याबाबत नाईक यांनी ग्रामविकास अधिकारी व सरपंचांना निवेदन पाठविले असुन त्यात पुढे म्हटले आहे की खाजगी सावकाराचा गावाला वेढा पडला असून काही ठराविक लोक गोरगरीब तसेच अडलेल्या नडलेल्या कडून मन मानेल त्या पद्धतीने व्याजाची आकारणी करून जनतेला लुबाडत आहेत याबाबत अनेक तक्रारी दाखल झालेल्या होत्या परंतु त्या सावकाराच्या दडपशाहीमुळे दडपल्या गेल्या. कुणाच्या जमिनी, कुणाच्या चार चाकी, कुणाच्या दोन चाकी, कुणाची मालमत्ता घर गहाण ठेवून हे सावकार खुलेआम 50 टक्के पासून ते 120% पर्यंत व्याजाची आकारणी करून लबाडणूक करत आहेत यांचा व्याजाचा दर हा दर महा असून महिना संपला की हे लोक संबंधित व्यक्तीकडे तगादा लावतात अर्वाचे भाषा वापरून दादागिरी करतात व त्याने गहाण टाकलेल्या मालमत्ता विकण्याचा दम देतात त्यामुळे अनेक गोरगरिबांना आपल्या मालमत्ता सोडून देण्याची वेळ येत आहे तरी बेलापुराला पडलेला हा खाजगी सावकारकीचा विळखा सुटणार कधी याबाबत विक्रम नाईक यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना सवाल विचारला आहे. तसेच बेलापूर गाव मध्ये किती अधिकृत व किती अनाधिकृत सावकार आहेत याची यादी माननीय जिल्हाधिकारी यांना पाठवली आहे काय याचीही माहिती त्यांनी ग्रामपंचायतकडे मागवली आहे तसेच संबंधित सावकाराची कर्ज वसुली कशी असते तसेच किती टक्के व्याज घेतली जाते याबाबतही ग्रामपंचायत प्रशासनाकडून माहिती मागविण्यात आलेली आहे ग्रामपंचायतीचे प्रशासन अधिकारी ही माहिती देत नसेल तर बेकायदेशीरपणे चाललेल्या या सावकारकीला ग्रामपंचायतचा छुपा पाठिंबा तर नाही ना असा सवाल नाईक यांनी विचारला असून याबाबत लवकरच तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विक्रम नाईक यांनी दिलेला आह
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या स्पष्ट आदेशानंतरही ग्रामपंचायतने खाजगी सावकारकीकडे कठोर पावले का उचललेली नाहीत, याकडे नाईक यांनी लक्ष वेधले आहे. “गाव बुडतंय आणि ग्रामपंचायत बघ्याची भूमिका घेत आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.
बेकायदेशीर सावकारी थांबवण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेवुन गोरगरीबांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी नाईक यांनी केली आहे.
Post a Comment