बेलापूर ग्रामपंचायतीचे ओला व सुका कच-याचे स्वतंञपणे वर्गिकरण करुन संकलनास सुरुवात

बेलापूरःराज्याचे जलसंपदा मंञी तथा जिल्ह्याचे पालकमंञी  नाम.राधाकृष्ण विखे पा.च्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या बेलापूर बुll ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांचे मार्गदर्शनाखाली 'प्रारंभ कचरा संकलन प्रकल्पा'च्या सहकार्याने  गावातील ओल्या व सुक्या कच-याचे स्वतंञपणे संकलन करण्याच्या कामास सुरुवात केली आहे.नजिकच्या काळात कच-यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार असल्याची माहिती सरपंच मिनाताई साळवी व उपसरपंच चंद्रकांत नवले यांनी दिली.                                                 बेलापूर ग्रामपंचायतीने कच-याचे वर्गिकरण करुन संकलन करण्याचा उपक्रम श्री.शरद नवले व श्री.अभिषेक खंडागळे यांचे संकल्पनेतून हाती घेण्याचे जाहिर केले होते.याबाबत स्वच्छता कर्माचा-यांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले.तसेच ओला व सुका कचरा स्वतंञपणे जमा करावा याबाबत ग्रामस्थांनाही आवाहन करण्यात आले होते.प्रारंभ प्रकल्पाचे शशिकांत दुशिंग व अनिता पाचपिंड या घरोघरी जाऊन कचरा संकलना बाबत नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांना बेलापूर ग्रामपंचायत यांच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी सहकार्य करीत आहेत.                ग्रामपंचायतीच्या आवाहनास ग्रामस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.ग्रामस्थ ओला कचरा(फळे.भाजीपालाभाज्यांच्या,साली व देठे,पालापाचोळा,खरकटे,खराब अन्न इत्यादी )तर सुका कचरा(प्लॕस्टिक बाॕटल्स,खाद्यपदार्थ पाकिटे,कागद व पुठ्ठे,प्लास्टिक वस्तु,कापडाच्या चिंध्या,औषधांची पाकीटे,प्लास्टिकचे अवशेष इत्यादी)स्वतंञपणे संकलित करुन कचरागाडीतील ओल्या व सुक्या कच-यासाठीच्या स्वतंञ कप्यांत टाकून गोळा करण्यात येत आहे.                                         नजिकच्या काळात हा कचरा नाम.राधाकृष्ण विखे पा.यांनी मोफत उपलब्ध करुन दिलेल्या जमिनीवर डंम्पिंग यार्ड करुन तेथे टाकण्यात येणार आहे.तसेच या डम्पिंग यार्डवर कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारुन सेंद्रिय खतनिर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सौ.साळवी व उपसरपंच श्री.नवले यांनी  दिली.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget