श्री संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
बेलापूर( प्रतिनिधी )-श्री संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता बुधवार दिनांक 23 जुलै रोजी ह. भ. प. अनिल महाराज महांकाळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार असून त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेलापूर येथील संत सावता महाराज मंदिर बेलापूर बुद्रुक येथे बुधवार दिनांक 16 जुलैपासून अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सुरुवात झाली. सात दिवस चाललेल्या पारायण सोहळ्यात ह. भ. प. मयूर महाराज बाजारे, ह. भ. प. डॉक्टर शुभम महाराज कांडेकर, ह. भ. प. विजय महाराज कोहिले, ह. भ. प. कृष्णा महाराज शिरसाठ, ह. भ. प. जीवराम महाराज कापंडेकर, ह. भ. प. मोहन महाराज बेलापूरकर तसेच ह भ प वीर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. या पारायण सोहळ्यास राजेंद्र टेकाळे कुर्हे वस्ती, गोखलेवाडी, दुधाळ वस्ती, मेहेत्र परिवार ,बेलापूर ,श्री रघुनाथ एकनाथ जाधव श्री गजानन दगडू जाधव व बाळासाहेब जाधव, माळी परिवार व दादासाहेब कुर्हे यांनी पंगतीचे यजमान पद स्वीकारले सात दिवस चालणारे या सोहळ्यात पहाटे काकड आरती, त्यानंतर श्री संत ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ तसेच रात्री कीर्तन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .सायंकाळी होणाऱ्या हरिपाठाचे नेतृत्व हरिहर महिला भजनी मंडळ, सावता महाराज भजनी मंडळ, गोखलेवाडी कुर्हे वस्ती परिसर भजनी मंडळ, बबन महाराज अनाप यांनी केले तर गायनाचार्य म्हणून संजय महाराज शिरसाठ, रामचंद्र सोनवणे, मधुकर पुजारी, मयूर महाराज कुऱ्हे, बळी तात्या वाकडे ,कृष्णा महाराज शिंदे तर हार्मोनियम वादक अरुण कुर्हे, बन्सी महाराज मुंगसे, दत्तू जाधव, बापू अनाप, जिजाबाई शिंदे, शाम मेहेत्रे तर मृदंगाचार्य म्हणून ह. भ. प. विजय महाराज चौधरी ,सुधीर महाराज कुर्हे, मयूर महाराज बाजारे, भास्कर महाराज कुर्हे, कैलास खर्डे, साठे मामा, शिवा मिसाळ, आदित्य सूर्यवंशी आदींनी सहभाग घेतला होता .या कार्यक्रमाकरिता बेलापूर बुद्रुक, बेलापूर खुर्द , नरसाळी , आंबी , केसापूर, चांदेगाव, उक्कलगाव फत्याबाद , उंबरगाव , वळदगाव, कोर्हे वस्ती, पटेल वाडी, रामगड, लाडगाव, ऐनतपुर , सुभाष वाडी मातापूर कान्हेगाव, ब्राह्मणगाव ,करजगाव,कनगर या पंचक्रोशीतील भजनी मंडळाने साथ दिली.
Post a Comment