यांनी अतिशय पारदर्शक आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने मूल्यांकन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्या शुभांगी अमृतकर,पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे, नथलीन फर्नांडिस, तसेच मराठी विभागप्रमुख बी. के. तुरकणे आणि शिक्षकांनी अतुलनीय परिश्रम घेतले.

या स्पर्धेत श्रीराम अकॅडमी, श्रीरामपूरने प्रथम क्रमांक पटकावला. श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगावने द्वितीय क्रमांक तर संत विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल, अहिल्यानगरने तृतीय क्रमांक पटकावला. त्याशिवाय सेंट मोनिका स्कूल, बी. आर. खटोड कन्या विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल, आत्मा मलिक स्कूल, श्री साईबाबा कन्या विद्यालय यांसह इतर शाळांनाही उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.हा कार्यक्रम केवळ एक स्पर्धा नव्हता, तर नव्या पिढीच्या मनात विचारांची मशाल पेटवणारा एक संस्कार सोहळा ठरला. वक्त्यांच्या ओघवत्या भाषणांनी उपस्थित शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांची मने जिंकली. विचारशक्ती, आत्मविश्वास, आणि नेतृत्वगुण यांचे अद्वितीय दर्शन घडवणाऱ्या या मंचाने विद्यार्थ्यांच्या मनात भाषेचे, विचारांचे आणि संस्कृतीचे बीज रुजवले. कोपरगावने पुन्हा एकदा राज्य पातळीवर शिक्षण आणि साहित्य यांचे तेज झळकावले,हे निश्चित.

आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी लाखो वारकरी दिंडीद्वारे पंढरपूरला पायी चालत जातात. पालखीच्या मुक्कामी वारकऱ्यांना सुविधा नसल्याने उघड्यावर शौचाला जावे लागत होते. ज्यामुळे अस्वच्छता व्हायची. यावर उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सेवा सहयोग संस्थेने पुढाकार घेत निर्मल वारीला सुरवात केली. महाराष्ट्राची सांस्कृतीक परंपरा असलेली ही वारी सुखरूप पार पडावी, पर्यावरणाचे रक्षण व्हावे आणि ज्या गावातून वारी जाते तिथे अनारोग्य होऊ नये. यासाठी २०१५ पासून निर्मल वारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शेकडो वर्षे हिंदुत्वाची अनेक स्थित्यंतरे पाहत वारकरी पंढरीची वारी नित्यनेमाने करतो आहे. आधुनिक काळात आता वारी खऱ्या अर्थाने भौतिकदृष्ट्या निर्मल झाली आहे..!


विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीसोबत राज्य शासनाने २६५ फिरते शौचालय उपलब्ध करून दिले आहेत. त्याच्या व्यवस्थापनाचे, स्वच्छतेचे, वापराचे नियोजन, तसेच वारकऱ्यांच्या प्रबोधनाचे नियोजन सेवा सहयोग आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक गेली १० वर्षे अव्याहतपणे करत आहे. वारीचा प्रवास स्वच्छ व निर्मल करण्यासाठी स्वयंसेवकांनी पुढे येत हा उपक्रम सुरू केला. ज्याला आता राज्य शासनाची आणि समाजातील विविध संस्थांची मोठी साथ मिळत आहे. दरवर्षी वारी अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी होत चालली आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पसरणारे अनारोग्य जवळपास नष्टच झाले आहे.” मागील १० वर्षात वारीमध्ये उघड्यावर शौचाला जाण्याचे प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत घटल्याचे जाधव यांनी सांगितले. नियमित वारी करणारे वारकरी शौचालयाचा वापर करत असून, दींडी चालक आणि स्थानिक नागरिकांकडूनही शौचालयाचा आग्रह होत आहे. ज्याला वारकऱ्यांचाही सकात्मक प्रतिसाद लाभत असून विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी पालखी सोहळ्यामध्ये आदित्य एंटरप्राइजेस या कंपनीकडून तसेच या कंपनीचे संचालक विक्रम मोरे यांच्या माध्यमातून शौचालयाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले यामुळे या पालखी सोहळ्यामध्ये कुठल्याही वारकऱ्याला गैरसोईचा सामना करावा लागला नाही..!

बेलापूर( प्रतिनिधी )-श्री संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता बुधवार दिनांक 23 जुलै रोजी ह. भ. प. अनिल महाराज महांकाळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार असून त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेलापूर येथील संत सावता महाराज मंदिर बेलापूर बुद्रुक येथे बुधवार दिनांक 16 जुलैपासून अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सुरुवात झाली.  सात दिवस चाललेल्या पारायण सोहळ्यात ह. भ. प. मयूर महाराज बाजारे, ह. भ. प. डॉक्टर शुभम महाराज कांडेकर, ह. भ. प. विजय महाराज कोहिले, ह. भ. प. कृष्णा महाराज शिरसाठ, ह. भ. प. जीवराम महाराज कापंडेकर, ह. भ. प. मोहन महाराज बेलापूरकर तसेच ह भ प वीर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. या पारायण सोहळ्यास राजेंद्र टेकाळे कुर्हे वस्ती, गोखलेवाडी, दुधाळ वस्ती, मेहेत्र परिवार ,बेलापूर ,श्री रघुनाथ एकनाथ जाधव श्री गजानन दगडू जाधव व बाळासाहेब जाधव, माळी परिवार व दादासाहेब कुर्हे यांनी पंगतीचे यजमान पद स्वीकारले सात दिवस चालणारे या सोहळ्यात पहाटे काकड आरती, त्यानंतर श्री संत ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ तसेच रात्री कीर्तन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .सायंकाळी होणाऱ्या हरिपाठाचे नेतृत्व हरिहर महिला भजनी मंडळ, सावता महाराज भजनी मंडळ, गोखलेवाडी कुर्हे वस्ती परिसर भजनी मंडळ, बबन महाराज अनाप यांनी केले तर गायनाचार्य म्हणून संजय महाराज शिरसाठ, रामचंद्र सोनवणे, मधुकर पुजारी, मयूर महाराज कुऱ्हे, बळी तात्या वाकडे ,कृष्णा महाराज शिंदे तर हार्मोनियम वादक अरुण कुर्हे, बन्सी महाराज मुंगसे, दत्तू जाधव, बापू अनाप, जिजाबाई शिंदे, शाम मेहेत्रे तर मृदंगाचार्य म्हणून ह. भ. प. विजय महाराज चौधरी ,सुधीर महाराज कुर्हे, मयूर महाराज बाजारे,  भास्कर महाराज कुर्हे, कैलास खर्डे, साठे मामा, शिवा मिसाळ, आदित्य सूर्यवंशी आदींनी सहभाग घेतला होता .या कार्यक्रमाकरिता बेलापूर बुद्रुक, बेलापूर खुर्द , नरसाळी , आंबी , केसापूर, चांदेगाव, उक्कलगाव फत्याबाद , उंबरगाव , वळदगाव,  कोर्हे वस्ती, पटेल वाडी, रामगड, लाडगाव, ऐनतपुर , सुभाष वाडी मातापूर  कान्हेगाव, ब्राह्मणगाव ,करजगाव,कनगर  या पंचक्रोशीतील भजनी मंडळाने साथ दिली.

कोपरगाव(गौरव डेंगळे): तालुक्यातील शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात आपल्या कार्यकुशलतेने विशेष ठसा उमटवलेले सोमय्या विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक डॉ. धनंजय देवकर यांची कोपरगाव तालुका क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी एकमुखाने निवड करण्यात आली. आज संजीवनी येथे पार पडलेल्या बैठकीत तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक आणि प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही निवड पार पडली.

डॉ. देवकर यांनी गेल्या दोन दशकांहून अधिक काळ विविध शाळांमध्ये क्रीडा प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि संयोजक म्हणून कार्य केले आहे. त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर मार्गदर्शन करताना उत्कृष्ट यश मिळवून दिले आहे. केवळ क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेणेच नव्हे, तर खेळाडूंच्या मानसिक आणि चारित्र्य विकासालाही त्यांनी प्राधान्य दिले आहे.कोपरगावसारख्या ग्रामीण भागात खेळांची गती वाढवण्यासाठी आणि नवोदित विद्यार्थ्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. देवकर यांनी अनेक उपक्रम राबवले. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांनी एकमताने त्यांची निवड केली.अध्यक्षपदाच्या निवडीनंतर शारदा स्कूलचे प्राचार्य के. एल. वाकचौरे, उपप्राचार्य शुभांगी अमृतकर, पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाने, नथलीन फर्नांडिस आणि इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी डॉ. देवकर यांचे विशेष सत्कार करून त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. अनेक विद्यार्थ्यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला.या निवडीमुळे कोपरगाव तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात नवचैतन्य निर्माण होणार असून जिल्हा व राज्य पातळीवरील विविध स्पर्धांसाठी अधिक योजनाबद्ध तयारी होणार आहे. डॉ. देवकर यांच्या दूरदृष्टीचा आणि अनुभवाचा लाभ घेऊन तालुक्यातील क्रीडा संस्कृती अधिक भक्कम होईल, असा विश्वास शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

त्यांच्या नेतृत्वात कोपरगाव तालुका हे नाव भविष्यात केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर ओळखले जाईल आणि नव्या पिढीतील खेळाडूंना अधिकाधिक संधी व मार्गदर्शन मिळेल,हीच सर्वांची अपेक्षा आहे.

बेलापूर (वार्ताहर)  चेन्नई येथील ओम् चारीटेबल ट्रस्टच्या वतीने आंतरराष्ट्रीय वैदिक टॅलेंट स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला असून श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील वेदमूर्ती महेश दिलीप दायमा यांना हा सन्मान मिळाला आहे.      चेन्नई येथील ओम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने सन 2024 मध्ये देशभरातील वैदिक महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बौद्धिक    परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेत बेलापूर तालुका श्रीरामपूर येथील विद्यार्थी वेदमूर्ती महेश दायमा याने परीक्षेत 99 टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा बहुमान मिळवीला. वेदमूर्ती दायमा हा राजस्थान येथील गोठ मांगलोद मधील दधीमती गुरुकुल मधून शिक्षण घेत होता या गुरुकुलमधून शिक्षण घेत असताना वेदमूर्ती महेश दायमा याने या परीक्षेत भाग घेतला होता आंतरराष्ट्रीय दर्जाचे बटू या परीक्षेमध्ये सहभागी झाले होते या परीक्षेत महेश दायमा यांना 99 टक्के मार्क मिळाले होते त्यामुळे त्याचा सन्मान नुकताच चेन्नई येथे आयोजित करण्यात आला होता      रोख रक्कम व सन्मानपत्र शाल श्रीफळ देवुन त्यांचा सन्मान करण्यात आला. चिरंजीव वेदमूर्ती महेश दिलीप दायमा यांचा सन्मान कमल किशोर जी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली व जगदीश जी गुरुजी यांच्या व ओम चॅरिटेबल ट्रस्ट नॅशनल वैदिक येथील मान्यवरांच्या उपस्थितीत  करण्यात आला.  चिरंजीव महेश हा पत्रकार दिलीप दायमा यांचा चिरंजीव असुन त्याने महाराष्ट्र पुणे आळंदी या ठिकाणी घेण्यात आलेल्या वेदोस्तव परीक्षेतही प्रथम क्रमांक मिळविला होता. भारतातील 40 गुरुकुल मधून प्रथम येण्याचा बहुमान दायमा याने मिळविला होता.आळंदी येथील कार्यक्रमात बेलापूरचे भूमिपुत्र व  श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष श्री. स्वामी गोविंद देवगिरी जी महाराज यांच्या हस्ते सुवर्णमुद्रिका व चांदीचे पंचपात्र देऊन सन्मानित करण्यात आले‌‌ होते. महेश दायमा यांचे शिक्षण राजस्थान गोठ मांगलोद जिल्हा नागोर या ठिकाणी  झाले आहे‌.  पुढील शिक्षणासाठी महेश हा काशी या ठिकाणी जाणार असून महेश याला कमल किशोर जोशी गुरुजी तसेच दधिमती गुरुकुल चे अध्यक्ष सोहनलाल दायमा, सचिव हरिनारायण व्यास, कोषाध्यक्ष जय किशन संचालक, भालचंद्र व्यास संयुक्त, सचिव रूप, नारायण आसोपा तसेच सुभाष मिश्रा व सर्व संचालक सर्व शिक्षक व आई वडीलाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले‌.वेदमूर्ती महेश दायमा यांच्या सुयशा बद्दल मा .जि प. सदस्य शरद नवले , बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, बाजार समितीचे मा. उपसभापती अभिषेक खंडागळे, पत्रकार देविदास देसाई तिरंगा न्यूजचे संपादक असलम बिनसाद, भास्करराव खंडागळे, प्राध्यापक ज्ञानेश्वर गवले नवनाथ कुताळ सर, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लड्डा, किराणा मर्चंट चे अध्यक्ष शांतीलाल हिरण पत्रकार मनोज आगे, जय बाबाचे संपादक बाळासाहेब आगे, कै. मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन रवींद्र खटोड, बेलापूर एज्युकेशन संस्थेचे राजेश खटोड मा. सरपंच भरत साळुंके, राज्य राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस अरुण पा नाईक ऐनतपुर सेवा संस्थेचे चेअरमन चंद्रकांत नाईक पं स. मा सभापती दत्ता कुर्हे आदिंची अभिनंदन केले आहे.

चेक रिपब्लिक/२० जुलै/गौरव डेंगळे:भारतीय टेनिसपटू रुतुजा भोसले हिने चीनची झेंग वुशुआंग हिच्यासोबत भागीदारी करत ITS Cup 2025 या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महिलांच्या दुहेरी गटाचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीत त्यांनी जबरदस्त खेळ करत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवत ऐतिहासिक विजय नोंदवला.

हा सामना तितकाच उत्कंठावर्धक ठरला. दोघींनी अप्रतिम समन्वय आणि आक्रमक खेळ दाखवत प्रेक्षकांची मनं जिंकली. रुतुजाची शांत आणि आत्मविश्वासपूर्ण शैली झेंगच्या जलद आणि अचूक खेळीला उत्तम साथ देत होती. त्यांच्या रॅलीज आणि विनर्सनी सामना रंगतदार केला.

या विजयानंतर रुतुजा भोसलेने आपल्या कारकिर्दीत आणखी एक आंतरराष्ट्रीय यशाची भर घातली आहे. ITF स्तरावरील तिचे हे आणखी एक विजेतेपद असून जागतिक स्तरावर तिच्या नावाचा झंकार अधिकच वाढला आहे.रुतुजाच्या या विजयामुळे भारताच्या टेनिस विश्वात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. तिच्या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत असून देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नाखोन पथोम (थायलंड) | गौरव डेंगळे भारताने एशियन अंडर-१६ पुरुष व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत पदार्पणातच इतिहास रचला आहे. शनिवारी झालेल्या थरारक सामन्यात भारताने जपानचा ३-२ असा पराभव करत कांस्यपदक पटकावले. या विजयानंतर भारतासह पाकिस्तान, जपान आणि इराण हे चारही उपांत्य फेरी गाठलेले संघ २०२६ मध्ये कतारमध्ये होणाऱ्या एफआयव्हीबी बॉईज अंडर-१७ वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरले आहेत.कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात भारताने २५-२१, १२-२५, २५-२३, १८-२५, १५-१० अशा सेट्समध्ये विजय मिळवला. या सामन्यात अब्दुल्ला (१६ गुण), अप्रतीम (१५), रफिक (१२) आणि चरन (४) यांनी भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले.याआधी उपांत्य फेरीत भारताचा पाकिस्तानकडून सरळ सेट्समध्ये पराभव झाला होता. मात्र, जपानविरुद्धच्या विजयाने भारताने तिसऱ्या क्रमांकाचे स्थान निश्चित केले.

स्पर्धेतील आपल्या गटात भारताने थायलंड, ऑस्ट्रेलिया आणि चीन या तिन्ही संघांवर सरळ सेट्समध्ये विजय मिळवून ९ गुणांची कमाई केली होती. त्यानंतर क्रॉसओव्हर फेरीत उझबेकिस्तानवर मात करत भारताने उपांत्य फेरी गाठली. गटपातळीवर जपानकडून झालेल्या पराभवाचा बदलाही भारताने कांस्यपदक सामन्यात घेतला.२०२६ मध्ये कतारमध्ये होणाऱ्या FIVB अंडर-१७ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताची उपस्थिती निश्चित झाली असून, ही कामगिरी भविष्यातील जागतिक स्तरावरच्या संधींसाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

पणजी ( गौरव डेंगळे) – गोवा राज्य क्रीडा आणि युवक व्यवहार संचालनालयाचे (DSYA) नवे संचालक डॉ. अजय गावडे यांनी १७ जुलै २०२५ रोजी पदभार स्वीकारताच तात्काळ कृतीला सुरुवात केली. पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी गोव्यातील सर्व १२ तालुक्यांतील तालुका क्रीडा अधिकारी (TSO) व सहायक क्रीडा शिक्षण अधिकारी (APEO) यांच्यासोबत बैठक घेऊन, त्यांच्या समोरील अडचणी आणि स्थानिक पातळीवरील क्रीडा उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला.राज्यातील क्रीडा व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि स्थानिक खेळाडूंना सक्षम करण्यासाठी एक व्यापक योजना आखण्याच्या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली. खेळांना गावपातळीपासून गती मिळावी, ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळावी आणि गोव्यातील सुप्त क्रीडा प्रतिभेला योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे, हे या चर्चेचे मुख्य सूत्र

राहिले.या दिवसातच डॉ. गावडे यांनी खेळो इंडिया अधिकारी, क्रीडा प्राधिकरण गोवा (SAG) व विविध क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींशीही बैठक घेतली. त्यांनी क्रीडा क्षेत्रात सुसंगत समन्वय ठेवत नव्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे संकेत दिले. DSYA, SAG आणि गोवा फुटबॉल डेव्हलपमेंट कौन्सिल (GFDC) यांच्यात समन्वय साधत गोव्यातील क्रीडा संस्कृती अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.“गोव्यातील खेळाडूंमध्ये अफाट कौशल्य आहे. त्यांना योग्य प्रशिक्षण आणि आधार दिल्यास ते राज्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवतील. गोवा हा देशातील महत्त्वाचा क्रीडा केंद्र बनावा, हीच आमची दिशा व ध्येय आहे,” असे डॉ. गावडे यांनी पदभार स्वीकारताना सांगितले.त्यांच्या या सकारात्मक आणि कृतीशील सुरुवातीमुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व स्तरावर नव्या आशा निर्माण झाल्या असून,गोव्यातील क्रीडा व्यवस्थापनात ठोस बदल होण्याची अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.

कोपरगाव (गौरव डेंगळे):सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगाव यांच्या वतीने २६ जुलै २०२५ रोजी पहिली ‘शारदा एक्सप्रेस खो-खो लीग’ स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना खेळाची गोडी लावण्यासाठी व कौशल्य वाढवण्यासाठी ही स्पर्धा एक आगळीवेगळी संधी ठरणार आहे.या विशेष लीगमध्ये जिल्ह्यातील १२ संघांना सहभाग घेता येणार आहे. प्रत्येक संघात ६ मुले व ३ मुली असा समावेश असणार असून, ही स्पर्धा इयत्ता ६ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांसाठी आहे. लिंगसमता आणि सांघिक एकता यावर आधारित ही अभिनव संकल्पना शारदा स्कूलने राबवली आहे.स्पर्धा साखळी पद्धतीने (League Format) खेळवण्यात येईल.

प्रत्येक सामन्यानंतर एक उत्कृष्ट खेळाडू ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात येईल.

हा पुरस्कार कै. महेंद्र अशोकराव नगरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणार आहे.या लीगमध्ये अंतिम विजेत्या संघाला ₹२१००/- रोख रक्कम आणि भव्य चषक देण्यात येणार असून,हा पुरस्कार श्री संकेत दिलीपराव पारखे यांच्याकडून दिला जाणार आहे.संघ नोंदणीसाठी इच्छुकांनी खो-खो प्रशिक्षक श्री गणेश वाघ व श्री गणेश मोरे यांच्याशी त्वरित संपर्क साधावा.या संपूर्ण उपक्रमाचे मार्गदर्शन प्राचार्य के. एल. वाकचौरे करत असून, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक डॉ. धनंजय देवकर यांच्या अधिपत्याखाली या भव्य लीगचे आयोजन करण्यात येत आहे.ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाबरोबरच सामूहिकतेचे मूल्य, स्पर्धात्मकता,आणि स्वतंत्रता यांचा अनुभव देणारी ठरणार आहे.

गौरव डेंगळे श्रीरामपूर :–सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल,कोपरगाव येथे पारंपरिक भारतीय कुस्ती या विषयावर एक प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले.मल्ल महाविद्या महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. गणेश महागुडे यांनी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.त्यांच्या अभ्यासपूर्ण व प्रभावी शैलीतील मार्गदर्शनामुळे उपस्थितांमध्ये कुस्ती या खेळाबाबत नवीन जाणीव निर्माण झाली.

गणेश महागुडे यांनी कुस्तीचा इतिहास मांडताना सांगितले की, हा खेळ केवळ स्पर्धा नसून भारतीय परंपरेचा अभिन्न भाग आहे. रामायण आणि महाभारतातून कुस्तीची सुरुवात झाल्याचे दाखले देत त्यांनी हा खेळ किती पुरातन आणि समृद्ध आहे, हे पटवून दिले. कुस्ती ही फक्त ताकदीची लढाई नसून ती संयम, शिस्त आणि मनोबल यांची परीक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांनी आपल्या व्याख्यानात १९५२ मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून घडलेल्या खाशाबा जाधव यांचे उदाहरण देत, विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. भारताचे पहिले ऑलिम्पिक वैयक्तिक पदक मिळवणारे खाशाबा जाधव यांना त्यावेळी आर्थिक अडचणींवर मात करून ऑलिम्पिकमध्ये भाग घेता यावा म्हणून त्यांच्याच कॉलेजमधील प्राचार्यांनी स्वतःचा बंगला गहाण ठेवून मदत केली होती,ही हृदयस्पर्शी गोष्ट त्यांनी सांगितली.

गणेश महागुडे यांनी आधुनिक कुस्तीचे प्रकार समजावून सांगत कुस्तीमुळे होणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासावर भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की, कुस्तीमुळे अनेक युवकांना पोलीस, रेल्वे, सैन्य आणि विविध शासकीय सेवांमध्ये संधी मिळाल्या आहेत. या खेळातून केवळ यश नाही तर एक सुसंस्कृत आणि शिस्तबद्ध जीवनशैली मिळते.

आज जरी हरियाणाचे मल्ल आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीमध्ये आघाडीवर असले, तरी भारतासाठी पहिले पदक महाराष्ट्रातील मातीतूनच आले, याची आठवण करून देत त्यांनी महाराष्ट्रातील युवकांनीही या खेळाकडे पुन्हा गंभीरतेने पाहावे असे आवाहन केले.

श्री शारदा स्कूलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे,शिक्षक, क्रीडा शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.उपस्थित विद्यार्थ्यांनी महागुडे सरांच्या व्याख्यानात रस घेतला आणि विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरं दिली.कार्यक्रमाच्या शेवटी सरांनी सांगितले की, कुस्ती म्हणजे केवळ मैदानात लढायचे कौशल्य नव्हे, ती संपूर्ण जीवनात संघर्षातून विजय मिळवण्याची शिकवण आहे. "कुस्ती ही एक संस्कारक्षम जीवनशैली आहे" या शब्दांत त्यांनी आपले व्याख्यान संपवले आणि विद्यार्थ्यांमध्ये नवा जोश निर्माण केला.

बेलापूरमध्ये एका अनैतिक संबंधांच्या कथित प्रकरणामुळे निर्माण झालेला तणाव स्थानिक नागरिकांच्या मध्यस्थीने शांत झाल्याचे वृत्त आहे. मात्र, हे प्रकरण मिटवण्यासाठी पत्रकार आणि गावातील लोकांना पैसे देण्यात आल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाल्याने परिसरात नवे कुजबुज सुरू झाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बेलापूरमध्ये एका अनैतिक संबंधाच्या प्रकरणामुळे समाजात अशांतता निर्माण झाली होती. परिस्थिती चिघळण्यापूर्वीच, बेलापूरमधील काही प्रतिष्ठित नागरिकांनी पुढाकार घेऊन दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्थी केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे हे प्रकरण शांततेत मिटल्याचे सांगितले जात आहे, ज्यामुळे परिसरातील तणाव काही प्रमाणात निवळला आहे.

परंतु, या शांततेमागे आर्थिक व्यवहार झाल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. परिसरातील काही नागरिकांच्या मते, हे प्रकरण दडपण्यासाठी आणि कोणतीही बातमी प्रसिद्ध होऊ नये यासाठी, पत्रकार आणि गावातील काही प्रमुख व्यक्तींना पैसे देण्यात आले आहेत. "प्रकरण मिटवण्यासाठी पैसे दिले गेल्याची चर्चा आहे," असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका स्थानिक नागरिकाने सांगितले. ही चर्चा आता बेलापूरमधील अनेकांच्या तोंडी आहे.

या कथित आर्थिक देवाणघेवाणीमुळे या प्रकरणाच्या शांततापूर्ण निराकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी केली जात आहे. बेलापूरमधील शांतता खरंच स्थापित झाली आहे की, पैशांच्या जोरावर ती केवळ विकत घेतली गेली आहे, हा प्रश्न आता अनेकांच्या मनात घर करून आहे.

या प्रकरणावर अजूनतरी कोणत्याही अधिकृत व्यक्तीने किंवा संबंधित पक्षांनी सार्वजनिकरित्या प्रतिक्रिया दिलेली नाही. स्थानिक प्रशासनाने या आरोपांची दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे):सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल येथे आज कबड्डी दिनाच्या निमित्ताने एक आगळा-वेगळा आणि प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला. कबड्डी क्षेत्रातील महान कार्यासाठी ओळखले जाणारे स्वर्गीय शंकरराव साळवी यांच्या जन्मदिवशी महाराष्ट्रभर कबड्डी दिन साजरा केला जातो. त्यांच्या स्मृतीला वंदन करत शाळेने विद्यार्थ्यांच्या मनात जिद्द, प्रयत्नशीलता आणि स्वप्नांवर विश्वास निर्माण करणारा उपक्रम आयोजित केला होता.

या विशेष दिवशी विद्यार्थ्यांना एका थेट हिरोची भेट मिळाली –


भारताचा आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू असलम इनामदार. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि अनुभवाची ठाम बाजू घेऊन ते विद्यार्थ्यांसमोर उभे राहिले, आणि सुरू झाला त्यांचा प्रवास उलगडण्याचा प्रवास. त्यांनी आपल्या लहानपणीच्या अडचणी, घरची हलाखीची परिस्थिती, कबड्डीची पहिली ओळख, मोठ्या भावाची साथ, स्थानिक मैदानांवरचा संघर्ष, आणि अखेर भारतीय संघात स्थान मिळवण्यापर्यंतचा प्रवास ओघवत्या शब्दांत मांडला.

सभागृहात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी त्या प्रत्येक आठवणीला मनापासून प्रतिसाद दिला. त्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल, प्रेरणा आणि आत्मविश्वास यांचा मिलाफ स्पष्ट दिसत होता. असलम इनामदार केवळ यशाची गोष्ट सांगून थांबले नाहीत, तर त्यांनी अपयश, अपमान, दुखापती आणि मानसिक तणाव या सगळ्यांनाही समोर ठेवत यशामागील वास्तव स्पष्ट केलं. त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट ठळकपणे समोर आली – परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी आत्मविश्वास, कुटुंबाची साथ आणि जिद्द असल्यास यश नक्की मिळते.

या कार्यक्रमाच्या विशेषतेपैकी एक म्हणजे शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे यांची समुपदेशनपर उपस्थिती. विद्यार्थ्यांच्या प्रेरणेसाठी असलम इनामदार यांना आमंत्रित करण्यामागील उद्देश त्यांनी आपल्या छोट्याशा भाषणात सांगितला. त्यांनी हे ही सांगितले की,अशा कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाबाहेरचं जीवन शिकता येतं – असं जीवन जे खऱ्या अनुभवांवर उभं आहे. त्यांनी असलम यांचे मनःपूर्वक कौतुक करत विद्यार्थ्यांना त्यांच्यासारखं कष्ट घेऊन जीवनात पुढे जाण्याचा सल्ला दिला.

कार्यक्रमाचे संयोजन अतिशय उत्तमरीत्या पार पडले. पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, महेश मोरे,सुहास गगे, साईनाथ चाबुकस्वार,गणेश मलिक, दिग्विजय भोरे,क्रीडा शिक्षक,व्यवस्थापन समिती,इतर शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रमपूर्वक आयोजन करत विद्यार्थ्यांना एक अविस्मरणीय अनुभव दिला.संवादानंतर विद्यार्थ्यांनी असलम इनामदार यांच्यासोबत फोटो काढत, त्यांच्या सहवासात काही क्षण घालवत प्रेरणेचा एक थेट स्पर्श अनुभवला.

बेलापूर( प्रतिनिधी) कोल्हार चौकातील एटीएम फोडण्याचा असफल प्रयत्न झाला चोरट्यांनी  गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला.पण तो असफल झाला.               बेलापूर कोल्हार चौकात असलेले एटीएम यापूर्वी देखील फोडण्याचा प्रयत्न झाला होता . त्यावेळी ग्रामस्थांनी  पोलिसांना तातडीने खबर दिली पोलीसही सायरन वाजवी तातडीने घटनास्थळी दाखल झाले

सायरन चा आवाज ऐकताच पोलीस आल्याची चाहुल लागली आणखी चोरटे चार चाकी वाहनातून फराक्ष झाले. काल पुन्हा चोरट्यांनी त्याच एटीएमला लक्ष केले. गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला परंतु एटीएम फुटले  नाही. त्यांनी एटीएम च्या  ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कागदी पट्ट्या लावल्या आणि नंतर फोडण्याचा प्रयत्न केला.सुदैवाने त्यातील रक्कम चोरट्यांच्या हाती लागली नाही.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे):सोमैया विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, शारदानगर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले. सर्वधर्म प्रेम,सहिष्णुता आणि शांततेचा संदेश देणाऱ्या या दिंडीने परिसर भक्तीरसात न्हाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.


"देव एकच आहे,त्याची नावे अनेक असू शकतात,पण मानवतेचा हात हाच श्रेष्ठ धर्म आहे,"असा संदेश या दिंडीच्या माध्यमातून देण्यात आला. शाळेच्या बालगोपालांनी वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सजून टाळ,मृदंग, पखवाजाच्या गजरात विठ्ठलनामाचा जयघोष करत परिसर पंढरपूरमय केला.

या वेळी शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे,उपप्राचार्या शुभांगी अमृतकर,पर्यवेक्षिका सौ. प्रज्ञा पहाडे,शिक्षिका पल्लवी ससाणे, नैथलीन फर्नांडिस,तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदाय,संत परंपरा व विठ्ठलभक्ती याविषयी माहिती दिली.


शाळेच्या लहानग्या विद्यार्थ्यांनी "ज्ञानोबा-तुकाराम", "पुंडलिक वरदा हरि विठ्ठल", "माऊली माऊली" अशा भक्तीगीतांच्या जयघोषात परिसरात भव्य दिंडी काढली.विद्यार्थ्यांच्या निरागस चेहऱ्यावर झळकणारा भक्तीभाव,टाळ-मृदंगाच्या गजरात त्यांनी सादर केलेला उत्साह यामुळे संपूर्ण परिसरात आनंद आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले.

दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेची ओळख, सामाजिक ऐक्य, प्रेम, सहिष्णुता आणि एकोप्याचा संदेश देण्यात आला.

बेलापूरःदर वर्षी प्रमाणे ह. भ. प. सोपान महाराज हिरवे यांच्या मार्गदर्शना खाली तसेच जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या नियोजनातून गावकरी मंडळ व समस्त ग्रामस्थ बेलापूर बु -ऐनतपूर यांच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त येथील विठ्ठल मंदिरात शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक नितीन देशमुख व सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश जाधव यांचे हस्ते महाआरती संपन्न झाली.                                         आरतीनंतर उपस्थितांना प्रसाद म्हणून खिचडी व राजगिरा लाडूचे वाटप करण्यात आले.                                     प्रारंभी दीपक क्षञिय यांनी प्रवचन केले.तर ह.भ.प.बबन महाराज अनाप,ह.भ.प. अशोक महाराज शिरसाठ, विलासनाना मेहेञे, किरण महाराज गागरे यांनी भजन गायन केले.हरिहर काळे गुरु व बापू गुरु देवकर यांनी पौरोहित्य केले. कार्यक्रम कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकमान्य प्रतिष्ठान व महिला मंच,हरिहर शेजआरती  मंडळ, सत्यमेव जयते ग्रुप, साई क्लासेस यांचे सहकार्य लाभले.

यावेळी ह.भ.प सोपान महाराज हिरवे, बबन महाराज अनाप, अशोक महाराज शिरसाठ,किरण महाराज गागरे, विलास नाना मेहत्रे,सहायक पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी, बेलापूर पोलीस औट पोस्ट चे संपत बडे, नंदकिशोर लोखंडे,आदिनाथ आंधळे,

बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे,सरपंच मीना साळवी, उपसरपंच चंद्रकांत नवले,जालिंदर कुऱ्हे,रणजित श्रीगोड,भाऊसाहेब कुताळ,भास्कर खंडागळे,कनजीशेठ टाक, सुधाकर तात्या खंडागळे,दिलीप काळे,पुरुषोत्तम भराटे,देविदास देसाई, विष्णुपंत डावरे, दिलीप दायमा,दिपकसा क्षत्रिय,सुहास शेलार,रमेश दायमा, सुभाष सोमाणी, सुरेश बाबुराव कुऱ्हे,महेशजी जेठवा,गोविंद श्रीगोड,डॉ. सुधीर काळे, लक्ष्मणराव मुंडलिक, बाबासाहेब काळे,सोमनाथ लगे, सोमनाथ साळुंके,राधेश्याम अंबिलवादे, दिलीप अमोलिक,साहेबराव मोकाशी,दयानंद शेंडगे सर,डॉ. रवींद्र गंगवाल,भरत सोमाणी, रावसाहेब कुऱ्हे, अशोक दुधाळ, रमेश काळे, बबन मेहत्रे, प्रभाकर ताके,राहुल लखोटीया,प्रशांत मुंडलिक, हेमंत मुंडलिक,सुभाष बोरा, बबलू बनभेरू, देविदास घाणे, जनार्दन ओहोळ, सतीश काळे, संजय भोंडगे,दिपक काळे,अरुण कुलकर्णी, अरुण काळे,ओमप्रकाश व्यास, लक्ष्मण राशिनकर, गणपत साळुंके,प्रभात कुऱ्हे,बाबुराव पवार, अँड. अरविंद साळवी, सचिन अमोलिक, प्रसाद कुलकर्णी,संजय खंडागळे, किरण बैरागी,विठ्ठल शिंदे, अनिल कुऱ्हे, राजेश सूर्यवंशी,भगीरथ मुंडलिक,, किरण खराडे,उपेंद्र कुलकर्णी, सागर ढवळे, मुकुंद चिंतामणी, प्रमोद पोपळघट, ऋतुराज वाघ, करण गोसावी, नितीन शर्मा,श्रीहरी बारहाते,तुकाराम जाधव,चंद्रकांत ताथेड,नंदकिशोर दायमा,मधुकरअनाप, विजय कोठारी,राहुल माळी, मधुकर ठोंबरे, नाना चिंतामणी, पोपट पवार, विनायक जगताप,जितेंद्र वर्मा, विजय दरक,विशाल आंबेकर,महेश कुऱ्हे, गोपी दाणी, सचिन देवरे, गणेश कोळपकर, मच्छिंद्र नागले शरद पुजारी,यश पवार, केशव शिंदे, मयुर मोरे, राज गुडे, संतोष ताथेड, प्रशांत दायमा, विकी पगारे, मारुती गायकवाड, महंत काळे, दादासाहेब कुताळ,सचिन मेहेत्रे, सोमनाथ शिरसाठ, राजेंद्र काळे,शाम मेहेत्रे, सचिन गोरख वाबळे,संजय जगताप, सूरज भुसा,हरीष बडाख,बाळासाहेब जाधव,सुजित सहानी, नारायण मुंडलिक, किशोर खरोटे,अर्जुन कुऱ्हे, राहुल माळवदे, अक्षय पवार, योगेश नागले, सचिन राकेचा आदी उपस्थित होते.

बेलापूरःबेलापूर-ऐनतपूर गावाची लोकसंख्या मोठ्याप्रमाणात वाढत आहे.भविष्यात वाढत्या नागरीकरणामुळे कच-याच्या विल्हेवाटीची समस्याही वाढणार आहे.यादृष्टिने उपाययोजना म्हणून ओल्या व सुक्या कच-याचे स्वतंञ संकलन करुन भविष्यात त्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.                                       यासंदर्भात बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे ,सरपंच मीना साळवी,उपसरपंच चंद्रकांत नवले, ग्रामपंचायत आधिकारी निलेश लहारे,कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे शशिकांत दुशिंग,प्रेरणा ठाणगे,अनिता पाचपिंड,अॕड.अविनाश साळवी आरोग्य विभागाचे दत्ताञय वक्ते,अविनाश शेलार यांची संयुक्त बैठक झाली.                           सदर बैठकीत वाढत्ती लोकसंख्या व नागरीकरण गृहित धरुन मागील काळात कचरा व्यवस्थापनाबाबत काहिच उपाययोजना करण्यात आली नाही.त्यामुळे दुर्गंधी तसेच आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.याचा सारासार विचार करुन राज्याचे जलसंपदामंञी तथा जिल्ह्याचे पालकमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.यांनी ग्रामपंचायतीस शेतीमंडळाची जी जमीन दिली आहे तिथे  कचरा डंपींग यार्ड केले जाणार आहे.                                                        गावातील ओला व सुका कचरा स्वतंञपणे सकलित करुन गौळा करण्याचे नियोजन केले जाणार आहे.यासाठी नागरिकांनी ओला व सुका कचरा, पिशव्या ,पाण्याच्या बाटल्या,कॕरीबॕग्ज,भाजीपाला आवशेष स्वतंञपणे जमा करुन ठेवावेत. ओल्या कचऱ्या मध्ये प्लास्टिक मिसळले गेल्यास कचऱ्याचे विघटन होत नाही व दुर्गंधी वाढून आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.त्यामुळे नागरिकांनी याबाबत दक्षता घेवून सहकार्य करावे.ओला व सुका कचरा घंटा गाडीत स्वतंत्र पणे जमा करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.हा जमा झालेला कचरा नियोजित डंपिंग यार्ड येथे टाकून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे.यासाठी महिला बचत गट,अंगणवाडी कर्मचारी,आशा सेविका व ग्रामपंचायत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.यामुळे नजिकच्या काळात कचरा विल्हेवाटिची मोठी समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.अशातहेने कचरा व्यवस्थापनावर बैठकीसत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बेलापूरःतालुक्यातील सर्वात मोठ्या बेलापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर जलसंपदा तथा पालकमंञी नामदार राधाकृष्ण विखे पा.यांचे नेतृत्वाखालील तसेच जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या मार्गदर्शना खालील गावकरी मंडळाचे चंद्रकांत नवले(आबा) यांची बिनविरोध निवड झाली. गावकरी मंडळाने सरपंच पद राखीव असल्याने समाजातील अन्य घटकांना प्रतिनिधित्व देण्याच्यादृष्टिने उपसरपंच पदावर सर्व समाज घटकांना संधी देण्याचे धोरण अवलंबविले.त्यानुसार श्री.चंद्रकांत नवले यांना उपसरपंच पदाची संधी देण्यात आली.सरपंच मिना साळवी यांचे अध्यक्षतेखाली व ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे यांचे उपस्थीतीत झालेल्या बैठकीस अभिषेक खंडागळे,स्वाती अमोलिक 

,मुश्ताक शेख,तबसुम बागवान,प्रियंका कु-हे,उज्वला कुताळ,वैभव कु-हे,सुशिलाबाई पवार, रमेश अमोलिक,भरत साळुंके आदी सदस्य उपस्थित होते.उपसरपंच पदासाठी श्री. नवले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यावर सूचक म्हणून अभिषेक खंडागळे हे होते.त्यामुळे चंद्रकांत नवले यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सरपंच मीना साळवी यांच्या निवडी प्रमाणेच ही देखील निवड बिनविरोध झाल्याने शरद नवले,अभिषेक खंडागळे ,प्रफुल्ल डावरे प्रणित गावकरी मंडाळाने ग्रामपंचायतीत निर्विवाद राजकीय वर्चस्व सिध्द केल्याचे मानले जाते.                                                            निवडीनंतरच्या आभार सभेत  जि.परिषद सदस्य शरद नवले,बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, प्रफुल्ल डावरे, स्वाती अमोलिक,शांतीलाल हिरण, मोहसीन सय्यद यांनी मनोगत व्यक्त केले. शरद नवले म्हणाले की,पालकमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.,सौ.शालिनीताई विखे पा,माजी खा.डाॕ.सुजय विखे यांचे नेतृत्वाखाली ग्रामपंचायत माध्यमातून  गावाच्या विकास करण्याचा प्रयत्न होत आहे.गावकरी मंडळाने सर्व समाज घटकांना संधि देण्याची शब्दपूर्ती केली आहे. याप्रसंगी कनजीशेठ टाक,जि.प.सदस्य शरद नवले,जालिंदर कुऱ्हे,राष्ट्रवादीचे प्रांत सरचिटणीस अरुण पा.नाईक ,रणजीत श्रीगोड,भाऊसाहेब कुताळ,हाजी ईस्माईल शेख,विष्णुपंत डावरे,पुरुषोत्तम भराटे,सुधाकर तात्या खंडागळे,शांतीलाल हिरण, प्रशांत लड्डा, सुभाष अमोलिक,अॕड.अरविंद साळवी,रावसाहेब अमोलिक,अन्वर सय्यद, शफिक बागवान,मोहसीन सय्यद,प्रभात कुऱ्हे,अभिषेक नवले,दिलीप दायमा,श्रीहरी बारहाते,दत्तात्रय नवले,सचिन अमोलिक,भैय्या शेख,बंटी शेलार,भाऊसाहेब तेलोरे,निसार बागवान,अशोक दुधाळ,शाहरुख शेख,व्दारकनाथ नवले,गोपी दाणी,राज गुडे,अजीज शेख,महेश कु-हे,रफीक शेख,सुभाष अमोलिक ,बाबुराव पवार,शहानवाज सय्यद,विशाल आंबेकर,जाकीर शेख,शरद अंबादास नवले,रफिक शेख,अशोक वहाडणे,दादासाहेब कुताळ,गणेश राशिनकर,विनायक जगताप,गोकुळ कुताळ,शाम गायकवाड,शशिकांत नवले,दिपक गायकवाड,संजय गंगातिरवे,निसार आतार,अनिल नवले,शफिक आतार,राजेंद्र नवले,भरत नवले, दिपक प्रधान,पंढरीनाथ गाढे, शुभम नवले अशोक दुधाळ, रमेश लगे, पप्पू मांजरे, बाळासाहेब शेलार, राहुल गायकवाड आदि प्रमुखांसह गावकरी मंडळाचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

