शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगावच्या विद्यार्थ्यांचे शास्त्रीय संगीत व वादन क्षेत्रात घवघवीत यश... गायन व तबला वादन परीक्षा २०२४-२५ मध्ये विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी...

श्रीरामपूर (गौरव डेंगळे) –अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ,मुंबई यांच्या वतीने आयोजित शास्त्रीय संगीत गायन आणि तबला वादन परीक्षा सन २०२४-२५ मध्ये श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगावच्या विद्यार्थ्यांनी लक्षणीय यश संपादन केले आहे. या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी आपली कला, मेहनत आणि संगीताची समज दाखवत उत्कृष्ट गुणांनी यश प्राप्त केले.

गायन परीक्षेत एकूण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.यामध्ये २० विद्यार्थी विशेष श्रेणीसह उत्तीर्ण होत शाळेचा मान उंचावला.तबला वादन परीक्षेत ६० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता त्यापैकी २५ विद्यार्थी विशेष गुण श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले तर बाकीचे विद्यार्थी प्रथम व द्वितीय श्रेणीत उल्लेखनीय कामगिरी करत कौतुकास पात्र ठरले.विद्यार्थ्यांना संगीताचे प्रशिक्षण देताना रेखा गायकवाड (गायन) आणि उस्ताद श्री. दिग्विजय भोरे (तबला) यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे दर्जेदार यश प्राप्त केले, हे विशेष उल्लेखनीय आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे, उपप्राचार्य शुभांगी अमृतकर, पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे, नैथालिन फर्नांडिस यांच्यासह सर्व शिक्षकवृंद आणि इतर कर्मचाऱ्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शास्त्रीय संगीत आणि वादन या भारतीय संस्कृतीतील मौल्यवान कला शालेय पातळीवरच जोपासत विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचे काम श्री शारदा स्कूल सातत्याने करत आहे. विद्यार्थ्यांमधील कलागुणांचा विकास,आत्मविश्वासाची वाढ आणि सांस्कृतिक भान या उद्देशाने घेतले जाणारे हे प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी असून, शाळेचा सांस्कृतिक पाया अधिक भक्कम करणारे ठरत आहेत.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget