बेलापूरातील वेदमूर्ती महेश दायमा यांचा चेन्नईत सन्मान
बेलापूर (वार्ताहर) चेन्नई येथील ओम् चारीटेबल ट्रस्टच्या वतीने आंतरराष्ट्रीय वैदिक टॅलेंट स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला असून श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील वेदमूर्ती महेश दिलीप दायमा यांना हा सन्मान मिळाला आहे. चेन्नई येथील ओम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने सन 2024 मध्ये देशभरातील वैदिक महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बौद्धिक परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेत बेलापूर तालुका श्रीरामपूर येथील विद्यार्थी वेदमूर्ती महेश दायमा याने परीक्षेत 99 टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा बहुमान मिळवीला. वेदमूर्ती दायमा हा राजस्थान येथील गोठ मांगलोद मधील दधीमती गुरुकुल मधून शिक्षण घेत होता या गुरुकुलमधून शिक्षण घेत असताना वेदमूर्ती महेश दायमा याने या परीक्षेत भाग घेतला होता आंतरराष्ट्रीय दर्जाचे बटू या परीक्षेमध्ये सहभागी झाले होते या परीक्षेत महेश दायमा यांना 99 टक्के मार्क मिळाले होते त्यामुळे त्याचा सन्मान नुकताच चेन्नई येथे आयोजित करण्यात आला होता रोख रक्कम व सन्मानपत्र शाल श्रीफळ देवुन त्यांचा सन्मान करण्यात आला. चिरंजीव वेदमूर्ती महेश दिलीप दायमा यांचा सन्मान कमल किशोर जी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली व जगदीश जी गुरुजी यांच्या व ओम चॅरिटेबल ट्रस्ट नॅशनल वैदिक येथील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. चिरंजीव महेश हा पत्रकार दिलीप दायमा यांचा चिरंजीव असुन त्याने महाराष्ट्र पुणे आळंदी या ठिकाणी घेण्यात आलेल्या वेदोस्तव परीक्षेतही प्रथम क्रमांक मिळविला होता. भारतातील 40 गुरुकुल मधून प्रथम येण्याचा बहुमान दायमा याने मिळविला होता.आळंदी येथील कार्यक्रमात बेलापूरचे भूमिपुत्र व श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष श्री. स्वामी गोविंद देवगिरी जी महाराज यांच्या हस्ते सुवर्णमुद्रिका व चांदीचे पंचपात्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. महेश दायमा यांचे शिक्षण राजस्थान गोठ मांगलोद जिल्हा नागोर या ठिकाणी झाले आहे. पुढील शिक्षणासाठी महेश हा काशी या ठिकाणी जाणार असून महेश याला कमल किशोर जोशी गुरुजी तसेच दधिमती गुरुकुल चे अध्यक्ष सोहनलाल दायमा, सचिव हरिनारायण व्यास, कोषाध्यक्ष जय किशन संचालक, भालचंद्र व्यास संयुक्त, सचिव रूप, नारायण आसोपा तसेच सुभाष मिश्रा व सर्व संचालक सर्व शिक्षक व आई वडीलाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.वेदमूर्ती महेश दायमा यांच्या सुयशा बद्दल मा .जि प. सदस्य शरद नवले , बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, बाजार समितीचे मा. उपसभापती अभिषेक खंडागळे, पत्रकार देविदास देसाई तिरंगा न्यूजचे संपादक असलम बिनसाद, भास्करराव खंडागळे, प्राध्यापक ज्ञानेश्वर गवले नवनाथ कुताळ सर, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लड्डा, किराणा मर्चंट चे अध्यक्ष शांतीलाल हिरण पत्रकार मनोज आगे, जय बाबाचे संपादक बाळासाहेब आगे, कै. मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन रवींद्र खटोड, बेलापूर एज्युकेशन संस्थेचे राजेश खटोड मा. सरपंच भरत साळुंके, राज्य राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस अरुण पा नाईक ऐनतपुर सेवा संस्थेचे चेअरमन चंद्रकांत नाईक पं स. मा सभापती दत्ता कुर्हे आदिंची अभिनंदन केले आहे.
Post a Comment