१२ जुलैला रंगणार अंतिम स्पर्धा; विजेत्या संघाला ट्रॉफी व प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार..


कोपरगाव(गौरव डेंगळे): सोमैया विद्या विहारच्या श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगाव यांच्या वतीने आयोजित शारदा थ्रो बॉल लीग २०२५ साठी विद्यार्थ्यांची निवड चाचणी शनिवार, ५ जुलै रोजी शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.


या लीगमध्ये प्रत्येक संघात

✅ इयत्ता ९ वी व १० वी मधील ४ मुले,

✅ इयत्ता ७ वी व ८ वी मधील ४ मुले,

✅ इयत्ता ८ वी ते १० वी मधील ४ मुलींचा समावेश असणार आहे.


स्पर्धेचे अंतिम सामने शनिवार, १२ जुलै रोजी रंगणार असून, विजेत्या संघाला आकर्षक ट्रॉफी दिली जाणार आहे. तसेच प्रत्येक सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात येईल. याच दिवशी सर्व संघांचे कर्णधार आणि अधिकृत संघांची घोषणा करण्यात येणार आहे.

या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन शाळेचे प्राचार्य श्री. के. एल. वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्ह्यात थ्रो बॉल खेळाचा प्रचार-प्रसार करणारे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री. धनंजय देवकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे.

नाव नोंदणीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी श्री. गणेश वाघ व श्री. गणेश मोरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या लीगमुळे विद्यार्थ्यांमध्ये थ्रो बॉल खेळाविषयी आवड निर्माण होऊन त्यांच्या अंगभूत कौशल्यांना व्यासपीठ मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली ( गौरव डेंगळे): पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज राष्ट्रीय क्रीडा धोरण २०२५ (National Sports Policy 2025) ला मंजुरी दिली आहे. हे धोरण देशाच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देणारे ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. नव्या धोरणाद्वारे भारताला जागतिक क्रीडा महासत्ता बनवण्याचा आणि २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी भारताला सक्षम स्पर्धक म्हणून घडवण्याचा दृष्टीकोन ठेवण्यात आला आहे.

हे धोरण पूर्वीच्या २००१ मधील क्रीडा धोरणाला बदलून नव्या पिढीसाठी तयार करण्यात आले आहे. धोरण तयार करताना केंद्र सरकार,नीती आयोग,राज्य सरकारे,राष्ट्रीय क्रीडा महासंघ, खेळाडू,तज्ज्ञ,तसेच जनतेचा सहभाग घेण्यात आला.


राष्ट्रीय क्रीडा धोरण २०२५ चे पाच प्रमुख स्तंभ:


१ . जागतिक पातळीवरील उत्कृष्टता..


® गवतापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडू घडवण्याच्या योजना.


® ग्रामीण व शहरी भागात स्पर्धात्मक लीग व स्पर्धांचे आयोजन.


® जागतिक दर्जाचे प्रशिक्षण व प्रशिक्षक विकास.


® राष्ट्रीय क्रीडा महासंघांचे व्यवस्थापन व क्षमतेत सुधारणा.


® क्रीडा विज्ञान, औषधोपचार व तंत्रज्ञानाचा उपयोग.


® प्रशिक्षक,अधिकारी,सहाय्यक कर्मचारी यांचे प्रशिक्षण.



२ . आर्थिक विकासासाठी क्रीडा.


® क्रीडा पर्यटनाला प्रोत्साहन व भारतात आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन.


® क्रीडा क्षेत्रातील उत्पादन व स्टार्टअप्सना चालना.


® खासगी क्षेत्र, CSR, PPP मॉडेलद्वारे गुंतवणूक आकर्षित करणे.


३ . सामाजिक विकासासाठी क्रीडा.


® महिलांसाठी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, आदिवासी व दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष योजना.


® पारंपरिक व स्थानिक खेळांना पुनरुज्जीवन.


® क्रीडा क्षेत्रात करिअरला प्रोत्साहन.


® भारतीय प्रवासी व परदेशस्थित भारतीयांना क्रीडा क्षेत्रात सहभागी करणे.


४ . क्रीडा जनआंदोलन म्हणून.


® देशभर क्रीडा व फिटनेस संस्कृती रुजवण्यासाठी अभियान.


® शाळा,महाविद्यालये, कार्यालयांसाठी फिटनेस इंडेक्स.


® सर्वांसाठी क्रीडा सुविधा उपलब्ध करणे.


५ . शिक्षणाशी एकात्मता (NEP 2020 अनुकूल).


® शालेय अभ्यासक्रमात क्रीडांचा समावेश.


® शिक्षक व क्रीडा शिक्षकांना विशेष प्रशिक्षण.


® विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा जागृती वाढवणे.


६ . रणनीतिक आराखडा.


® क्रीडा क्षेत्रातील मजबूत कायदे व नियमन.


® तंत्रज्ञानाचा वापर – AI, डेटा विश्लेषणाद्वारे प्रगती मापन.


® ठोस उद्दिष्टे, KPI आणि टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी.


® प्रत्येक राज्याने आपले धोरण या राष्ट्रीय धोरणाशी सुसंगत करणे.


® सर्व मंत्रालये व विभागांचा एकत्रित सहभाग.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget