पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे यांनी पोलीस सेवेत अकरा वर्षे मुंबईमध्ये सेवा केली. या कार्यकाळात त्यांनी अनेक गुन्ह्यांचा पर्दाफास केरुन गुन्हेगारांना जेरबंद केले. त्यानंतर त्यांची बदली श्रीरामपूर येथे झाली, येथेही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. वरिष्ठांच्या हस्ते अनेकदा त्यांचा सन्मान झाला आहे. श्री.बडे यांना उत्तर महाराष्ट्रातील "बेस्ट कॉप ऑफ द मंथ" अर्थात 'महिन्यातील सर्वोत्तम पोलीस अधिकारी' हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या या खडतर आणि यशस्वी सेवेबद्दल बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी कॉन्स्टेबल बडे यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सत्कार स्वीकारताना, बडे यांनी आपल्या पूर्वीच्या नियुक्तीच्या ठिकाणांचे अनेक धाडसी आणि प्रेरणादायी अनुभव सांगितले. त्यांच्या या अनुभवांबद्दल उपस्थित ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले.
या छोट्याशा सत्कार सोहळ्याला पत्रकार देवदास देसाई, सुहास शेलार, दिलीप दायमा, पोलीस कॉन्स्टेबल भारत तमनर, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब कुताळ, तिळवण तेली महासंघाचे एकनाथ उर्फ लहानुभाऊ नागले यांसह मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment